Go to full page →

व्यक्तिगत सेवा MHMar 7

येशू ख्रिस्ताने तारणाचे सुसमाचाराचा प्रसार करण्यासाठी कोणत्याही क्षणाला दुर्लक्ष केले नाही. त्या शमरानी स्त्रीचे अदभूत शब्द ऐका. जेव्हा ही शमारोनी स्त्री पाणी भरावयास याकोबाच्या विहीरीवर आली तेव्हा तिला फार नवल वाटले. तो तिला म्हणाला, “मला प्यायला पाणी दे.” त्याला थंड पाणी प्यायचे होते आणि तिच्याशी बोलायला सुरुवात करायची होती कारण कोणत्यातरी प्रकारे तिच्या जीवनामध्ये जीवनी पाणी द्यायचे होते. “हे कसे शक्य आहे ?’ ती स्त्री म्हणाली “तू एक यहूदी असून माझ्यासारख्या शमरोनी स्त्रिला प्यायला मागता ? हे कसे ?’ (कारण यहूदी लोक शमरोनी लोकांबरोबर कसलाच व्यवहार करीत नसत). येशूने तिला उत्तर दिले “देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यायला पाणी दे असे तुला म्हणणारा कोण आहे हे तुला कळले असते तर तू त्याच्याजवळ मागीतले असते आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते. जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल, परंतु मी दिलेले पाणी जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा असे होईल.” (योहान ४:७-१४) MHMar 7.2

या एकट्या स्त्रीमध्ये येशूने किती आस्था दाखविली. त्याचे शब्द किती उत्साही व अर्थभरित होते. जेव्हा स्त्रीने ते शब्द ऐकले तेव्हा तिने आपली घागर तिथेच ठेऊन शहरात गेली आणि आपल्या मित्रांना म्हणाली “चला मी केलेले सर्व काही ज्याने मला सांगितले तो मनुष्य पाहा. तोच ख्रिस्त असेल काय ?’ आम्ही वाचतो की त्या शहरातील अनेक शमरोनांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. (योहान ४:२९-३९) आणि याचा अंदाज कोण लाऊ शकतो की या शब्दांचा परिणाम म्हणून आतापर्यंत किती आत्म्यांचा पालट झाला असेल ? MHMar 8.1

जेथे कोठे सत्याचा स्वाकार करण्यासाठी हृदये खुली झाली असतील. ख्रिस्त त्यांना शिकविण्यास तयार होतो. त्यांच्या समोर तो हृदये वाचणारा पिता व त्याच्या सेवेचे प्रगटीकरण करतो. अशांसाठी तो कोणत्या दृष्टांताचा उपयोग करीत नाही. त्यांना तर तो विहीरीजवळ भेटलेल्या स्त्रीप्रमाणे तो म्हणतो “मी जो तुझ्याशी बोलत आहे तोच मी आहे.” MHMar 8.2

येशू सर्व गालीलभर फिरत त्यांच्या उपासना मंदिरामध्ये उपदेश करीत असे व सुवार्ता प्रसार करीत असे आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग आजार आणि अशक्तपणा दूरी करीत असे सर्व सिरीया प्रांतात त्याचे हे यश पसरत गेले आणि लोक सर्व प्रकारचे रोग आजार जे अनेक प्रकारच्या आजाराने घेरले आहेत आणि ज्यांच्यामध्ये अशुद्ध आत्मे आहेत, पक्षाघात असणारे मिरगीवाले या सर्वांना त्यांना त्यांच्याकडे आणले आणि त्याने सर्वांना बरे केले. (मत्तय ४:२३-२५) MHMar 8.3

*****