Go to full page →

परिचारीकेचे कर्तव्य : MHMar 169

परिचारीका आणि इतर लोक जे रुग्णाची काळजी घेत असतात. त्यांनी प्रसन्न, हसतमुख, शांत आणि आत्मनियंत्रित असावे. सर्व प्रकारची घाई उत्तेजित आणि भ्रमापासून दूरच राहावे. रुग्णाच्या खोलीचा दरवाजा आवाज न करता उघडावाव बंद करावा. कुटुंबातील सर्वांनी शांतता पाळावी ताप आलेल्या अवस्थेमध्ये अधिकच सावध असणे आवश्यक आहे. ताप उतरत असतांना अधिक काळजी घ्यावी दरवेळी रुग्णावर नजर ठेवावी. सतत कोणीतरी त्याचा ताप पाहावा, ताप चढू देऊ नये. कारण अज्ञान, विसराळूपणा आणि बेसावध पणा रुग्णास घातक ठरु शकतो. जागृकता व सावधपणाने परिचारीकेने रुग्णाची काळजी घेतली तर रुग्ण वाचू शकतो. MHMar 169.1