Go to full page →

अध्याय ७ वा—खमिरा सारखे COLMar 57

मत्तय १३:३३, लूक १३:२०,२१ यावर आधारीत

“त्याने (येशू) त्यांस आणखी एक दाखला सांगितला की स्वर्गाचे राज्य खमिरासारखे आहे, ते एका स्त्रीने घेवून तीन मापे पिठामध्ये लपवून ठेविले, तेणेकरून शेवटी ते सर्व फुगून गेले’ मत्तय १३:३३. COLMar 57.1

गालील संदेष्टयाचे ऐकावयास पुष्कळ सुशिक्षित व भारदस्त गृहस्थ आले होते. समुद्र काठी जो लोक समुदाय ख्रिस्ताचे शिक्षण ऐकत होते. त्यांच्याकडे पाहात वरील लोक पाहात होते. या लोकसमुदायांत सर्व प्रकारचे लोक होते, त्या लोकांत गरीब होते, अडाणी होते, निरक्षर होते, कंगाल व भिकारी होते, चेहऱ्यावर गुन्हा चिन्ह असलेले चोर होते. लंगडे, जीवन उध्वस्त झालेले, व्यापारी होते, सुखी लोक होते, थोर व साधारण, श्रीमंत व गरीब लोक होते. ते सर्व ख्रिस्तानजीक जावून त्याचा संदेश ऐकावयास गर्दी करीत होते. अशा विचित्र लोक समुदायाकडे पाहात ते भारदस्त लोक म्हणू लागले की, परमेश्वराच्या राज्यात अशाच लोकांची भरती आहे की काय ? पुन्हा अशा विचारास तारणारा दाखला देवून उत्तर देतो. COLMar 57.2

“स्वर्गाचे राज्य खमिरासारखे आहे, ते एका स्त्रीने घेवून तीन मापे पीठामध्ये लपवून ठेविले, तेणेकरून शेवटी ते सर्व फुगून गेले.” COLMar 57.3

यहुदी लोक कधी खमिराची उपमा पापास देत असत. वल्हाडण सणाच्या वेळेस लोकांना सांगितले जात असे की, त्यानी सर्व पाप त्यांच्या मनातून म्हणजे घरातून काढून टाकावयाचे होते. ख्रिस्ताने शिष्यांना बजावून सांगितले की, “तुम्ही आपणास परूश्याच्या खमिरराविषयी म्हणजे ढोंगाविषयी संभाळा.’ लूक १२:१ प्रेषित पौलाचे म्हणणे, यास्तव जुन्या खमिराने, अगर वाईटपणा व दुष्टपणा,..’ १ करिंथ ५:८. पण तारणारा याने हा दाखला दिला त्यातील खमिर हे स्वर्गीय राज्याविषयीचे दर्शक आहे. यातील खमिराचे दर्शक वा कार्य उत्तेजन देणे व परमेश्वराच्या कृपेत एकरूप होणे होय. COLMar 57.4

कोणीही इतके दुष्ट नाहीत. कोणीही इतके दुष्टतेंत नीचावस्थेला पोहचलेत की ते परमेश्वराच्या कृपेच्या पलीकडे गेले आहेत. जे कोणी पवित्र आत्म्याच्या स्वाधीन स्वत:स करतील त्यांच्या ठायी नवजीवनाचे तत्त्व येईल व परमेश्वराचे हरवलेले स्वरूप मानवात पुर्नस्थापित केले जाईल. COLMar 58.1

परंतु मनुष्याला त्यांच्या इच्छाशक्तिच्या बळाने हे करीता येत नाही. हा फरक प्रभावी व कार्यकारी व्हावा यासाठी मानवात अशी शक्ति नाही. पिठात जो बदल व्हावयास पाहिजे त्यासाठी पिठात खमिरच घातले पाहिजे. तद्वत् पापी मनुष्य गौरवी राज्यात जाणेपुर्वी त्यास परमेश्वराची कृपा प्राप्त झाली पाहिजे. पापी बाळक, स्वर्गीय बाळक व्हावे यासाठी जगिक शिक्षण व संस्कृती ही निरूपयोगी ठरतील. मानवाच्या जीवनाचे रूपांतर व्हावे यासाठी परमेश्वराच्या सामर्थ्याची गरज आहे. केवळ पवित्र आत्म्याद्वारे मानवी जीवनांत फरक होवू शकतो. ज्या कोणाला तारण हवे, मग ते श्रीमत व गरीब, श्रेष्ठ वा कनिष्ठ असोत त्या सर्वानी पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याला कार्य करू दिले पाहिजे. COLMar 58.2

“धन्य ते जन, जे आपले वर्तन चोख ठेवून परमेश्वराच्या शास्त्राप्रमाणे चालतात. धन्य ते जन, जे त्याचे निर्बध पाळून त्याला मन:पूर्वक शरण जातात. ते काही अधर्म करीत नाहीत, तर त्याच्या मार्गाने चालतात. तुझे विधी आम्ही मन:पूर्वक पाळावे म्हणून तू ते आम्हांस लावून दिले आहेत. तुझे नियम पाळावयासाठी माझी चालचलणूक व्यवस्थित असावी, हेची माझे मागणे आहे‘‘. स्तोत्रसंहिता ११९:१-५. COLMar 58.3

खमिर जसे पिठात मिश्रण होते व आतून कार्य करीते व नंतर पिठ फुगते,तद्वत् ‘परमेश्वर कृपेने अंत:करणाचे पुर्नजीवन होते व नंतर आपले शील पालटते. आम्ही परमेश्वराच्या इच्छेशी सहमत व्हावे यासाठी केवळ बाह्यात्कारी बदल होणे याची आवश्यकता नाही. पुष्कळजण त्यांच्या जीवनातील अनेक वाईट सवयी सुधारणेचा प्रयत्न करीतात व ख्रिस्ती होवू पाहतात. आपले प्रथम कार्य म्हणजे आपल्या अंत:करणाचा पालट झाला पाहिजे‘. COLMar 58.4

विश्वासाची कबुली व सत्याचा मालकी हक्क ही आत्म्यांत असणे दोन भिन्न गोष्टी आहेत. सत्याची केवळ माहिती असणे ही पुरेशी नाही. आम्हांला सत्य माहित असेल पण आपले विचार मात्र बदलले नसतील. आपल्या अंत:करणाचा पालट झाला पाहिजे व पवित्र झाले पाहिजे. COLMar 58.5

आपणास आज्ञापालन केले पाहिजे; या दृष्टीने जो कोणी आज्ञापालन करील त्याला आज्ञापालनाचा खरा आनंद प्राप्त होणार नाही. खरे पाहता तो आज्ञापालन करीत नाही. मानवी ज्या प्रवृत्ती आहेत त्यावर परमेश्वराच्या आज्ञाचे बंधन येते असे जीवन, ख्रिस्ती जीवन नाही. खरे आज्ञापालन हे ख्रिस्ताच्या तत्त्वाप्रमाणे असते. त्याचा उगम धार्मिकतेच्या प्रितीतून असतो, तो म्हणजे परमेश्वराचे नियम याविषयी मनात प्रिती असणे. धार्मिकतेचे मर्म म्हणजे तारणारा येशूशी प्रामाणिक असणे. यामुळे आम्ही योग्य ते करू कारण ते योग्य आहे. कारण योग्य करणे यात परमेश्वरास संतोष होतो. COLMar 59.1

“हे परमेश्वरा, तुझे वचन स्वर्गात सर्वकाळ स्थिर आहे. तुझी सत्यता पिढयानपिढया आहे, तू पृथ्वी स्थापिली व ती तशीच कायम आहे. ती तुझ्या निर्णयाप्रमाणे आजपर्यत कायम राहिली आहेत, कारण सर्व काही तुझी सेवा करीत आहेत...... तुझे विधी मी कधीही विसरणार नाही, कारण तू त्यांच्यायोगे मला नवजीवन दिले आहे. मी तझे निर्बंध ध्यानात धरीन. सर्व पूर्णतेला मर्यादा आहे हे मी पाहिले आहे, तुझी आज्ञा अत्यंत व्यापक आहे‘‘ स्तोत्रसंहिता ११९:८९-९६. COLMar 59.2

अंत:करणाचा पालट हे महान सत्य पवित्र आत्म्याद्वारे ख्रिस्ताच्या शब्दांत निकदेमास सांगितले. “मी तुला खचित खचित सागतो. नव्याने जन्मल्यावाचून कोणालाही, देवाचे राज्य पाहता येत नाही... जे देहापासून जन्मले ते देह आहे, आणि जे आत्म्यापासून जन्मले ते आत्मा आहे. तुम्हास नव्याने जन्मले पाहिजे हे मी तुला सांगितले म्हणून आश्चर्य मानू नको. वारा पाहिजे तिकडे वाहतो, आणि त्याचा नाद तू ऐकतोस, तरी तो कोठून येतो व कोठे जातो हे तुला कळत नाही. जो कोणी आत्म्यापासून जन्माला त्याचे असेच आहे”योहान ३:३-८. COLMar 59.3

प्रेषित पौल पवित्र आत्म्याने प्रेरित होवून त्याच्या लिखानात सांगतो, तरी देव दयाधन आहे म्हणून आपण आपल्या अपराधामुळे मृत झालो असताही त्याने आपल्यावरील स्वत:च्या परम प्रेमामुळे ख्रिस्ताबरोबर आपणाला जीवंत केले, (तुमचे तारण कृपेने झाले आहे) ख्रिस्त येशूमध्ये त्याच्यासह उठविले आणि त्याच्यासह स्वर्गलोकी बसविले, यासाठी की ख्रिस्त येशूमध्ये त्याची आपल्यावर जी ममता तिच्याद्वारे येणाऱ्या युगात त्याने आपल्या कृपेची अपार संपत्ति दाखवावी. तुमचे तारण कृपेनेच विश्वासाच्याद्वारे झाले आहे आणि हे तुमच्या हातून झाले नाही, तर हे देवाचे दान आहे.’ इफिस २:४-८. COLMar 59.4

पिठात लपवून ठेविलेले खमिर अदृश्यपणे कार्य करीत असते व संपूर्ण पिठाला फुगविते. तद्वत् सत्याचे कार्य गुप्तपणे चालते, शांतपणे, हळूवार त्या आत्म्याचे परिवर्तन करीते. स्वाभाविक प्रवृत्ती ही बदलून नरम करीते. नवीन विचार, नवीन भावना, नवीन ध्येय यांची उभारणी केली जाते. COLMar 60.1

“तुझ्या (परमेश्वर) रास्त निर्णयाचे ज्ञान मी प्राप्त करून घेईन तेव्हा मी सरळ मनाने तुझे सांत्वन करीन. मी तुझे नियम पाळीन.‘‘ स्तोत्रसंहिता ११९:७,८. COLMar 60.2

ख्रिस्ताचे जीवन हा शीलाचा नवीन आदर्श ठरविला. मनाचा पालट झाला. नवीन कृतीसाठी सामर्थ्याची जागृती केली गेली. मनुष्याला नवीन सामर्थ्य दिले नाही तर जे सामर्थ्य दिले आहे तेच पवित्र केले जाते. सद्विवेकबुध्दी जागृत केली जाते. आम्हांस असे गुण दिले आहेत की त्याद्वारे आपले शील असे होईल की आपण परमेश्वराची सेवा करणेसाठी कर्तबगार होवू. COLMar 60.3

मग बहुधा असा प्रश्न उद्भवतो की, जे लोक परमेश्वराच्या वचनावर विश्वास आहे असे सांगतात त्यांच्या शब्दांत, स्वभावात व कृतीत काहीच धर्मसुधारणा का दिसत नाही? त्यांचा हेतू व योजना यांना विरोध झालेला त्यांना का सहन होत नाही? त्यांच्यात अद्यापि अपवित्र राग आहे, ते कठोर शब्द बोलतात, ते घमेंडखोर व चिडखोर का आहेत ? त्यांच्या जीवनात स्वार्थ दिसून येतो, स्वार्थी कार्ये, स्वार्थी स्वभाव व अविचारी शब्द व असे सर्व जगिक लोकांत दिसते असे त्यांच्यात का दिसते ? त्यांच्यात भावनात्मक गर्व, स्वाभाविकपणे वागणे, त्यांची वक्रदृष्टी व विपर्यास अर्थ, जणू काय त्यांनी सत्य हे ऐकलेच नाही असे ते वागतात. या सर्वांचे मुख्य कारण हे की त्यांचा पालट झालेला नाही. त्यांच्या अंत:करणात सत्यखमीर हे लपवून ठेविले नाही. त्या सत्य खमिराचे कार्य होवू दिले नाही. त्यांचा स्वाभाविक स्वभाव व द्रष्टतेकडे कला ही काय सोडून दिली नाहीत व जीवनाचा पालट करणारे सामर्थ्य हे स्विकारले नाही. त्यांच्या जीवनात ख्रिस्त कृपेची उणीव दिसून येते वा ख्रिस्ताचे सामर्थ्य हे जीवनाचा पालट करू शकते. यावर त्यांचा अविश्वास दिसतो. COLMar 60.4

“तरूण आपला वर्तनक्रम कशाने शुध्द करील?
तुझ्या वचनाप्रमाणे सावधान राहण्याने. सर्व मनाने
तुला मी शरण आलो आहे, तुझ्या आज्ञापासून
मला बहकू देवू नको. मी तुझ्याविरूध्द पाप करू नये
म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेविले आहे…..
मी तुझ्या विधींचे मनन करीन, तुझ्या मार्गाकडे लक्ष देईन.
मी तुझ्या नियमानी सुख पावेन, मी तुझे वचन विसरावयाचा नाही’ COLMar 61.1

स्तोत्रसहिता ११९:९-१६.

“विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाने होते. रोम १०:१७ पवित्रशास्त्र या महान आध्यायाद्वारे शीलाचे परिवर्तन होते. ख्रिस्ताने प्रार्थना केली, “तु सत्यात त्यास पवित्र कर, तुझे वचन हेच सत्य आहे‘‘ योहान १७:१७. जर परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास केला व आज्ञा पालन केले तर ते अंत:करणात कार्य करून आमची दुष्ट कत्ये आमच्या ताब्यात आणते. पवित्र आत्मा येवून आमच्या पापाची खात्री करून देईल व आपल्यात स्फुरण पावणारा विश्वास ख्रिस्त प्रितीने आपल्या ठायी तन, मन व आत्मा यात ख्रिस्ताची प्रतिमा ठाम करील. यानंतर परमेश्वर आमचा उपयोग, त्याच्या इच्छेप्रमाणे करणेस उपयोग करून घेईल. आम्हाला जे सामर्थ्य दिले ते आम्हात कार्य करीते व जे सत्य आम्हाला दिले ते आम्ही इतराना सागावयास मदत करते. COLMar 61.2

मानवाची महान गरज भागविणे म्हणजे मानवाचा पालट करणे यासाठी परमेश्वराचे वचन विश्वासाने मानवास मदत करीते. ही महान सत्य तत्त्वें मानवाच्या दरारोजच्या जीवनात येवून जीवन पवित्र व शुध्द करणे ही गरज आहे. ही जी सत्य वचने व तत्त्वे आहेत ती मानवास स्वर्गात नेणारी व जीवनात होकायंत्राप्रमाणे आहेत, तरीपण याचा मानवी स्वभावात समावेश होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही सर्व तत्त्वे मानवाच्या महान व लहान गोष्टीत दिसून आली पाहिजेत. COLMar 61.3

“हे परमेश्वरा, तू आपल्या नियमांचा मार्ग मला दाखीव, म्हणजे तो मी शेवटपर्यत धरून राहीन. मला बुध्दि दे, म्हणजे मी तुझें नियमशास्त्र पाळीन; खरोखर अगदी मनापासून ते मी पाळीन. तू आपल्या आज्ञाच्या मार्गाने मला चालीव; त्यातच मला आनंद आहे. तूं आपले भय धरणाऱ्यांना दिलेले वचन आपल्या दासासंबंधानें खरें कर. मला निंदेचे भय आहे म्हणून ती दूर कर, कारण तुझे निर्णय उत्तम आहेत.‘‘ स्तोत्रसंहिता. ११९:३३-३९. COLMar 61.4

सत्याचे खमिर अंत:करणात स्विकारले म्हणजे त्यामुळे आमच्या मनिषा, विचारांची शुध्दता व स्वभावाची गोडी ही शिस्तवार व नियमित चालतात. त्यामुळे मनाला प्रेरणा मिळते व आत्म्यास उत्तेजन प्राप्त होते. आपल्या भावना व प्रिती यासाठी मनाचा थोरपणा वाढला जातो. COLMar 61.5

जो मनुष्य अशा तत्त्वाप्रमाणे चालतो त्याबाबत अद्भुत चमत्कार समजतात. स्वार्थी, धनलोभी हे लोक सर्व काही स्वत:साठी गोळा करीत असतात. धन सन्मान व जगिक सुख ही त्यांनाच हवी असते. अशा लोकांना त्यांच्या स्वार्थापायी स्वर्गीय राज्य गमवावे लागते. पण जे ख्रिस्ताचे अनुयायी आहेत त्यांचे लक्ष अशा गोष्टींत गुंतवणार नाही. ख्रिस्तासाठी तो सत्कार्य करणे व स्वनाकार यात सर्ववेळ खर्च करील यासाठी की या महान कार्याद्वारे ज्या लोकांना ख्रिस्त प्राप्त झाला नाही व ज्यांना तारणाची आशा नाही अशा लोकांसाठी तो, कार्य करील. जो मनुष्य स्वर्गीय नगर द्रष्टीसमोर ठेवितो असा मनुष्य जगाला समजणार नाही. कारण त्याच्या अंत:करणात ख्रिस्ताची प्रिती व त्याचे तारणदायी सामर्थ्य ही आली आहेत. ख्रिस्ताच्या या प्रितीने हा मनुष्य त्याचे सर्व ध्येय, या जगिक नाशक गोष्टीहून उच्च असे असते. COLMar 62.1

“तुझें वचन माझ्या पावलांकरितां दिव्यासाखें व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. तुझे न्याय्य निर्णय पाळीन अशी शपथ मी वाहिली आहे, व ती निश्चित केली आहे... तुझे निबंध माझें सर्वकाळचे वतन म्हणून मी स्विकारिले आहेत, कारण त्यांच्या योगे माझ्या मनाला हर्ष होतो. तुझे नियम सर्वकाळ शेवटपर्यंत पाळण्याकडे मी आपले मन लाविलें आहे.”स्तोत्रसंहिता ११९:१०५-११२. COLMar 62.2

परमेश्वराच्या वचनाचे पवित्रीकरण याचा पगडा, आम्ही ज्या मानवाशी संबधीत वा व्यवहार करू त्यांच्यावर झाला पाहिजे. सत्याचे खमिर यामुळे द्वेष भावना येणार नाहीत, ध्येयाची लालसा वाटणार नाही व प्रथम हुद्दा हा विचार येणार नाही. खरी स्वर्गीय प्रिती स्वार्थी व बदलणारी नाही. अशी प्रिती मानवी स्तुतीवर अवलंबून राहत नाही. ज्याच्या अंत:करणात कृपा आहे ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला त्यांच्यासाठी प्रिती राहील. स्वत:ला मान्यता मिळावी यासाठी केव्हाही प्रयत्न केला जाणार नाही. लोक त्यांच्यावर प्रिती करीतात, त्याची स्तुती करीतात, त्याच्या गुणांची वाखाणणी करीतात म्हणून तो त्यांच्यावर प्रिती करीतो असे नव्हे तर, ख्रिस्ताने त्यांना खंडणी देवून विकत घेतले म्हणून तो त्यांच्यावर प्रिती करीतो. जर त्याचे ध्येय, शब्द वा कार्य याबाबत गैरसमज झाला वा गैर प्रतिनिधित्व केले तर त्याबाबत त्याला अपमान वाटत नाही, तर तो त्याचे कार्य व मार्ग ही बदलत नाही. तो दयाळू व विचारी, स्वत:चे विचार नम्रपणे मांडतो. प्रत्येक बाबीत आशा धरीतो व परमेश्वराची प्रिती व कृपा यावर खंबीर विश्वास सतत ठेवितो. COLMar 62.3

प्रेषित आम्हास बोध करीतो, “तर ज्याने तुम्हांस पाचारण केले तो जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा, तर ज्याने तुम्हास पाचरण केले तो जसा पवित्र आहे तसे तुम्हीही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा. कारण, मी पवित्र आहे यास्तव तुम्ही पवित्र व्हा‘‘ १ पेत्र १:१५, १६ ख्रिस्ताच्या कृपेने आपला राग व आवाज ती ताब्यात आली पाहिजेत. ख्रिस्त कृपेचा परिणाम म्हणजे सभ्यता व कोमल वा प्रेमळ वागणुक एक भाऊ दुसऱ्या भावाशी, दयाळू शब्द वापरील, उत्तेजित शब्द देईल. जणु काय घरात देवदुताचे वास्तव्य आहे. त्या घरातील वातावरण सृरात, जणु काय त्या घरातुन सुगध निघून पवित्र परमेश्वरापाशी, सहानुभूती व सहनशिलता तेथे दिसून येईल. COLMar 63.1

चेहरा बदलून जातो. ज्या अंत:करणात ख्रिस्ताची वस्ती राहते त्यांचा चेहरा बदलून जातो कारण असे लोक ख्रिस्तावर प्रिती करीतात व त्याच्या आज्ञा पाळतात. तेथे सत्य लिहिलेले आहे. स्वर्गीय गोड शांति तेथे वस्ती करीते. मानवी प्रितीहून अधिक अशी सभ्यता व सद्गुण तेथे दिसतात. COLMar 63.2

सत्य खमिराने मनुष्याच्या संपूर्ण अंत:करणाचा पालट होतो, असभ्य मनुष्य संस्कृत, आडदांड मनुष्य सौम्य, स्वार्थी मनुष्य उदारमनाचा होतो. अशा प्रकारे अशुध्द शुध्द केले जातात, ख्रिस्त कोकऱ्याच्या रक्तात धुतले जातात. त्याच्या जीवन सामर्थ्याद्वारे त्या सर्वांची मने, आत्मा व शक्ति परमेश्वराच्या जीवनाचे अनुकरण करीतात. मनुष्य त्याचा मानवी स्वभाव याद्वारे परमेश्वराच्या स्वभावाचा भागीदार होतो. त्यांचा तो पूर्ण स्वभाव व सर्वश्रेष्ठ स्वभाव याद्वारे ख्रिस्ताचा सन्मान होतो. अशा प्रकारे स्वभावाचा बदल पाहून स्वर्गीय देवदूत आनंदाने गाणे गातात, परमेश्वर बाप व ख्रिस्त, जेव्हा पाहतात की मानव आणि हे स्वभावाने परमेश्वराच्या स्वभावाचे प्रतिकृती झाले आहेत, तेव्हा (परमेश्वर) आनंदीत होतो. COLMar 63.3