Go to full page →

यहदी राष्ट्रांना हा बोध संबोधणे COLMar 197

जेव्हा ख्रिस्ताने श्रीमंत मनुष्य व लाजार यांचा दाखला सांगितला त्यावेळी यहुदी राष्ट्रामध्ये कित्येकजण दैन्यावस्थेत होते; त्या श्रीमंत मनुष्याप्रमाणे ते प्रभुची मालमत्ता स्वत:च्या स्वार्थासाठी खर्च करीत असता पुढील विधानाची तयारी करीत होते. ते असे ‘तुला तागडीत तोलिले व तू उणा भरलास‘‘ दानीएल ५:२७ त्या श्रीमंत मनुष्याला त्याच्या जीवनाच्या व आध्यात्मिक गरजा पुरवून आशीर्वादीत केले, पण या आशीर्वादाचा सहभागीपणा करणे यासाठी त्याने परमेश्वराशी सहकार्य करणे हे नाकारले आणि यहुदी राष्ट्राने अगदी असेच केले. यहुदी लोकांना परमेश्वराने पवित्र सत्याचा खजिना असे केले. परमेश्वराच्या कृपेचे कारभारी म्हणून त्यांची नेमणूक केली होती. परमेश्वराने त्यांना प्रत्येक बाबींत जीवनाच्या व आध्यात्मिक व साहाय्य केले आणि याविषयी त्यांनी या आशीर्वादाचा सहभागीपणा इतरांशी करावयाचा होता असे पाचारण त्यांना केले होते. त्यांचे बांधव कसे खितपत पडले होते, त्यांच्या वेशीच्या आत असलेला विदेशी वा परकीय गृहस्थ व त्यांच्यातील गरीब या प्रत्येकाविषयी काय करावयाचे हे त्यांना खासपणे सांगितले होते. त्यांनी सर्व काही त्यांच्यासाठी खर्च करावयाचे नव्हते तर त्यांच्या शेजारी जे गरजु आहेत त्यांची आठवण करून त्यांना मदत करणे, परमेश्वर, त्यांची प्रेमळ वृत्ती, दयाळु सेवा ही पाहून त्यांना आशीर्वाद त्या प्रमाणात देणार होता. पण त्या श्रीमंताप्रमाणे त्या यहुदी लोकांनी दु:खी मानवांच्या जागतिक व आध्यात्मिक गरजा पुरविणे यासाठी त्यांनी त्यांचा मदतीचा हात पुढे केला नाही. परमेश्वराने आम्हांस पाचारण केले आहे याचा अभिमान ते वागवत राहीले आणि मानवाची सेवा करणे व परमेश्वराची भक्ति करणे हे ते विसरले. ते अब्राहामाचे संतान आहेत याच एका शब्दावर ते अवलंबून राहिले. आम्ही अब्राहामाचे वंशज आहो.‘‘ (योहान ८:३३) यावरून असे दिसते त्यांनी परमेश्वराला सोडीले आणि अब्राहाम काय त्यांचा देव समजून त्याजवर विश्वास ठेविला. COLMar 197.1

ख्रिस्ताची आतुरता होती की त्या यहुदी लोकांच्या अंधारी अंत:करणात सत्याचा प्रकाश चमकावा. ख्रिस्त त्यांना म्हणाला, “तुम्ही अब्राहामाची मुले असता तर तुम्ही अब्राहामाची कृत्त्ये केली असती; परंतु ज्याने देवापासून ऐकलेले सत्य तुम्हांस सांगितले त्या मनुष्याला, म्हणजे मला, तूम्ही आता जिवे मारावयास पाहता ; अब्राहामाने असे केले नाही,“योहान ८:३९, ४०. COLMar 197.2

ख्रिस्ताने ओळखिले की वंशावळीत काही गुणधर्म नाही. नैसर्गिक संबंध यापेक्षा आध्यात्मिक संबंध हा सर्वश्रेष्ठ आहे हे त्यांस समजले. यहुदी अब्राहामाचे वंशज हे अभिमानाने सांगत असत पण अब्राहामाची धर्मकृत्त्ये करणे त्यात ते पराभूत होते. ते अब्राहामाचे खरे वंशज नव्हते. हे त्यांनी पटवून दिले त्यांच्या कृत्तीवरून ! जे कोणी परमेश्वराची वाणी ऐकून आध्यात्मिक दृष्टीने अब्राहामाशी सुसंगत होतील तेच अब्राहामाचे खरे वंशज गणले गेले. भिकारी जरी मानवाच्या दृष्टीने कमी दर्जाचा असेल पण जर अब्राहाम त्याला त्याच्या उराशी जवळ धरीतो तर ख्रिस्त त्याला त्याचा जीवलग मित्र म्हणून स्वीकार करील! COLMar 197.3

श्रीमंत मनुष्याच्या सभोवार त्याच्या जीवासाठी सर्व सुखसोई संग्रह होता पण तो इतका अज्ञानी होता की त्याने परमेश्वराला जे स्थान देणे ते, अब्राहामास दिले. त्याला जे सुख प्राप्त होत होते त्याविषयी त्याने आभार मानले असते, आणि परमेश्वराचा आत्मा त्याच्या अंत:करणात व मनात येऊ दिला असता तर त्याची परिस्थिती एकदम वेगळी झाली असती. ज्या राष्ट्रांचा तो प्रतिनिधी होता त्यांचीही परिस्थिती बदलली असती. त्या राष्ट्रांनी परमेश्वराच्या हाकेस कान दिला असता, अर्थात् होकारार्थी उत्तर दिले असते तर ते राष्ट्र वेगळे झाले असते. परमेश्वराच्या योजनेपासून ते इतके दुरावले गेले की त्यांचे सर्व जीवन निरूपयोगी झाले. परमेश्वराने दिलेली प्रत्येक देणगी, परमेश्वराचे कारभारी म्हणून सत्य व धार्मिकता यांचा त्यांनी योग्य उपयोग केला नाही. त्यांनी सार्वकालिक जीवनाचा विचार कधीच केला नाही, आणि त्यांच्या अविश्वासूपणाचा परिणाम म्हणजे सर्व राष्ट्राचा कायमचा नाश हा ठरलेला. COLMar 198.1

यरूशलेमाचा नाश होईल त्यावेळी यहुद्यांना येशूने जो इशारा दिला त्याची आठवण येईल आणि तसे घडले जेव्हा यरूशलेमावर अनर्थ ओढवला, जेव्हा भूक बळी व त्रास आला तेव्हा ख्रिस्ताच्या संदेशाची व दाखला शिक्षण यांची आठवण आली. पमरेश्वराने त्यांना जो संदेश जगाला सांगणेस दिला तो न सांगणे यांत त्यांनी निष्काळजीपणा केला म्हणून त्यांनी त्यांच्यावर दु:खद त्रास ओढावून घेतला. COLMar 198.2