Go to full page →

अध्याय ५७—“तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे” DAMar 452

लूक १८:१८-२३; मार्क १०:१७-२२; मत्तय १९:१६-२२.

“मग तो निघून वाटेस लागणार तोच एकाने धावत येऊन व त्याच्यापुढे गुडघे टेकून विचारिले, उत्तम गुरजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळण्यास मी काय केले पाहिजे?” DAMar 452.1

ज्या तरुणाने हा प्रश्न विचारिला तो एक अधिकारी होता, त्याला पुष्कळ धनसंपत्ति होती व चांगला हुद्दाही होता. ख्रिस्ताकडे आणिलेल्या लहान मुलावर तो कसा प्रेम करितो हे त्याने पाहिले होते. तो त्यांना मायेने वर उचलून गोंजारीत असे हे त्याने पाहिले होते त्यामुळे त्यांच्या मनात ख्रिस्ताविषयी प्रेम जागृत झाले होते. आपण त्याचा शिष्य व्हावे असे त्याला वाटले. त्याच्या मनावर इतका परिणाम झाला होता की ख्रिस्त वाटेने जात असताना तो त्याच्यामागे पळत गेला व त्याच्यापुढे गुडघे टेकून मनापासून कळकळीने सर्वांना महत्त्वाचा वाटणारा प्रश्न त्याने विचारला, “उत्तम गुरूजी, सार्वकालिक जीवन हे वतन मिळण्यास मी काय केले पाहिजे?” अधिकाऱ्याच्या प्रांजळपणाची कसोटी घेण्याचे आणि तो त्याला उत्तम का म्हणत आहे हे पाहाण्याचे येशूच्या मनात होते. ज्याच्याशी तो बोलत होता तो देवपुत्र होता हे त्याला स्पष्ट कळले होते काय? त्याच्या मनाची संपूर्ण प्रतिक्रिया काय होती? DAMar 452.2

स्वतःच्या धार्मिकतेविषयी त्याचे मत उच्च होते. त्याच्यात कसलीच उणीवता नव्हती असे त्याला वाटत होते तरी तो सपूर्णतः समाधानी नव्हता. आवश्यक असलेल्या गोष्टीची त्याच्यात वाण असल्याचे त्याला भासत होते. लहान मुलांना जसा आशीर्वाद दिला तसा आशीर्वाद मला देऊन माझ्या मनाचे समाधान येशू करू शकणार नाही काय? DAMar 452.3

त्याच्या प्रश्नाच्या उत्तरादाखल येशूने त्याला सांगितले की सार्वकालिक जीवनाच्या मनुष्याशी असलेले कर्तव्य स्पष्ट करण्यासाठी त्याने कित्येक आज्ञा सांगितल्या. त्यावर अधिकारी म्हणाला, “गुरूजी, मी आपल्या तरुणपणापासून ह्या सगळ्या आज्ञा पाळीत आलो आहे. माझ्या ठायी अजून काय उणे आहे?” DAMar 452.4

जणू काय त्याचे आयुष्य आणि त्याचा स्वभाव यांचा शोध घेण्यासाठी ख्रिस्ताने त्याच्याकडे निरखून पाहिले. त्याच्यावर त्याने प्रीती केली, आणि त्याच्या स्वभावाचे परिवर्तन होण्यासाठी त्याला शांती, कृपा व हर्ष देण्यास तो फार आतुर होता. त्याने म्हटले, “तुझ्यात एक गोष्टीची उणीव आहे; जा, तुझे असेल नसेल ते विकून गोरगरिबांना देऊन टाक म्हणजे तुला स्वर्गात संपत्ति मिळेल. आणि चल. वधस्तंभ घे आणि माझ्या मागे ये.” DAMar 452.5

ख्रिस्त ह्या तरुणाकडे आकर्षिला गेला. त्याचे उद्गार मनापासूनचे होते ते त्याला समजले. “मी आपल्या तरुणपणापासून ह्या सगळ्या आज्ञा पाळीत आलो आहे.’ ज्या सूक्ष्म, विवेकी दृष्टीने मनापासूनचा भक्तीभाव आणि ख्रिस्ती चागुलपणा यांची आवश्यकता असल्याचे त्याला समजून येईल ती दृष्टी त्याच्यामध्ये निर्माण करण्यास उद्धारक उत्सुक होता. त्याच्याठायी विनम्र व पश्चात्तापदग्ध अंतःकरण, सर्वश्रेष्ठ प्रेम देवाला अर्पण करण्याची जाणीव आणि ख्रिस्ताच्या पूर्णावस्थेमध्ये आपल्या उणीवा लपविण्याची आकांक्षा त्याच्यामध्ये पाहाण्यास तो उत्कंठित होता. DAMar 453.1

तारणाच्या कार्यामध्ये हा तरुण त्याच्याबरोबर सहकामदार झाल्यास त्याला जे साहाय्य हवे आहे ते येशूने ताडले. तो स्वतः ख्रिस्ताच्या मार्गदर्शनाखाली राहिला तर तो सात्विकतेसाठी शक्तिमान बनेल. त्याने ख्रिस्ताचे मोठ्या प्रमाणात प्रतिनिधित्व केले असते; कारण त्याच्या अंगी जे गुण होते ते ख्रिस्ताशी सयुक्त केले असते तर त्यामुळे तो लोकामध्ये दिव्य शक्ती बनला असता. त्याचा स्वभाव पाहून त्याच्यावर ख्रिस्ताने प्रीती केली. अधिकाऱ्याच्या मनात ख्रिस्ताविषयी प्रेम निर्माण होत होते, कारण प्रेमाने प्रेम निर्माण होते. त्याने त्याच्याबरोबर सहकामगार राहावे अशी येशूची इच्छा होती. स्वतःसारखे आणि देवाची प्रतिमा प्रतिबिंबित होईल अशा आरशासारखे त्याला बनविण्यास तो उत्सुक होता. त्याच्या स्वभावात उत्कृष्ट उन्नती करून प्रभूच्या कामी लावण्यास तो उत्कंठित होता. जर अधिकाऱ्याने स्वतःला ख्रिस्ताला वाहून दिले असते तर त्याच्या सहवासात त्याची वृद्धि झाली असती. त्याने हा निर्णय घेतला असता तर त्याच्या भवितव्यात कितीतरी फरक पडला असता! DAMar 453.2

येशूने म्हटले, “तुझ्यात एका गोष्टीची उणीव आहे. पूर्ण होऊ पाहातोस तर जा, आपली मालमत्ता विकून दारिद्रास दे, म्हणजे तुला स्वर्गात संपत्ति मिळेल; आणि चल, माझ्यामागे ये.” ख्रिस्ताने अधिकाऱ्याचे मन ओळखिले. त्याच्यात एकाच गोष्टीची उणीवता होती आणि ते फार महत्त्वपूर्ण मूलतत्त्व होते. त्याच्या अंतःकरणात देवाची प्रीती वास करण्याची गरज होती. ह्या उणीवतेची भरपाई केली नाही तर ते त्याला घातक होईल आणि त्याचा संपूर्ण स्वभाव भ्रष्ट होईल. अनावर लाडाने स्वार्थ वृद्धिंगत होईल. देवाच्या प्रेमाचा स्वीकार करण्यासाठी त्याने स्वप्रेमाचा त्याग केला पाहिजे. DAMar 453.3

ख्रिस्ताने त्या मनुष्याची कसोटी घेतली. स्वर्गीय धन आणि जगिक मोठपण यांच्यातून एक निवडण्यास त्याने त्यास सांगितले. ख्रिस्ताचे अनुकरण केल्यास स्वर्गीय धनाची खात्री देण्यात आली. परंतु स्वार्थ सोडला पाहिजे; त्याने आपली इच्छा ख्रिस्ताच्या स्वाधीन केली पाहिजे. देवाचे पावित्र्य तरुण अधिकाऱ्याला देऊ केले होते. देवपुत्र होण्याचा आणि स्वर्गीय धनाचा ख्रिस्ताबरोबर सहवास बनण्याचा त्याला प्रसंग होता. परंतु त्याने वधस्तंभ घेऊन स्वार्थत्यागाच्या मार्गाने ख्रिस्ताच्या मागे गेले पाहिजे. DAMar 453.4

“तुम्ही कोणाची सेवा करणार हे आज ठरवा’ योहान २४:१५. हे ख्रिस्ताचे बोल अधिकाऱ्याला निश्चित पाचारण होते. निर्णय घेणे त्याच्यावर सोपविले होते. त्याच्या जीवनाचे परिवर्तन व्हावे ही ख्रिस्ताची उत्कंठा होती. त्याच्या जीवनातील सतावणारा मुद्दा त्याने त्याला दाखविली होता आणि तरुण ह्या प्रश्नाकडे कोणत्या दृष्टीकोणातून पाहातो हे तो बारकाईने निरिक्षण करीत होता. ख्रिस्ताचे अनुकरण करण्याचे ठरविले तर त्याला सर्व बाबतीत त्याच्या आज्ञांचे पालन केले पाहिजे. त्याने आपल्या महत्त्वाकांक्षी योजनेपासून माघार घेतली पाहिजे. कळकळीने अगदी मनापासून, आत्म्यासाठी तहानभूक लागलेल्या उद्धारकाने त्या तरुणाकडे पाहिले आणि देवाच्या आत्म्याच्या पाचारणाला तो शरण जाईल अशी आशा धरली. DAMar 454.1

ज्या अटीद्वारे त्याच्या शीलस्वभावाला पूर्णता प्राप्त होईल ती अट ख्रिस्ताने त्या अधिकाऱ्यापुढे ठेविली होती. त्याचे शब्द कडक आणि जुलमी वाटत होते तरी ते शहाणपणाचे होते. त्यांचा स्वीकार करून त्यांचे पालन करण्यामध्ये अधिकाऱ्याच्या उद्धाराची आशा होती. त्याचे उच्च पद आणि धनसंपत्ती यांचा, त्याचा स्वभाव वाईट होण्यास मार्मिक छाप पडत होता. त्यांना कवटाळून धरल्यास ते देवाला हुसकावून त्याची जागा त्यांच्या जीवनात घेतील. थोडे किंवा जास्त देवापासून राखून ठेविल्यास त्याद्वारे त्याचे नैतिक सामर्थ्य व क्षमता कमी होईल; कारण जगाच्या गोष्टी अंतःकरणात ठेविल्या, मग त्या अनिश्चित आणि अपात्र असल्या तरी त्या शेवटी अंगात जिरवून घेतल्या जातील. DAMar 454.2

ख्रिस्ताच्या वचनाचा अर्थ अधिकाऱ्याला समजला आणि तो दु:खी झाला. बहाल केलेल्या देणगीचे मूल्य त्याने अनुभवले असते तर ताबडतोब तो ख्रिस्ताचा अनुयायी झाला असता. यहूदी लोकांच्या सल्लागार मंडळाचा तो एक सदस्य होता आणि सैतान त्याला भावी उन्नतीचे आमिष दाखवित होता. त्याला स्वर्गीय धन पाहिजे होते आणि त्यासोबत त्याच्या धनसंपत्तीचा तात्पुरता लाभही चाखायला पाहिजे होता. अशा प्रकारची अट असल्याबद्दल त्याला वाईट वाटत होते. त्याला सार्वकालिक जीवन हवे होते परंतु त्यासाठी स्वार्थत्याग करण्यास तो राजी नव्हता. चिरकाल जीवनाची किंमत फार भारी वाटली आणि दुःखी होऊन तो निघून गेला; “कारण त्याची मालमत्ता पुष्कळशी होती.” DAMar 454.3

देवाच्या आज्ञा पाळिल्या आहेत त्याचे हे म्हणणे फसवणूक होती. धनसंपत्ती त्याची मूर्ति असल्याचे त्याने दर्शविले. जीवनात ऐहिक गोष्टीला प्रथम स्थान देऊन तो देवाच्या आज्ञा पाळू शकत नव्हता. देणाऱ्यापेक्षा दिलेल्या दानावर त्यांने अधिक प्रेम केले. तरुणाला ख्रिस्ताने स्वतःची संगत सोबत देऊ केली होती. त्याने म्हटले, “माझ्यामागे ये.’ परंतु त्याच्या लोकामध्ये त्याचे नाव आणि मालमत्ता यांच्यापेक्षा उद्धारकाची किंमत त्याला जास्त वाटली नव्हती. अदृश्य स्वर्गीय धनसंपत्तीसाठी दृश्य ऐहिक धनसंपत्ती सोडून देणे त्याला धोक्याचे वाटले. चिरकाल जीवनाचे दान त्याने नाकारिले आणि तो निघून गेला आणि त्यानंतर तो जगाची आराधना करू लागला. ख्रिस्ताची जगाबरोबर तुलना करण्याच्या सत्वपरीक्षेला हजारो तोंड देत आहेत; आणि अनेकजन जगाची निवड करीत आहेत. तरुण अधिकाऱ्याप्रमाणे ते उद्धारकापासून पाठ फिरवितात आणि तो माझा प्रभु असणार नाही असे मनात म्हणतात. DAMar 454.4

तरुणाबरोबरच्या ख्रिस्ताच्या वागण्यात वस्तुपाठ दिलेला आहे. त्याच्या प्रत्येक सेवकाने पाळावयाच्या आचरणाचा नियम देवाने दिला आहे. कायदेशीरपणाचे आज्ञापालन नाही तर जीवनामध्ये उतरलेले आणि स्वभावामध्ये उदाहरणाने दाखविलेले देवाच्या नियमाचे आज्ञापालन आहे. त्याच्या राज्याची प्रजा होणाऱ्या सगळ्यासाठी देवाने स्वतः शीलस्वभावाचे प्रमाण ठरविलेले आहे. केवळ ख्रिस्ताबरोबर सहकामगार होणाऱ्यांना आणि प्रभु, मी आणि माझे सर्वस्व तुझे आहे असे म्हणणाऱ्यांना देवाचे पुत्र व कन्या असे मानण्यात येईल. स्वर्गाची अपेक्षा करणे म्हणजे काय हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे आणि तसे केल्यावर त्याच्या अटीमुळे त्यापासून पाठ फिरविली जाते. ख्रिस्ताला “नाही’ म्हणणे किती भयंकर आहे ह्याचा विचार करा. अधिकाऱ्याने म्हटले, मी सर्व काही देणार नाही. आम्हीही तसेच म्हणतो काय? देवाने दिलेले काम करण्यास, वाटेकरी होण्यास उद्धारक तयार आहे. जगात त्याच्या कामाच्या उन्नतीसाठी देवाने आम्हाला दिलेल्या साधनांचा उपयोग करण्यास ख्रिस्त तयार आहे. अशा रीतीने केवळ तो आमचा उद्धार करू शकतो. DAMar 455.1

तो विश्वासू कारभारी आहे हे सिद्ध करण्यासाठी त्या अधिकाऱ्याला धनसंपत्ती देण्यात आली होती. गरजूंच्या कल्याणासाठी त्याने त्या मालमत्तेचा उपयोग करावयाचा होता. गरजू व पीडित यांना मदत करता येईल म्हणून आजसुद्धा देव मनुष्यांना साधन सामुग्री, कलाकौशल्य आणि संधि उपलब्ध करून देतो. देवाच्या संकल्पाप्रमाणे दिलेल्या दानांचा उपयोग करणारा उद्धारकाचा सहकामगार बनतो. त्याच्या शीलस्वभावाचा तो प्रतिनिधी असल्यामळे तो ख्रिस्तासाठी आत्मे जिंकतो. DAMar 455.2

ह्या तरुण अधिकाऱ्याप्रमाणे ज्यांनी उच्च दर्जा व अफाट धनदौलत मिळविली आहे त्यांना सर्व सोडून ख्रिस्ताच्या मागे जाणे फार स्वार्थत्यागाचे वाटते. त्याचे शिष्य होऊ इच्छिणाऱ्यासाठी ही आचारसंहिता आहे. आज्ञापालनाशिवाय दुसरे स्वीकारणीय नाही. ख्रिस्ताच्या शिकवणीचा सार स्वतःचा त्याग करणे किंवा शरण जाणे होणे. बहुधा हे तत्त्व अधिकार वाणीने किंवा हुकमाद्वारे सादर करण्यात आले आहे असे वाटते. कारण नीतीभ्रष्ट करणाऱ्या गोष्टी काढून टाकिल्याशिवाय मनुष्याच्या उद्धारासाठी दुसरा मार्ग उरला नाही. DAMar 455.3

ख्रिस्ताचे अनुयायी त्याच्या मालकीचे जेव्हा प्रभूला परत करितात तेव्हा ते आपल्या धनाचा संचय करितात आणि ते जेव्हा “शाबास, भल्या व विश्वासू दासा, ... तू आपल्या धन्याच्या आनंदात सहभागी हो.” ही वाणी ऐकतील तेव्हा त्याना ते परत दिले जाईल. “आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहात असावे; जो आनंद त्याच्यापुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे.’ मत्तय २५:२३; इब्री १२:२. “माझ्या मागे ये” म्हणणाऱ्याच्या पावलावर पाऊल टाकून चालणाऱ्या सर्वांचे पारितोषक म्हणजे उद्धार पावलेले व चिरकाल तारलेले आत्मे पाहाण्यातील आनंद उपभोगणे होय. DAMar 455.4