Go to full page →

आशा आणि धैर्य MHMar 147

आपण चिकाटी आणि धैर्य याशिवाय काहीच करु शकत नाही. जे निराश आहेत त्यांना आशेचे आणि धैर्याचे शब्द बोला. गरज वाटल्यास त्यांना स्पष्ट पुरावा दाखवा ते सरळ तुमच्याकडे आले तर त्यांना सहाय्य करा. ज्यांना अनेक गोष्टींचा पुरवठा आहे त्यांनी लक्षात ठेवले पाहिजे की अजूनही ते अनेक चुका करीत असतात. त्यांच्या या चुकांकडे बोट दाखविले जाते आणि त्यांचे मनोरंजन होते त्यांना फसविण्यात येते आणि त्यांचे मोठे नुकसानही होते. लक्षात ठेवा की दोष लावण्याऐवजी दया दाखविणे आवश्य आहे. यामुळे यश प्राप्त होते. तुम्ही त्यांना शिकवित असतांना त्यांना जाणीव होईल की त्यांनी वर दावे अशी तुमची अपेक्षा आहे. यासाठीच तुम्ही त्यांना मदत करीत आहात. जर काही गोष्टी करण्यात त्यांची चुक होत असेल तर लगेच त्यांचे दोष दाखविण्याची घाई करु नका. MHMar 147.2

साधेपणा, आत्मत्याग, मित्तपान इ. गरीबांसाठी हे सर्व धडे अतिआवश्यक व उपयोगी आहेत त्यांना हे कठीण वाटते आणि त्यांना वावडत नाहीत. परंतु तरीही उपयोगी आहेत. जगीक आत्मा आणि उदाहरणे म्हणजे सतत धमेंडपणा दिखाऊपणा, आळस, वायफळ खर्च यासर्व गोष्टी देवाला न आवडणाऱ्या आहेत. या गोष्टी बहुतेक लोकांना कंगाल बनवितात. व हजारो लोकांचे पतन होते. ख्रिस्ती लोकांनी या सवयांपासून दूरच राहावे आणि गरीबांनाही या वाईट गोष्टींपासून दूर राहण्यासाठी प्रोत्साहित करावे. MHMar 147.3

प्रभु येशू ख्रिस्त या जगामध्ये गरीबच राहिला. त्याचा जन्म अगदी दीन व गरीब घरामध्ये झाला. त्याचे स्वर्गीय वैभव होते. स्वर्गीय दूत त्याचा महिमागात असत तो सर्व विश्वांचा राजा असून ही जगाचा उद्धार करण्यासाठी गरीब होऊन आला. स्वर्गीय सुख सोडून तो सामान्य मनुष्य बनला व सर्वांसाठी एक उदाहरण झाला. जगातील गरीब लोक जे कष्ट व दुःख भोगतात ते सर्व त्याने भोगले श्रम, त्रास, थकवा, भूक व एकाकीपणा त्याने सहन केला. येशू म्हणाला होता. “खोकडास बिळे व आकाशातील पारवरांस घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोकेटेकावयास ठिकाण नाही.” (लूक ९:५८). MHMar 148.1

येशूने मनुष्याकडून प्रशंसा किंवा बढाईची अपेक्षा केली नाही. त्याने कोणत्या सेनाचे नेतृत्त्व केले नाही. त्याने जगातील श्रीमंत आणि सन्मानिक लोकांना त्यांच्या उन्नतिविषयी प्रोत्साहित केले नाही. देशातील नेत्यांना कोणत्याही पदविचा दावा केला नाही. समाजातील नकली दिखाण्याला त्याने तुच्छ मानले त्याने जन्माची कुलीनता, धन, गुण, शिक्षण आणि वंश या सर्व गोष्टींकडे लक्ष दिले नाही. तो स्वर्गाचा राजा असून ही त्याने आपल्या शिष्यांमध्ये सुशिक्षितपणा, व्यवसाय, शासकीयता शास्ती व परुशीयांच्यामध्ये गणले नाही. अशा लोकांना त्याने निवडले नाही कारण आपले शिक्षण आणि पदवीवर त्यांना गर्व झाला असता ते आपल्याच परंपर आणि अंधविश्वासांना चिकटून राहिले होते. तो सर्वांची हृदये वाचू शकतो त्याने अशा मासे धरणाऱ्या साध्या कोळी लोकांची निवड केली जे शिकण्यासाठी उत्सुक होते तो जकातदार आणि पापी लोकांबरोबर जेवला. साधारण लोकांमध्ये तीच व संसारीक बनण्यासाठी नाही परंतु त्यांच्यामध्ये अशासाठी मिसळलाकी ते वचन आणि कर्मांनी आपल्या हीनपणामधून वर यावे हा योग्य सिद्धांत त्यांच्यासमोर ठेऊ शकला. येशूने मानवाचे योग्य मोल ठरविण्यासाठी आणि जगाची पातळी योग्य राखण्यासाठी त्याने प्रयत्न केला. त्याने गरीबांच्या अवस्थाचा स्वीकार केला. कारण गरीबांच्या माथ्यावरील कलंकत्याला धुऊन काढायचा होता. त्यांना परमेश्वराच्या राज्याचे वारसदार बनवून गरीबीचा कलंक कायमचाच मिटवून टाकायचा होता त्यांची उपेक्षा आणि निंदा कायमची काढून टाकली. ज्या मार्गावर तो चालला त्या मार्गाव सर्वांनी चालायचे अशी त्याची इच्छा आहे म्हणून त्याने सर्वांना सांगितले की.” जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज त्याने स्वत:चा बधस्तंभ घेऊन मला अनुसरावे.” (लूक ९:२३). MHMar 148.2

ख्रिस्ती कार्यकर्त्यांनी लोकांना ते जेथे आहे तेथे त्यांना भेटावे त्यांना शिक्षण द्यावे अशासाठी नाही की त्यांना त्यासाठी गर्व करावा. परंतु त्यांनी आपले चरित्र बनवावे. कारण स्वतः येथून घमेंडीचा धिक्कार केला आहे हे त्यांनी शिकावे त्यांना येशूपासून आत्मत्याग आणि बलिदानाची शिकवण घ्यावी. या सर्व त्यांना शिकवा त्यांना शिकवा की अतिभोग आणि जगिक सुखापासून सावध राहावे. जो बुद्धीने कार्य करण्याचा प्रयत्न करतो त्याला परमेश्वर बुद्धी होईल म्हणजे तो सावध बुद्धीने कार्य करील. तो सर्व विश्वाचा स्वामी आहे सर्व काही त्याचेच आहे म्हणून तो सर्वांना आशीर्वादीत करील. आम्ही विश्वासाने स्वर्गाकडे पाहाणे आवश्यक आहे. आपल्याला दिसणारी निराशामुळे हतबल होऊ नये तर आशा ठेऊन प्रसन्न राहावे व विश्वासाने कार्य करीत राहावे. पृथ्वीवरील त्यांचे हे कार्य सोन्याचांदीपेक्षा अतिमोलवान असते. डोंगर पर्वत बदलत आहेत जीर्ण कापडाप्रमाणे पृथ्वी जुनी घेत आहे. परमेश्वर त्याच्या लोकांसाठी जंगलामध्ये मेज लावतो. त्याचा आशीर्वाद कधीच संपत नाही. MHMar 149.1

“परमेश्वर देवाने मनुष्यास एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करण्यास ठेविले.” (उत्पत्ति २:१५). MHMar 149.2

“शब्बाथ दिवसाची आठवण ठेऊन तो पवित्रपत्रे पाळ. सहा दिवस श्रम करुन आपले सर्व कामकाज कर. पण सातवादिवस तुझा देव परमेश्वर ह्याचा शब्बाथ आहे म्हणून त्यादिवशी कोणतेही कामकाज करु नको, तू. तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझादास, तुझीदासी, तुझी गुरे ढोरे व तुझ्या वेशीच्या आत असलेला उपरी ह्यांनी हि करु नये. कारण सहा दिवसात परमेश्वराने आकाश, पृथ्वी व त्यातील सर्व काही निर्माण केले आणि सातव्या दिवशी विसावा घेतला म्हणून परमेश्वराने सातवा दिवस आशीर्वाद देऊन पवित्र ठरविला.” (निर्गम ८:११). MHMar 149.3

*****