Go to full page →

ठेवीचे मोल COLMar 66

लोक धनसंपत्ती मिळविणे यात गुंतले होते व सार्वकालिक जीवनाकडे दुर्लक्ष करीत होते असे तारणारा येशूला दिसले. लोकांची ही दुष्टता कशी काय सुधारावी हे कार्य येशूने हाती घेतले. या मोहात लोक पडले त्यामुळे त्यांचे आत्मे निर्जीव वा निष्क्रीय झाले होते. अशा परिस्थितीत येशू मोठयाने म्हणाला, “मनुष्य सर्व जग मिळतील आणि आपला जीव गमावील तर त्याला काय लाभ होईल ? अथवा मनुष्य आपल्या जिवाचा मोबदला काय देईल?‘‘ मत्तय १६:२६. पतित मानवापुढे सर्वश्रेष्ठ सार्वकालिक जगाविषयी येशू त्यांना दाखवितो आणि मानव त्याचा विचारही करीत नाही, परमेश्वराचे अवर्णनीय गौरव, एकच देव व त्याची अमोल ठेव दाखवितो. COLMar 66.5

त्या ठेवीचे मोल सोने वा चांदी याहून अधिक आहे. या पृथ्वीवरील खाणीची कोणतीही संपत्ती स्वर्गीय ठेवीशी तुलना करू शकत नाहीत : COLMar 67.1

“अगाध जलाशय म्हणतो, ते माझ्या ठायी नाही,
समुद्रही म्हणतो, ते माझ्याजवळ नाही.
उत्कृष्ट सुवर्ण देवून ते मिळत नाही,
चांदी तोलून देवून त्याचे मोल होत नाही
ओफीरचे सोने, गोमेद व नीलमणि
ही वारंवार देवूनही त्याचे मोल होत नाही.
सोने व कांचनमणि ही त्याच्या बरोबरीची नाहीत,
उंची सोन्याच्या नगांनी त्याचा मोबदला होत नाही.
प्रवाळ व स्फटीक यांची काय कथा ?
ज्ञानाचे मोल मोत्याहून अधिक आहे. COLMar 67.2

ईयोब २८:१४-१८

पवित्रशास्त्रातील सापडणारी ठेव ही आहे. पवित्रशास्त्र हे परमेश्वराचे महान शालेय क्रमिक पुस्तक आहे. सर्व सत्य विज्ञानाचा पाया पवित्रशास्त्रात आहे. प्रत्येक शास्त्रीय ज्ञानाची शाखा पवित्र शास्त्रात आढळून येते. COLMar 67.3

परमेश्वराच्या पवित्रशास्त्रातून शोध केल्यास ज्ञानाचे सर्व विभाग आपणास सापडतील. आणि या सर्वाहून विशेष हे आहे की, पवित्रशास्त्रामध्ये सर्व शास्त्राचे शास्त्र, तारणाचे शास्त्र याचा समावेश आहे. पवित्रशास्त्र हे शोधता येणार नाहीत इतक्या मौल्यवान गोष्टींची खाण आहे. COLMar 67.4

परमेश्वराच्या शब्दाचा अभ्यास करून व त्याचे पालन करून आपण उच्च शिक्षण मिळवू शकतो. जी पुस्तके आपणास परमेश्वराकडे व त्याच्या राज्याकडे घेवून जात नाहीत, त्याच्यासाठी जर आपण देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष केले तर त्याद्वारे मिळणाऱ्या शिक्षणाद्वारे आपण देवाच्या नावाचा दुरूपयोग करतो. COLMar 67.5

निसर्गामध्ये किती अद्भूत सत्ये आहेत. पृथ्वी, समुद्र व आकाश सत्याने भरली आहेत. ते आमचे शिक्षक आहेत. स्वर्गीय ज्ञान व सार्वकालिक सत्य निसर्ग सादर करतात. पण पतन पावलेल्या मानवाला हे समजत नाही. पापाने त्याची नजर अधूक केली आहे आणि जो पर्यंत तो परमेश्वराचे सहाय्य घेत नाही तो पर्यंत त्याला निसर्ग समजणार नाही. जे देवाच्या शब्दाचा धिक्कार करतात त्याच्या मनावर परमेश्वराच्या सत्याचा परिणाम होणार नाही. त्यांच्या शिकवणीमुळे माणसाची मने परमेश्वराकडून बहकुन जातात. COLMar 67.6

काही लोकांच्या मते, मनुष्याचे ज्ञान स्वर्गीय शिक्षकापेक्षा उच्च आहे व परमेश्वराचे पुस्तक जुन्या मताचे व गोडी नसलेले आहे. पण ज्यांना पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन आहे त्यांना असे वाटत नाही. ते अमोल धन आहे व ते प्राप्त करून घेण्यासाठी पाहिजे ती किंमत देण्यास तयार आहेत. जगातील प्रसिध्द समजले जाणाऱ्या लेखकापेक्षा ते महान शिक्षकाच्या (ख्रिस्ताच्या) लिखाणाची निवड करतात. त्या महान लेखकाने आमच्यासाठी आपला प्राण दिला, अशासाठी की आपणास सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. COLMar 68.1