जो कोणी परमेश्वरावर विश्वास ठेवतो तो पौलाबरोबर म्हणू शकता “मला सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे.” (फिलिपै ४:१३). काल होऊन गेलेली आमची कोणतीही चूक किंवा अपयश झाले असेल परमेश्वराच्या सहाय्याने त्याची पूर्तता करु शकतो. MHMar 413.4
प्रेषितांबरोबर आम्ही असे म्हणू शकतो. “बंधूंनो मी अद्यापि आपल्या कह्यात घेतले असे मानीत नाही, तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करुन व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचे बक्षिस मिळविण्यासाठी मर्यादेवरील खूणेकडे मी धावतो हेच एक माझे काम (फिलिपै ३:१३-१४). MHMar 413.5
*****