Go to full page →

चांगली जमीन COLMar 32

पेरणारा याला नेहमीच निराशा येणार नाही जे ‘बी’ चांगल्या भूमीवर पेरलेला तो हा आहे की, वचन ऐकूण समजतो, तो फळ देतोच देतो, कोणी शंभरपट, कोणी साठपट, कोणी तीसपट, असे देतो‘‘ मत्तय १३:२३”चांगल्या भूमीवर पेरले ते लोक हे आहेत की ते प्रमाणिक व चांगल्या अंत:करणाचे म्हणजे निष्कपट असे आहेत, ते वचन ऐकतात व त्यानुसार पालन करीतात व सहनशीलतेने फळ देत राहतात. COLMar 32.2

‘प्रामाणिक व चांगले अंत:करण याविषयी दाखल्यात उल्लेख केला ते अंत:करण पापाशिवाय आहे असे नाही’ कारण हा सुवार्ता संदेश जे हरवलेले आहेत त्यांना सागावयाचा आहे. ख्रिस्त म्हणाला, “मी धार्मिक जनास नाही, तर पापीजनास बोलावयास आलो आहे.‘‘ मार्क २:१७. जो कोणी प्रामाणिक असेल तो पवित्र आत्म्याच्या वाणीस उत्तर देऊन त्याचे जीवित समर्पित करील. तो त्याच्या पापांची कबुली करील व परमेश्वराची कृपेची व प्रितीची त्याला गरज भासेल. सत्य समजावे अशी त्याची प्रामाणिक इच्छा असेल आणि त्या सत्याचे तो आज्ञापालन करील. जे अंत:करण चांगले असते ते परमेश्वराच्या वचनावर विश्वास ठेविते. विश्वासाविना वचनाचा स्विकार केला जात नाही, विश्वासावाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे, कारण देवाजवळ (परमेश्वर) जाणाऱ्याने असा विश्वास धरीला पाहिजे की तो आहे, आणि त्याजकडे धाव घेणाऱ्याला तो प्रतिफळ देणारा होतो‘‘इब्री ११:६ COLMar 33.1

“चांगल्या भूमीवर पेरलेला तो हा आहे की वचन ऐकूण समजतो,‘‘ ख्रिस्ताच्या काळातील परूशी सत्याकडे कानाडोळा करीत, ऐकत नसत यामुळे सत्य त्यांच्या अंत:करणात प्रवेश करीत नसत. स्वत:चे अज्ञान व स्वतः पत्करलेला अंधळेपणा याचे प्रायश्चित त्यांनाच सोसावे लागेल. पण ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना असे शिक्षण दिले की त्यांनी मन मोकळेपणाने शिक्षण घेणे व विश्वास ठेवणे, येशूने शिष्यांना आशीर्वाद दिला कारण त्यांच्या डोळयांनी त्यांनी पाहिले व त्यांच्या कानानी त्यांनी ऐकले व विश्वास ठेविला. COLMar 33.2

चांगल्या भूमीत बी पेरले ते लोक हे आहेत, “ते माणसाचे म्हणून नव्हे, तर देवाचे म्हणून स्विकारीले‘‘ १ येस्सलनी २:१३. जो कोणी पवित्रशास्त्र हे देवाचे वचन म्हणून स्विकार करीतो तो खरा शिकणारा विद्यार्थी आहे. ते वचन ऐकूण त्याला थरकाप येतो. कारण ते जीवत वचन आहे. त्या वचनाद्वारे त्याला समज प्राप्त होतो आणि त्या वचनाचा तो स्विकार करीतो. अशा प्रकारे वचन ग्रहण करणारे, कर्नेल्य व त्याचे मित्र होते, ते प्रेषित पेत्रास म्हणाले, ‘‘.... तर आता प्रभूने जे काही आपणाला आज्ञापिले आहे, ते ऐकावे म्हणून आम्ही सर्व येथे देवासमोर (परमेश्वर) आहो‘‘. प्रे.कृ. १०:३३. COLMar 33.3

सत्याच्या ज्ञानाची माहिती ही बुध्दीमत्तेवर नव्हे तर हेतूची शुध्दता यावर अवलंबून आहे, त्यासोबत विश्वासाचा साधेपणा व कळकळ यावर अवलंबून आहे. जे कोणी नम्र अंत:करणाने परमेश्वराचे मार्गदर्शन शोधतात त्यांच्या साहाय्यास देवदूत येतात. सत्याची संपन्न खाण वा खजिना उघडावा यासाठी त्यांना पवित्र आत्मा दिला जातो. COLMar 33.4

“जे लोक चांगली भूमि अशी तुलनात्मक आहेत ते लोक वचन ऐकतात व वचनाप्रमाणे आज्ञा पालन करीतात‘‘ COLMar 34.1

सत्याचे वचन ऐकणे व वाचणे एवढेच पुरेसे नाही. ज्या कोणास पवित्रशास्त्र वचनाचा आशिर्वाद पाहिजे त्याने सत्य वचनावर ध्यान, मनन करावे, काळजीपूर्वक वचन वाचणे, प्रार्थनापूर्वक त्यावर विचार करणे, सत्य वचनाचा खरा अर्थ समजून घेणे व पवित्र आत्म्याद्वारे वचनरूपी पाणी पिणे. COLMar 34.2

महान् विचार व शुध्द विचार यांनी आपले मन भरावे अशी परमेश्वराची इच्छा आहे. परमेश्वराची कृपा व प्रिती यावर आपण मनन करावे अशी परमेश्वराची इच्छा आहे. तारणाची योजना यात प्रभूचे महान कार्य याचाही अभ्यास करावा. यामुळे आम्हांस सत्याचे ज्ञान अधिक स्पष्ट होईल, अधिक सत्याची पवित्रता समजेल, अंत:करणाची शुध्दता व विचाराची स्पष्टता कळून येईल. पवित्र शास्त्राच्या अभ्यासाद्वारे परमेश्वराशी दळणवळण होईल, मनाचा पालट होईल, आत्मा पवित्र वातारणात वाढेल. COLMar 34.3

जे कोणी वचन ऐकतील ते, वचन पाळतील म्हणजे वचनाप्रमाणे आज्ञापालन करीत राहतील. परमेश्वरांच्या वचनाचा मनात स्विकार केला त्यानुसार चांगली कृत्ये केली जातील. आणि याचा परिणाम म्हणजे ख्रिस्ताचे शील व जीवन याप्रमाणे आपलेही शील व जीवन होईल. ख्रिस्त स्वत:विषयी म्हणाला, “हे माझ्या देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यात मला संतोष आहे, तुझे शास्त्र माझ्या अंतर्यामी आहे.‘‘ स्तोत्र. ४०:८. “कारण मी आपली इच्छा नव्हे तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावयाला पाहतो’ योहान ५:३० आणि पवित्र शास्त्र म्हणते, “मी त्याजमध्ये राहतो, असे म्हणणाऱ्याने तो चालला तसे स्वत:ही चालले पाहिजे”१. योहान २:६. COLMar 34.4

मनुष्याची पिढीजात, त्याचा स्वभाव व त्याच्या सवयी यांचा व परमेश्वराचे वचन यात लढा चालतो. चांगल्या मातीत पेरलेले ते सर्व ऐकतात, वचनाचा स्विकार करीतात व त्या वचनाच्या सर्व अटी व अपेक्षा स्विकार करीतात. त्याच्या सवयी, चालीरिती व आचरण ही सर्व परमेश्वराच्या वचनाप्रमाणे केली जातील. जो महान सार्वभौम परमेश्वर त्याच्यापुढे मर्यादित मानव-चुकणारा प्राणी हा काहीच नाही. असा मानव संपूर्ण अंत:करणाने, अगदी एकमेव हेतूने सार्वकालिक जीवन प्राप्त करणेचा शोध करीत आहे, असे करणे यात हानी होते वा येईल, छळ किंवा प्रसंगी मरणही आले तरी परमेश्वराची आज्ञा पालन करणे हा निर्णय पार पाडणे. COLMar 34.5

यास्तव असे करीत ‘सहनशीलतेने’ फळ देणे जे कोणी परमेश्वराचे ‘वचन’ स्विकारतात त्यांच्यावर छळ व संकटे ही येणार, पण जेव्हा संकटे येतात तेव्हा खरे ख्रिस्ती घाबरत नाहीत, अविश्वासू बनत नाहीत वा निराश होत नाहीत. आपला जो प्रसंग किंवा यात परमेश्वराचा कोणता हेतू आहे हेही कळत नाही म्हणून केव्हाही परमेश्वरावरील विश्वास ढळू देऊ नये. परमेश्वराची कोमल प्रिती अगाध प्रिती ही ध्यानात घेऊन आपण आपली सर्व चिंता त्याजवर टाकणे, परमेश्वरावर अवलंबून राहणे व सहनशीलतेने वाट पाहणे व प्रभुपासून प्राप्त होणारे तारण याबाबत आनंद करणे. COLMar 34.6

संघर्षाद्वारे आध्यात्मिक जीवनास बळ येते. छळ योग्य सहन केले म्हणजे शीलसंवर्धनात वाढ होते आणि मौल्यवान आत्मिक कृपा प्राप्त होते. विश्वासाची परिपूर्ण फळे, नम्रता व प्रिती यांची वाढ जीवनातील वादळी वातावरण व अंधारी परिस्थितीत निर्माण होतात. COLMar 35.1

“अहो बधूनो, प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा. पाहा, शेतकरी भूमीच्या मौल्यवान पिकाची वाट पाहत असता, त्यास पहिला व शेवटला पाऊस’ मिळेपर्यंत त्याविषयी, तो धीर धरितो’ याकोब ५:७ त्याचप्रमाणे ख्रिस्ती मनुष्याने त्याच्या जीवनात परमेश्वराच्या वचनाद्वारे फळ येईपर्यंत धीराने वाट पाहत असावे. परमेश्वराची कृपा प्राप्त व्हावी यासाठी आम्ही पुष्कळदा प्रार्थना करीतो आणि आपल्या प्रार्थनेचे उत्तर मिळावे यासाठी परमेश्वर आम्हास त्या परिस्थितीत नेतो व तेथे आम्हास फलप्राप्ती होते, पण आम्हास परमेश्वराचा हेतू समजून येत नाही. त्यामुळे आम्ही गोंधळात पडतो व कधी निराशही होतो. काही झाले तरी आत्म्याद्वारे कृपेची फळे यावीत यासाठी जो ठराविक नैसर्गिक मार्ग आहे. त्याद्वारेच फलप्राप्ती होते. आमचा भाग म्हणजे परमेश्वराचे वचन स्विकारणे व ते दृढ धरून राहणे, आम्ही वचनाप्रमाणे करीत राहणे आणि वचनाचा जो हेतू आहे तो सिध्दीस जाईल. COLMar 35.2

“येशने त्याला उत्तर दिले. “कोणाचे मजवर प्रेम असेल तर तो माझे वचन पाळील आणि माझा पिता त्याजवर प्रेम करील, आणि आम्ही त्याजकडे येऊन त्याजबरोबर वस्ती करू.”योहान १४:२३ आपला जीवंत संबंध सर्व शक्तिमान याजशी राहील त्यामुळे आपले मन सामर्थ्यवान व पूर्ण असे राहील. आपल्या जीवनात देवाचे सामर्थ्य येईल आणि व आम्ही ख्रिस्ताधीन असे राहू. त्यानंतर आम्ही केव्हाही स्वार्थी व सामान्य जीवन जगणार नाही कारण ख्रिस्त आमच्या ठायी जगेल. आमच्या स्वभावात ख्रिस्ताचा स्वभाव दिसून येईल. अशाप्रकारे आमच्याठायी पवित्र आत्म्याची फळे येतील — “कोठे तीसपट आणि साठपट, आणि शंभरपट‘‘ अशी येतील. COLMar 35.3