Go to full page →

छोटी संधी MHMar 104

मोठमोठी कार्य करण्यासाठी कोणत्याही छोट्या संधीकढे दुर्लक्ष करु नये. आपण छोटी कामे यशस्वीपणे करु शकतो. परंतु कधी कधी मोठी कामे करण्यामध्ये अयशस्वी झाल्यास निराशा हाती येऊ शकते. जे कार्य आपल्या हाती आल्यास ते मन:पूर्वक व प्रयत्नपूर्वक पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. एखादे कार्य करुन ते पूर्ण केल्याचा आनंद होऊन अधिक हुरुप येतो आणि दुसरे कार्य यशस्वी करण्याचा आत्मविश्वास निर्माण होतो. म्हणून छोट्या समस्याकडेही दुर्लक्ष करु नये. नाहीतर अनेक लोक निराश होऊन सहाय्य येण्याची आशा सोडून देतात. MHMar 104.4

मानवी सहाय्यावर अवलंबून राहू नका. मानवतेच्या पलिकडे पाहा. परमेश्वराने ज्याची नेमणूक केली होती. आमचे दुःख त्याने स्वत:वर घेतले. आमचे कष्ट त्याने सोसले. आमच्या गरजा त्याने पुरविल्या त्याची नियुक्ति केली होती. परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेवा. जेथे कोठे कार्य करण्यासारखे असेल तेथे सुरुवात करा आणि दृढ विश्वासाने पुढे चाला. ख्रिस्ताच्या उपस्थितीमध्ये विश्वास आहेच कारण तोच शक्ति आणि खंबीरपणा देतो. निस्वार्थीपणे पूर्ण विश्वासाने, कठीण परिश्रमाने आणि उत्साहाने कार्य करा. MHMar 105.1

जी क्षेत्रे अपत्तिजनक निराश करणाऱ्या अवस्थेमध्ये असतात अशा ठिकाणी जाण्यास लोक धजावत नाहीत. त्यांची इच्छाही होत नाही. अशा ठिकाणी सेवेसाठी समर्पित आत्मे असणारे लोक जातात आणि कठोर परिश्रम करुन उल्लेखनीय परिवर्तन घडवून आणतात. मनुष्यावर नाही परंतु परमेश्वरावर पूर्ण विश्वास ठेऊन त्यांनी धैर्याने आणि मन लावून कामे केली आहेत व परमेश्वराच्या आशीर्वादाने त्यांचा सांभाळ केला आहे. अशाप्रकारे केलेल्या लोककल्याण कार्याला जगामध्ये कधी ओळख दिली नाही. परंतु त्यांनी केलेले श्रम सुवर्णाक्षरामध्ये लिहीली गेली आहेत व येणाऱ्या युगामध्ये त्यांची ओळख होईल. MHMar 105.2