Go to full page →

अध्याय ७०—“माझ्या कनिष्ठ बंधुपैकी एकाला” DAMar 557

मत्तय २५: ३१-४६.

“जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व देवदूतासह येईल तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल; त्याच्यापुढे सर्व राष्ट्रे जमिविली जातील; आणि तो त्यास एकमेकापासून वेगळे करील.’ अशा प्रकारे ख्रिस्ताने जैतूनाच्या डोंगरावर आपल्या शिष्यांच्यासमोर न्यायाच्या दिवसाचे चित्र रेखाटले; आणि एका मुद्यावर त्याचा निर्णय अवलंबून होता ते दर्शविले. त्याच्यासमोर जेव्हा राष्ट्रे जमविली जातील तेव्हा त्यांच्यात दोन वर्ग असतील; आणि त्यांनी त्याच्या नावात दरिद्री व दुखणाईत यांच्यासाठी जे केले किंवा न केले याच्यावर त्यांचे अनंतकालिक भवितव्य अवलंबून राहील. DAMar 557.1

त्या दिवसात त्यांच्या उद्धारासाठी स्वतःचा प्राण दिला हे महान कार्य ख्रिस्त त्यांच्यासमोर सादर करीत नाही. त्याच्यासाठी त्यांनी केलेले श्रद्धायुक्त कार्य पुढे करितो. त्याच्या उजवीकडल्यास तो म्हणेल, “अहो माझ्या पित्याचे आशीर्वादित हो, या; जे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुम्हाकरिता सिद्ध केले आहे ते वतन घ्या; कारण मी भूकेला होतो तेव्हा तुम्ही मला खावयास दिले, तान्हेला होतो तेव्हा मला प्यावयास पाणी दिले, परका होतो तेव्हा मला घरात घेतले, उघडा होतो तेव्हा मला वस्त्र दिले, आजारी होतो तेव्हा माझ्या भेटीला आला, बंदिशाळेत होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आला.” स्तुत्य कार्य करणाऱ्यांना माहीत नाही की ते त्याची सेवा करीत आहेत. त्यांच्या गोंधळून गेलेल्या विचारसरणीला तो उत्तर देऊन म्हणतो, “ज्या अर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधुपैकी एकाला केले त्याअर्थी ते मला केले आहे.” DAMar 557.2

येशूने शिष्यांना सांगितले होते की, सर्व लोक त्यांचा द्वेष व छळ करतील. पुष्कळांना घरातून हाकलून देण्यात येईल आणि ते दरिद्री बनतील. अनेकजण हालअपेष्टाने व रोगाने जेरीस येतील. पुष्कळांना तुरुंगात डांबण्यात येईल. त्याच्याकरिता घरदार व मित्रमंडळी ज्यांना सोडावी लागली त्यांना सांप्रत जीवनात शंभरपट्टीने देण्याचे त्याने आश्वासन दिले. बांधवांची सेवा करणाऱ्यांना विशेष कृपाप्रसादाचे आश्वासन आता दिले. येशूने म्हटले माझ्यासाठी छळ सोसणाऱ्याने प्रत्येक बाबतीत मला ओळखिले पाहिजे. जशी माझी सेवा करिता तशी तुम्ही त्यांची सेवा करावी. तुम्ही माझे शिष्य आहा हा त्याचा पुरावा आहे. DAMar 557.3

स्वर्गीय कुटुंबामध्ये ज्यांचा जन्म झाला आहे ते विशेष अर्थाने प्रभूचे बांधव आहेत. त्याच्या कुटुंबातील सदस्यांना देवाचे प्रेम एकत्र ठेवते आणि जेव्हा जेव्हा हे प्रेम दर्शविण्यात येते तेव्हा तेव्हा हे दिव्य नाते प्रगट होते. “जो कोणी प्रीती करितो तो देवापासून जन्मलेला आहे व देवाला ओळखितो.” १ योहान ४:७. DAMar 558.1

न्यायसमयी ख्रिस्त ज्यांची शिफारस करितो त्यांना ईश्वरप्रणित धर्मशास्त्राचे कदाचित तुटपुंजे ज्ञान असेल परंतु त्याची नीतितत्त्वे त्यांनी हृदयात जतन करून ठेविली होती. त्यांच्या संबंधातील माणसांना पवित्र आत्म्याच्या प्रभावाने ते कृपाप्रसाद झाले. विधर्मी लोकामध्ये देखील पुष्कळ दयाळू अंतःकरणाचे आहेत. जीवनी वचन त्यांच्या कानावर पडण्या अगोदर ते मिशनरीबरोबर मित्रत्वाने वागले आणि स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी त्यांची सेवा केली, गरज भागविली. विधामध्ये अज्ञानाने देवाची आराधना करणारे लोक आहेत. त्यांच्याकडे माणसाने जीवनी प्रकाश केव्हाही आणिला नाही, तरी सुद्धा त्यांचा नाश होणार नाही. देवाच्या लिखित नियमाविषयी ते अज्ञान असले तरी त्यांनी निसर्गामध्ये त्याची वाणी ऐकिली आहे आणि नियमाप्रमाणे ते वागले आहेत. त्यांच्या अंतःकरणाला पवित्र आत्म्याचा स्पर्श झाला आहे ह्याचा पुरावा त्यांची कृती आहे आणि ते देवाची मुले म्हणून ओळखण्यात येतात. DAMar 558.2

उद्धारकाच्या मुखातून निघालेले शब्द ऐकून राष्ट्रातील व विधातील कनिष्ठ लोकांना हर्षयुक्त आश्चर्य वाटेल, “ज्या अर्थी तुम्ही ह्या माझ्या कनिष्ठ बंधुपैकी एकाला केले त्याअर्थी ते मला केले आहे!” मान्यता मिळालेले त्याचे शब्द ऐकून त्याच्या अनुयायांना हर्षयुक्त आश्चर्य वाटलेले पाहून अनंत प्रेम सागराच्या अंतःकरणाला किती आनंद होईल! DAMar 558.3

ख्रिस्ताचे प्रेम कोणत्याही वर्गासाठी मर्यादित ठेवलेले नाही. मानवाच्या प्रत्येक व्यक्तीशी त्याचा संबंध होता. आम्ही स्वर्गीय कुटुंबाचे सदस्य व्हावे म्हणून तो पृथ्वीवरील कुटुंबाचा सदस्य झाला. तो मानवपुत्र आहे म्हणून तो आदामाच्या वंशातील प्रत्येक पुत्र कन्येचा बंधु DAMar 558.4

आहे. म्हणून त्याच्या अनुयायांनी त्याच्या आसमतात असलेल्या नाशवंत जगापासून आपणाला विभक्त करून घेऊ नये. अफाट विस्तारलेल्या मानवी जाळ्याचा ते एक भाग आहेत आणि संत व पापी यांचे ते बंधु आहेत असे स्वर्ग समजतो. पतन पावलेले, सन्मार्गापासून दूर गेलेले, पापी यांना ख्रिस्ताची प्रीती अलिंगन देते; आणि पतन पावलेल्याला उन्नत करण्यासाठी केलेली प्रत्येक दयाळू कृती, करुणेची प्रत्येक करणी ख्रिस्तासाठी आहे असे समजून स्वीकारण्यात येते. DAMar 558.5

तारणाचे जे वारस होतील त्यांची सेवा करण्यासाठी स्वर्गातील देवदूत पाठविण्यात आले आहेत. ते कोण आहेत ते आता आम्हाला माहीत नाही; कोण विजयी होतील आणि संताच्या वारसा वतनाचे भागीदार होतील हे अजून स्पष्ट केले नाही; परंतु दुःखीतांचे समाधान करण्यासाठी, धोक्यात असलेल्यांचे संरक्षण करण्यासाठी आणि ख्रिस्ताकडे लोकांची मने वळविण्यासाठी स्वर्गातील देवदूत पृथ्वीच्या कोणाकोपऱ्यातून हिंडत आहेत. कोणाकडे दुर्लक्ष केले नाही. माणसांचा सामाजिक दर्जा पाहून भारावून न जाणारा देव आहे. तो निर्माण केलेल्या सगळ्यांची काळजी सारखीच घेतो. DAMar 558.6

ख्रिस्ताचे गरजू व दुःखीत यांच्यासाठी आपले दार तुम्ही उघडिता तेव्हा अदृश्य देवदूतांचे स्वागत करता. तुम्ही स्वर्गीय मैत्रीसाठी पाचारण करता. आनंद आणि शांतीचे वातावरण ते घेऊन येतात. स्तुतीस्त्रोत्रे गात ते येतात आणि स्वर्गात प्रत्युत्तराचे गीत ऐकण्यात येते. दयेच्या प्रत्येक कृतीचा सूर तेथे निघतो. सिंहासनावरून पिता निःस्वार्थी कार्यकर्त्यांचा त्याच्या मोल्यवान भांडारात समावेश करतो. DAMar 559.1

ख्रिस्ताच्या डाव्या बाजूला असलेल्यांनी त्याचे गरीब व दुःखी यांच्याविषयी बेफिकीरी दाखविली, ते त्यांच्या ह्या अपराधाविषयी अजाण होते. सैतानाने त्यांना अंधळे करून टाकिले होते; कोणत्या बाबतीत त्यांच्या बांधवाचे ते ऋणी आहेत ह्याचे ज्ञान त्यांना झाले नाही. ते स्वतःमध्येच गर्क होते आणि दुसऱ्यांच्या गरजांची पर्वा केली नाही. DAMar 559.2

त्याच्या दुःखी लोकांचे दुःख परिहार व समाधान करण्यासाठी देवाने श्रीमंताना धन संपत्ती दिली आहे; परंतु पुष्कळ वेळा ते दुसऱ्यांच्या गरजेविषयी उदासीनवृत्ती दाखवितात. दरिद्री बांधवापेक्षा ते अधिक सरस आहेत असे समजतात. दरिद्री माणसांच्या परिस्थितीचा विचार करण्यास ते तयार नसतात. त्यांना त्यांचा न्याय व मोहपाश समजत नाही आणि त्यांच्या अंतःकरणातील दया नाहीशी होते. किमती, नामी निवासात व वैभवशाली मंदिरात श्रीमंत स्वतःला गरीबापासून अलिप्त ठेवितात; गरजवंताच्या गरजा भागविण्यासाठी दिलेली साधन संपत्तीचा विनियोग स्वार्थ व अहंकार यांचे लाड पुरविण्यासाठी करण्यात येतो. देवाच्या दयाळूपणाविषयी दररोज शिक्षण मिळण्याच्या संधीला गोरगरीब पारखे होत आहेत; जीवनाच्या गरजा भागवून त्यांचे समाधान करण्यासाठी त्याने पुरेशी तरतूद केली आहे. जीवन संकुचित करणाऱ्या गरीबीची जाणीव करणे त्यांना भाग पडते आणि सहसा ते द्वेष मत्सर यांनी भरले जातात. अधिक मिळविण्याची हाव काबूत न ठेवणारे गरीबांना तिरस्काराने वागवितात आणि त्यांच्याकडे भिकारी, कंगाल म्हणून पाहाण्यात येते असे भासवितात. DAMar 559.3

ख्रिस्त हे सर्व पाहातो आणि म्हणतो मी भुकेला व तान्हेला होतो. मी परका होतो. मी आजारी होतो. मी बंदिशाळेत होतो. जेव्हा तुम्ही टेबलावर बसून चमचमीत भोजनावर हात मारून घेत होता तेव्हा मी खोपटीत किंवा मोकळ्या रस्त्यावर उपास काढीत होतो. जेव्हा तुम्ही तुमच्या विलासी, ऐषाराम सदनात शांत व निश्चिंत होता तेव्हा मला डोके टेकायला जागा नव्हती. तुमची कपाटे भारी पोषाखाने भरली होती तेव्हा मी कंगाल, निराश्रित होतो. तुम्ही ऐषाराम चैनीचा उपभोग घेत होता तेव्हा मी बंदिशाळेत गळून गेलो होतो. DAMar 559.4

उपासमार होणाऱ्या गरीबांना तुम्ही भाकरीचा शिधा देत होता, थंडीने कुडकुडणाऱ्यांना तुम्ही पोषाख देत होता तेव्हा तुम्ही वैभवी देवाला देत आहे ह्याचे स्मरण झाले काय? तुमच्या सबंध आयुष्यात ह्या लोकाच्याद्वारे मी सदैव तुमच्याबरोबर राहिलो आहे, परंतु तुम्ही माझा शोध केला नाही. तुम्ही माझ्याशी संगत, सोबत केली नाही. तुम्हाला मी ओळखित नाही. DAMar 560.1

ह्या पृथ्वीवर ख्रिस्ताने आपले आयुष्य घालविले त्या ठिकाणाला भेट देणे, जेथे तो चालला तेथे चालणे, ज्या सरोवराच्या किनाऱ्यावर त्याने शिकविले त्याचे दर्शन घेणे, आणि ज्या डोंगरदऱ्यावर त्याची दृष्टी खिळली होते त्यांना भेट देणे भाग्याचे आहे असे अनेकांना वाटते. परंतु ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल टाकून चालण्यास आम्हाला नासरेथ, कपर्णहम आणि बेथानीला जाण्याची गरज नाही. त्याच्या पाऊल खुणा आम्हाला आजाऱ्याच्या खाटे शेजारी, गरीबाच्या खोपटीत, शहरातील गर्दीच्या गल्ली बोळ्यात आणि जेथे जेथे मानवी अंतःकरणाला समाधानाची, सांत्वनाची गरज आहे तेथे तेथे दिसतील. पृथ्वीवर असताना ख्रिस्ताने जे केले ते केल्याने आम्ही त्याच्या पावलावर पाऊल टाकून चालू शकतो. DAMar 560.2

सर्वांना करण्यासाठी काहीना काही सापडेल. “कारण गरीब नेहमी तुमच्या जवळ आहेत.” असे येशूने म्हटले (योहान १२:८). म्हणून त्याच्यासाठी काम करायला ठिकाण नाही असे कोणालाही वाटायला नको. कोट्यावधि लोक मृत्यूच्या खाईत पडले आहेत, अज्ञान व पाप यांच्यामध्ये बंदिस्त झाले आहेत आणि त्यांच्या कानावर त्यांच्याविषयीची ख्रिस्ताची प्रेमकथा कधीही पडली नाही. त्यांनी आमची जागा घेतली आणि आम्ही त्यांची जागा घेतली तर आमच्यासाठी त्यांनी काय करावे असे आम्हाला वाटते? त्यांच्या शक्तीप्रमाणे हे सर्व काही आमच्यासाठी करणे त्यांचे कर्तव्य आहे. न्यायनिवाड्याच्या समयी, आम्ही तग धरून राहू किंवा पडू, जीवनाविषयी ख्रिस्ताचा नियम हा आहे की, “लोकांनी जसे तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा.” मत्तय ७:१२. DAMar 560.3

दुःखी, अनाथ, मोहाला बळी पडलेल्या लोकांची काळजी वाहाण्यास समर्थ असणाऱ्या मंडळीची स्थापना करण्यासाठी उद्धारकाने आपला मोल्यवान प्राण दिला आहे. मंडळीतील श्रद्धावंत, दरिद्री, अडाणी, अप्रसिद्ध, अज्ञात असतील; तथापि ते गृहात, शेजारी, मंडळीत, आणि पलिकडच्या प्रांतात ख्रिस्तनामाने काम करू शकतात आणि त्याचा परिणाम दूरचा, लांबचा, शाश्वत कालापर्यंतचा होईल. DAMar 560.4

ह्या महत्त्वाच्या बाबीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे प्राथमिक ख्रिस्ती अनुभवापेक्षा अधिक प्रगती अनेक तरुण शिष्यांची होत नाही. “तुमच्या पापांची क्षमा करण्यात आली आहे” ह्या येशूच्या शब्दाने त्यांच्या अंतःकरणात चमकणारा प्रकाश गरजवंतांच्या गरजा भागवून सतेज ठेवला पाहिजे. तरुणांनी नेहमी धोक्याची वाटणारी बेचैन शक्ती योग्य मार्गाने लावली तर ती त्यांना आशीर्वादमय होईल. दुसऱ्याच्या कल्याणासाठी केलेल्या कळकळीच्या कार्यामध्ये स्वहित विसरले पाहिजे. DAMar 560.5

दुसऱ्यांची सेवा करणाऱ्यांची सेवा मुख्य मेंढपाळ करील. ते स्वतः जीवनी पाणी पितील आणि त्यांचे समाधान होईल. उद्दिपित करणाऱ्या मनोरंजनासाठी किंवा जीवनात काही बदल होण्यासाठी ते फार उत्सुक असणार नाहीत. महत्त्वाचा विषय म्हणजे नाशाच्या वाटेवर असलेल्यांचा उद्धार कसा घडवून आणायचा हा असणार. सामाजिक संबंध-दळणवळण लाभाचे होईल. उद्धारकर्त्याच्या प्रेमाने अंतःकरणे एकत्रित आकर्षिली जातील. DAMar 561.1

आम्ही देवाचे सहकामदार आहोत ही जाणीव झाल्यावर त्याच्या आश्वासनाविषयीचे उद्गार अनास्थेचे असणार नाहीत. त्यांचा मनावर कायमचा ठसा उमटला जाईल आणि आमचे ओठ प्रदिप्त होतील. अजाण, बेशिस्त आणि बंडखोर लोकांची सेवा करण्यास मोशेला पाचारण करण्यात आले तेव्हा मोशेला देवाने वचन दिले होते, “मी प्रत्यक्ष येईन आणि तुला विश्रांति देईन.” “निःसशय मी तुजबरोबर असेन.’ निर्गम ३३:१४; ३:१२. पीडा, दुःख भोगणाऱ्यांची ख्रिस्ताच्या नामात सेवा करणाऱ्या सर्वांच्यासाठी हे आश्वासन आहे. DAMar 561.2

मानवावर प्रीती करणे हे देवाच्या प्रीतीचे पृथ्वीवरील प्रगटीकरण आहे. एका कुटुंबातील मुले होण्यासाठी हे प्रेम मनावर बिंबवले पाहिजे, त्याचे रोपण केले पाहिजे; त्याद्वारे गौरवी राजा आम्हाशी एकरूप होतो. त्याचे अखेरचे शब्द “जशी मी तुम्हावर प्रीती केली तशी तुम्ही एकमेकावर प्रीती करावी” (योहान १५:१२) तडीस नेल्यावर; जशी त्याने जगावर प्रीती केली तशी केल्यावर त्याचे कार्य यशस्वीपणे पूर्ण होईल. आमच्या अंतःकरणात स्वर्ग वसत असल्याकारणाने आम्ही स्वर्गासाठी पात्र ठरतो. DAMar 561.3

“ज्यांना ठार मारण्यासाठी धरून नेत असतील. त्यास सोडीव, ज्यांच्या वधाची तयारी झाली आहे त्यांचा बचाव करण्याचा साधेल तेवढा प्रयत्न कर. आम्हास हे ठाऊक नव्हते असे म्हणशील तर हृदये तोलून पाहणाऱ्यास हे कळत नाही काय? तुझा जीव राखणाऱ्याला माहीत नाही काय? तो प्रत्येकास ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे प्रतिफल देत नाही काय?’ नीति. २४:११, १२. न्यायाच्या महान दिवशी, ख्रिस्तासाठी ज्यांनी काम केले नाही, स्वतःचीच काळजी करून स्वतःच्या विचारात गर्क राहिले त्यांचा समावेश जगाचा न्यायाधीश दुष्टांच्याबरोबर करील. त्यांना तीच शिक्षा मिळेल. DAMar 561.4

प्रत्येकाला दृढ विश्वास देण्यात आला आहे. प्रत्येकाकडून मुख्य मेंढपाळ अपेक्षा करितो, “तुला दिलेला कळप, तुझा रम्य कळप कोठे आहे?’ “तुला तो शिक्षा देईल तर तू काय म्हणशील?” यिर्मया १३:२०, २१. DAMar 561.5