Go to full page →

अध्याय ७९—“पूर्ण झाले आहे” DAMar 660

ज्या कार्यासाठी ख्रिस्त आला होता ते साध्य झाल्याशिवाय त्याने आपला शेवटचा निःश्वास सोडला नाही आणि अखेरच्या निःश्वासाबरोबर तो उद्गारला, “पूर्ण झाले आहे.’ योहान १९:३०. लढा जिंकण्यात आला होता. त्याचा उजवा हात आणि त्याचा पवित्र बाहु त्यांच्यामुळे त्याला विजय मिळाला. विजेता या नात्याने त्याने आपला झेंडा सनातन उंचीवर रोवलाफडकाविला. दिव्यदूतामध्ये हर्ष-उल्हास झाला नव्हता काय? उद्धारकाच्या विजयाने सर्व स्वर्गाने विजयोत्सव केला. सैतान पराजीत झाला आणि त्याचे राज्य तो गमावला हे त्याला समजले. DAMar 660.1

दिव्यदूत व अपतीत जग यांच्या दृष्टीने “पूर्ण झाले आहे’ ही घोषणा खोल अर्थ- भरीत होती. त्यांच्यासाठी आणि आमच्यासाठी उद्धाराचे महान कार्य साध्य केले होते. ख्रिस्ताच्या विजयाचे फळ आम्हाबरोबर ते सारखेच वाटून घेतात. DAMar 660.2

ख्रिस्ताचे मरण होईपर्यंत सैतानाचा स्वभाव दूतांना आणि अपतीत जगांना प्रगट झाला नव्हता. तो अट्टल भ्रष्ट फसवणुकीमध्ये इतका निष्णात होता की पवित्रगणानासुद्धा त्याची तत्त्वे उमगली नव्हती. त्याच्या बंडाचे स्वरूप त्यांनी पाहिले नव्हते. DAMar 660.3

ही व्यक्ती शक्तिमान आणि वैभवशाली होती. त्यामुळे ती देवाच्याविरुद्ध गेली. लुसीफराविषयी प्रभु म्हणतो, “तू पूर्णतेची मुद्राच आहेस; तू ज्ञानपूर्ण व सर्वांगसुंदर आहेस.” यहज्के. २८:१२. लुसीफर पाखर घालणारा करुब होता. देवसमक्षतेतील प्रकाशात तो होता. निर्माण केलेल्या सर्वामध्ये तो श्रेष्ठ होता आणि देवाचा उद्देश विश्वाला प्रगट करण्यात तो पुढाकार घेत होता. त्याने पाप केल्यानंतर त्याची फसविण्याची ताकद अधिक फसवी बनली आणि त्याचा खरा स्वभाव प्रगट करणे फार जीकरीचे बनले, कारण पित्याजवळचे त्याचे स्थान उच्च श्रेणीतले होते. DAMar 660.4

सैतान आणि त्याच्या पाठीराख्यांचा नाश करणे देवाला फार सोपे होते; परंतु ते त्याने केले नाही. बंडाचा नायनाट शक्तीने करायचा नव्हता. जुलूमशाही केवळ सैतानाच्या साम्राज्यात आढळते. देवाची तत्त्वे ह्या प्रकारची नाहीत, चांगुलपणा, दया आणि प्रेम यावर त्यांचा अधिकार अवलंबून आहे. ही तत्त्वे सादर करण्यासाठी ह्या साधनांचा उपयोग केला पाहिजे. देवाचे साम्राज्य नैतिक, सत्य व प्रेम यांचे असून त्यांचे तेथे वर्चस्व आहे. DAMar 660.5

कोणत्याही गोष्टीला निरंतरचे संरक्षण लाभावे हा देवाचा उद्देश होता. त्याच्या राज्यकारभाराची पायाभूत तत्त्वे स्पष्ट करण्यासाठी सैतानाला वेळ दिला पाहिजे असे स्वर्गातील मंडळीमध्ये ठरविले होते. देवाच्या तत्त्वापेक्षा त्याची तत्त्वे वरच्या दर्जाची आहेत असे त्याचे म्हणणे होते. स्वर्गीय विश्वाने पाहावे म्हणून सैतानाला आपली तत्त्वे प्रस्थापीत करण्यासाठी वेळ देण्यात आला होता. DAMar 661.1

सैतानाने मानवाला पापात लोटले आणि तारणाची योजना अंमलात आली. चार हजार वर्षे खिस्त मानवाच्या उत्कर्षासाठी झटत होता आणि सैतान त्याच्या निकृष्ठतेसाठी आणि नाशासाठी खटपट करीत होता. स्वर्गातील विश्वाने हे सर्व पाहिले. DAMar 661.2

येशू जगात आल्यावर सैतानाने आपली सर्व शक्ती त्याच्याविरुद्ध पणास लाविली. बेथलेहेम गावात लहान बाळ जन्मास आला त्या वेळेपासून हा निर्दय लोभी त्याचा नाश करण्याच्या प्रयत्नात होता. उत्कृष्ट बालपण, निर्दोष प्रौढावस्था, पवित्र सेवाकार्य आणि निष्कलंक यज्ञ यातील प्रत्येक बाबतीत वाढ, प्रगती करण्यास सैतानाने अडखळण आणण्याचा अटोकाट प्रयत्न केला. परंतु त्यामध्ये तो पराजित झाला. येशूला तो पापात पाडू शकला नव्हता, त्याची निराशा करू शकला नव्हता किंवा पृथ्वीवर करावयाच्या कामापासून तो त्याला सावरू शकत नव्हता. अरण्यापासून कॅलव्हरीपर्यंत त्याच्यावर सैतानाचा क्रोध भडकला होता. अधिक निष्ठुरतेने त्याच्यावर हल्ला झाला तितकीच अधिक घट्ट मिठी देवपुत्राने पित्याच्या हाताला मारली आणि रुधिराने कलंकीत झालेल्या मार्गावरून तो सरकावला. दडपशाहीने त्याला चिरडून टाकून, दाबून टाकण्याच्या सैतानाच्या सर्व प्रयत्नाने त्याचा निष्कलंक स्वभाव स्वच्छ प्रकाशात प्रकट झाला. DAMar 661.3

सबंध स्वर्ग व अपतीत जग ह्या संघर्षाचे साथी होते. त्यांनी झगड्यातील शेवटची कृत्ये एकाग्रतेने आणि कळकळीने पाहिली. गेथशेमाने बागेत प्रवेश करताना त्यांनी उद्धारकाला पाहिले, अंधाराच्या भयाने त्याचा जीव घाबरला होता. त्यांनी त्याची काकुळतेने केलेली वाणी ऐकिली, “हे माझ्या बापा, होईल तर हा प्याला माझ्यावरून टळून जावे.’ मत्तय २६:३९. पित्याची उपस्थिती लोपलेली पाहिल्यावर त्याचे दुःख फारच भारी झाले आणि ते मरणाच्या दुःखापेक्षा तीव्र वाटले. त्याच्या रक्ताळलेल्या घामाचे थेंब भूमीवर पडत होते. ह्यातून सुटका होण्यासाठी तीन वेळेस त्याने विनवणी केली. स्वर्गाला हे दृश्य पेलवले नाही आणि देवपुत्राकडे दुःखपरिहार करण्यासाठी संदेश वाहक पाठविला. DAMar 661.4

बळीला निर्दय, क्रूर टोळीच्या हातात दिलेला आणि थट्टा कुचेष्टा करून त्याला एका न्यायलयातून दुसऱ्या न्यायालयात फिरवितांना स्वर्गाने पाहिले. गरीब घराण्यात त्याचा जन्म झालेला पाहून त्याची त्यांनी टवाळी आणि हेटाळणी केली. त्याच्या एका जीवलग शिष्याने शाप देत शपथ वाहून त्याचा नाकार केलेला त्यांनी ऐकला. सैतानाचे उद्दामपणाचे कार्य आणि जमावावरील त्याचे वर्चस्व त्याने पाहिले. खरोखर, भयानक दृश्य! गेथशेमाने बागेत उद्धारकाला मध्यरात्री पकडले, त्याची ओढाताण केली, वाड्यातून न्यायालयात त्याला ओढत नेले. याजकासमोर दोनदा, धर्मसभेसमोर दोनदा, पिलाता- समोर दोनदा आणि एकवेळेस हेरोदापुढे त्याच्यावर दोषारोप केले, त्याची टिंगल केली, फटके मारले, दोषारोप केला आणि वधस्तंभावर खिळण्यासाठी त्याला नेण्यात आले. त्याला वधस्तंभाचे जड ओझे वाहाण्यास दिले आणि जात असताना यरुशलेमाच्या कन्यांचा रडण्याचा आक्रोश आणि बाजारबुनग्यांची टवाळी ऐकू येत होती. DAMar 661.5

वधस्तंभावर ख्रिस्त लटकलेला दुःखी व आश्चर्यचकित होऊन स्वर्गाने पाहिला. जखमी कानशीलावर रक्ताचे ओघळ वाहात होते आणि कपाळावर रक्तमिश्रीत घामाचे थेंब होते. वधस्तंभाच्या पायासाठी घडलेल्या दगडावर त्याच्या हातापायातून रक्ताचे थेंब ठिपकत होते. खिळ्याने झालेल्या जखमा त्याच्या शरीराच्या ओझ्याने रुंद झाल्या होत्या. त्याचा कष्टाचा श्वासोच्छवास द्रुतगतीने होऊ लागला आणि त्याचा आत्मा जगाच्या पापाच्या ओझ्याखाली कण्हत विव्हळत होता. ह्या भयंकर दुःखसागरात गुरफटलेला असताना ख्रिस्ताने केलेली प्रार्थना पाहून सर्व स्वर्ग आश्चर्याने स्तंभित झाला होता. “हे बापा, त्यांना क्षमा कर; कारण ते काय करितात हे त्यांना समजत नाही.’ लूक २३:३४. तरीपण देवाच्या प्रतिमेत निर्माण केलेले लोक त्याच्या एकुलत्या पुत्राचा जीव चिरडून टाकायला तयार झाले होते. स्वर्गीय विश्वाला पाहाण्यासाठी काय हा देखावा! DAMar 662.1

मांडलिक राज्य आणि अधर्माची सत्ता वधस्तंभाच्या अवतीभवती जमले होते आणि लोकांच्या अंतःकरणावर अविश्वासाची नरकतुल्य छाया पाडीत होते. त्याच्या सिंहासनासमोर उभे राहाण्यास प्रभूने त्यांना निर्माण केले तेव्हा ते सुरेख आणि देखणे दिसत होते. त्यांची विनयशीलता आणि पावित्र्य त्याच्या उच्च दर्जाप्रमाणे होती. देवाच्या ज्ञानाने त्यांना संपन्न केले होते आणि सर्वांगी चिलखताने वेष्टिले होते. ते यहोवाचे सेवक होते. परंतु एके काळी स्वर्गातील दरबारात सेवा केलेल्या अप्रतिम तेजस्वी दिव्यदूतांना पतीत दूतामध्ये कोण ओळखू शकत होते? DAMar 662.2

सैतानाच्या हस्तकांनी दुष्ट लोकाबरोबर संगनमत करून ख्रिस्त मुख्य पापी आहे असा विश्वास ठेवण्यास व तिरस्कार करण्यास लोकांना भाग पाडिले. वधस्तंभावर ख्रिस्त लटकलेला असताना त्याची नालस्ती करणाऱ्यांना ह्या बंडखोराने भरविले होते. अधम, नीच आणि तिरस्कारणीय वक्तव्याने त्याने मोहीत करून टाकिले होते. त्यांच्या टिंगल, टवाळीना त्याने उत्तेजन दिले. परंतु हे सर्व करूनही त्याला काही लाभ झाला नाही. DAMar 662.3

ख्रिस्तामध्ये एका पापाचा अंश सापडला असता, विशेषतः हाल आणि छळ यातून निसटण्यासाठी एका बाबतीत सैतानाला तो वश झाला असता तर देवाचा आणि मनुष्याचा शत्रू विजयी झाला असता. परंतु ख्रिस्ताने देवावरील आपला विश्वास व आज्ञाधारकपणा भक्कम ठेवून आपले मस्तक लवविले आणि प्राण सोडला. “तेव्हा मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली; ती म्हणालीः आता आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार ही प्रगट झाली आहेत; कारण आमच्या बंधूना दोष देणारा, आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांच्यावर दोषारोप करणारा, खाली टाकण्यात आला आहे.” प्रगटी. १२:१०. DAMar 663.1

त्याची बतावणी सोंग यांची चिरफाड करून टाकिली हे सैतानाला कळून आले. त्याचे प्रशासन कारभार अपतीत दिव्यदूत आणि स्वर्गातील विश्वापुढे खुले ठेवण्यात आले होते. तो खूनी म्हणून त्याने स्वतःला प्रगट केले. देवपुत्राचे रक्त सांडल्यामुळे स्वर्गीय गणांची त्याने सहानुभूती मुळातूनच गमाविली. यापुढे त्याच्या कार्यावर आळा घातला होता. त्याची मनोवृत्ती कोणतीही असो, स्वर्गीय दिव्य दूतासमोर ख्रिस्ताच्या बांधवावर पापाच्या कलंकाविषयी ठपका ठेवण्यासाठी त्याला आता थांबायची गरज नव्हती. सैतान आणि स्वर्ग यांच्यातील सहानुभूतीचा अखेरचा दुवा उखळून पडला होता. DAMar 663.2

तथापि सैतानाचा नाश त्यावेळी केला नव्हता. महान संघर्षात अंतर्भूत असलेल्या सर्व गोष्टींचे ज्ञान अजून दूतांना झाले नव्हते. धोक्यात असलेली तत्त्वे अधिक स्पष्ट करायची होती. मानवासाठी सैतानाच्या अस्तित्वाची गरज होती. मनुष्य आणि दिव्यदूत यांना प्रकाशाचा अधिपती आणि अंधाराचा अधिपती यांच्यातील फरक समजायला पाहिजे होता. कोणाची सेवा करायची हे त्याने ठरवायचे होते. DAMar 663.3

संघर्षाच्या सुरवातीला सैतानाने जाहीर केले होते की, देवाची आज्ञा पाळू शकत नाही, दया व न्याय याचा मेळ बसत नाही-विसंगत आहे आणि आज्ञाभंग झाला तर त्याची पापक्षमा मिळणे अशक्य होते. प्रत्येक पापासाठी शिक्षा झालीच पाहिजे असा सैतानाचा आग्रह होता; पापाबद्दल देव जर शिक्षा देईल तर तो देव सत्य व न्याय यांचा असू शकत नाही. मनुष्याने देवाचा आज्ञाभंग करून त्याची इच्छा अवमानली तेव्हा सैतानाला अत्यानंद झाला. त्याने म्हटले, आज्ञा पाळू शकत नाही ; मनुष्याला पापक्षमा मिळू शकत नाही हे सिद्ध झाले. बंडानंतर सैतानाला शिक्षा म्हणून स्वर्गातून खाली टाकण्यात आले त्याप्रमाणे मानवजात देवाच्या कृपेला कायमची पारखी झाली पाहिजे असे सैतानाने प्रतिपादिले. न्यायी राहून देव पाप्याला दया दाखवू शकत नव्हता असा त्याचा आग्रह होता. DAMar 663.4

परंतु पापी असूनही सैतानापेक्षा मानवाची परिस्थिती वेगळी होती. देवाच्या वैभवी प्रकाशात लुसीफराने स्वर्गात पाप केले होते. निर्माण केलेल्या इतरापेक्षा देवाच्या प्रेमाचे प्रगटीकरण त्याला करण्यात आले होते. देवाच्या स्वभावाचे ज्ञान करून घेण्यात, त्याचा चागुलपणा समजून घेण्यात सैतानाने आपली स्वार्थी, स्वतंत्र इच्छा अंमलात आणली. ही निवड अखेरची होती. त्याचे तारण करण्यासाठी देव अधिक काही करू शकत नव्हता. परंतु मनुष्य फसविला गेला होता; सैतानाच्या फसव्या युक्तीवादाने त्याचे मन अंधुक झाले होते. देवाच्या प्रेमाची उंची व खोली त्याला माहीत नव्हती. देवाच्या प्रेमाविषयी ज्ञान संपादनाची त्याला आशा होती. त्याच्या स्वभावाचे बारकाईने निरीक्षण केल्याद्वारे तो देवाकडे माघारी येऊ शकत होता. DAMar 664.1

ख्रिस्ताद्वारे देवाची दया मानवावर दाखविण्यात आली होती; परंतु दयेद्वारे न्यायत्व किंवा न्यायबुद्धीला बाजूला सारण्यात येत नव्हते. आज्ञाद्वारे देवाचा स्वभाव प्रगट करण्यात येतो, आणि पतीत मानवाला वर काढण्यासाठी त्यातील बिंदु किंवा अंश, रेषा यामध्ये बदल करण्यात येत नव्हता. देवाने आपली आज्ञा बदलली नाही परंतु मनुष्याच्या उद्धारासाठी त्याने ख्रिस्तामध्ये स्वतःचा बळी दिला. “देव ख्रिस्तामध्ये स्वतःबरोबर जगाचा समेट करीत होता. २ करिंथ. ५:१९. DAMar 664.2

आज्ञा (नियम) धार्मिकतेची, सात्त्विकतेची मागणी करितो-सात्त्विक जीवन, परिपूर्ण स्वभाव; आणि हा मनुष्य तो देऊ शकत नव्हता. देवाच्या पवित्र आज्ञाची तो मागणी पूर्ण करू शकत नव्हता. परंतु ख्रिस्त मानव म्हणून ह्या पृथ्वीवर आल्यावर तो पवित्र जीवन जगला आणि परिपूर्ण सात्त्विक स्वभाव त्याने वृद्धिंगत केला. स्वीकार करणाऱ्या सर्वांना तो ते फुकट दान प्रदान करितो. त्याचे जीवन मानवाच्या जीवनाची जागा घेते. अशा रीतीने देवाच्या सहिष्णुतीमुळे त्याच्या गत पापांची त्यांना माफी मिळते. ह्याहीपेक्षा ख्रिस्त मानवाला देवाच्या गुणधर्मानी भरून टाकितो. दैवी स्वभावाप्रमाणे तो मानवाच्या स्वभावाची बांधणी करितो त्याला आकार आणितो. अशा प्रकारे नियमाची धार्मिकता ख्रिस्ताद्वारे श्रद्धावंताच्या जीवनात पूर्ण होते. देवाने “नातिमान असावे आणि येशूवर विश्वास ठेवणाऱ्याला नीतिमान ठरविणारे असावे.’ रोम ३:२६. DAMar 664.3

त्याच्या न्यायीपणामध्ये देवाने दयेप्रमाणेच प्रेमही व्यक्त केले आहे. न्यायत्व त्याच्या सिंहासनाचा पाया आणि त्याच्या प्रेमाचे फळ आहे. सत्य व नायत्व यांच्यापासून दयेची हक्कालपट्टी करण्याचा सैतानाचा उद्देश होता. देवाच्या नियमाची सात्त्विकता शांतीचा शत्रू आहे हे सिद्ध करण्याचा सैतानाचा उद्देश होता. परंतु देवाच्या योजनेत ते अभेद्य सांधलेले आहे हे ख्रिस्त दाखवितो. परस्पराशिवाय त्यांना अस्तित्व नाही. “दया व सत्य ही एकत्र झाली आहेत; न्यायत्व व शांती यांनी एकमेकांचे चुंबन घेतले आहे.” स्तोत्र. ८५:१०. DAMar 664.4

त्याचे जीवन व मरण याद्वारे, देवाच्या न्यायीपणाने त्याच्या दयेचा नाश झाला नाही परंतु पापक्षमा मिळण्याची शक्यता आणि नियम सात्त्विक आहेत व त्यांचे पालन पूर्णपणे करू शकतो हे ख्रिस्ताने सिद्ध केले. सैतानाचे आरोप चुकीचे आहेत हे सिद्ध केले. देवाने आपल्या प्रेमाचे स्पष्ट आणि स्वच्छ पुरावे मानवाला दिले होते. DAMar 664.5

आणखी एक फसवेगिरी पुढे मांडायची होती. दयेमुळे न्यायाचा अधःपात झाला होता आणि ख्रिस्ताच्या मृत्यूने देवाच्या नियमात बदल झाला होता असे सैतानाने जाहीर केले होते. देवाच्या नियमात जर बदल झाला असता तर ख्रिस्ताला मरण्याची काही गरज नव्हती. परंतु देवाच्या नियमात बदल करणे म्हणजे पापाला अमरत्व देणे होय आणि सैतानाच्या सत्तेखाली जग आणणे होय. नियम न बदलणारे होते आणि त्याच्या पालनाद्वारे मनुष्याचे तारण साध्य होणार होते म्हणून ख्रिस्ताला वधस्तंभावर चढविले होते. ज्या साधनाने ख्रिस्ताने नियमाची प्रस्थापना केली तेच नाशकारक आहे असे सैतानाने प्रतिपादिले. ख्रिस्त आणि सैतान यांच्यामधील झगड्यातील हा शेवटचा मुद्दा असेल. DAMar 665.1

देवाने स्वतःच्या वाणीने सादर केलेला नियम सदोष आहे कारण त्यातील काही खुलासेवार सादर केलेला मजकूर काढून टाकण्यात आला होता हा ठपका सैतानाने आता ठेवला आहे. जगावर तो ही शेवटची फसवणूक आणील. सर्व नियमावर हल्ला करण्याची त्याला गरज नाही. एका नियमाचा अवमान करण्यास त्याने लोकांना भाग पाडले तर पुरे त्याद्वारे त्याचा हेतू साध्य होतो. “कारण जो कोणी संपूर्ण नियमशास्त्र पाळून एका नियमाविषयी चुकतो तो सर्वाविषयी दोषी होतो.’ याकोब २:१०. एक आज्ञा मोडण्याला मान्यता देऊन मानवाला सैतानाने आपल्या सत्तेखाली आणिले. देवाच्या नियमाच्या जागी मानवाचे नियम घालून सैतानाने जगावर ताबा प्रस्थापीत करण्याचा प्रयत्न केला. ह्या कार्याविषयी भाकितात वर्तविले आहे. असे घोषीत केले आहे की सैतानाची धर्मभ्रष्ट सत्ता “परात्पर देवाविरुद्ध गोष्टी बोलेल आणि परात्पर देवाच्या पवित्र जनांस जेर करील; ती नेमिलेल्या सणात व घालून दिलेल्या शिस्तीत बदल करावयास पाहील आणि ते तिच्या कबज्यात राहातील.” दानी. ७:२५. DAMar 665.2

मानवाच्या नियमांची प्रतिष्ठापना करून देवाचे नियम निष्फळ करण्याचा ते प्रयत्न करतील. त्यांच्या नियमांची अंमलबजावणी करण्याच्या आवेशात ते दुसऱ्यांच्या विवेक बुद्धीवर दबाव आणतील आणि बांधवावर जुलूम करतील. DAMar 665.3

देवाच्या नियमाविरुद्ध स्वर्गात सुरू झालेला झगडा शेवटपर्यंत चालू राहील. प्रत्येकाची तीव्र कसोटी होईल. आज्ञापालन किंवा आज्ञाभंग हे सर्व जगाने ठरवायचे आहे. देवाचे नियम किंवा मनुष्यांचे नियम ह्यामधून मनुष्याने ठरवायचे आहे. तेथे दुभागणारी रेषा काढण्यात येईल. तेथे दोन वर्ग असतील. प्रत्येक गुणाचा पूर्ण विकास होईल; आणि बंड किंवा इमानदारी ह्यातून त्यांनी कोणती निवड केली आहे हे सर्वांनी दाखवायचे आहे. DAMar 665.4

मग शेवट होईल. देव आपल्या नियमांचे समर्थन करून आपल्या लोकांची सुटका करील. सैतान आणि त्याच्या बंडात सामील होणाऱ्या सर्वांचा नाश होईल. पाप व पापी नष्ट होतील. मूळ आणि फांदी (मलाखी ४:१), - सैतान हा मूळ, आणि त्याचे अनुयायी ह्या फांद्या नाश पावतील. दुष्टाईच्या अधिपतीच्या बाबतीत वचन पूर्ण होईल, “कारण आपले चित्त देवाच्या चित्तासारखे आहे असा तू आव घालितोस; ... हे पाखर घालणाऱ्या करुबा, त्या अग्नीप्रमाणे झगझगणाऱ्या पाषाणामधून काढून मी तुझा नाश केला आहे... तू दहशत निर्माण करणारा होशील; तू त्याचे ठिकाण शोधशील पण त्याचा पत्ता लागणार नाही.” “आणि ती होती की नव्हती अशी ती होतील.’ यहज्के. २८:६-१९; स्तोत्र. ३७:१०; ओबद्या १६. DAMar 665.5

देवाच्या लहरी सत्तेची ही कृती नव्हती. कृपेचा धिक्कार करणाऱ्यांनी जे पेरिले त्याची त्यांनी कापणी केली. देव जीवनाचा निर्झर आहे; जो पापाची सेवा करितो तो देवापासून विभक्त होतो आणि जीवनाला पारखा होतो. ख्रिस्त म्हणतो, “ते ईश्वरी जीवनाला पारखे झाले आहेत.” “जे माझा द्वेष करितात त्या सर्वाला मरण प्रिय आहे.” इफिस. ४:१८; नीति. ८:३६. स्वतःचे गुणसंवर्धन करण्यासाठी आणि सत्यतत्त्वे प्रदर्शित करण्यासाठी देव त्यांना काही काळ अस्तित्व देतो. ते साध्य झाल्यावर त्यांच्या निवडीप्रमाणे त्यांना निष्पति लाभते. सैतान व त्याचे अनुयायी बंडात सामील होऊन देवापासून विभक्त झाले आणि त्याचे प्रत्यक्ष दर्शन त्यांना भस्म करणारा अग्नि होतो. जो प्रीती आहे त्याचे वैभव त्यांना नष्ट करील. DAMar 666.1

संघर्षाच्या सुरवातीला दिव्यदूतांना हे समजले नव्हते. सैतान व त्याच्या पाठीराख्यांना त्यांच्या पापाचे पूर्ण फळ चाखायला दिले असते तर ते नष्ट पावले असते परंतु स्वर्गीय गणाला ही त्यांच्या पापाची अनिवार्य निष्पति आहे असे समजले नसते. दुष्ट बीयामुळे दुष्टाईच्या व अरिष्टांच्या फळांची जशी निष्पति होते. तसे देवाच्या चांगुलपणाविषयी त्यांच्या मनात संदेह राहिला असता. DAMar 666.2

परंतु संघर्षाचा निमूळ नायनाट होईल तेव्हा तसे होणार नाही. तारणाची योजना पूर्ण होईल तेव्हा देवाचा स्वभाव सर्व निर्माण केलेल्या बुद्धिवंताना प्रगट करण्यात येईल. त्याचे नियम परिपूर्ण आणि न बदलणारे आहेत असे दिसून येईल. नंतर पापाचा पापीष्टपणा आणि सैतानाचा स्वभाव व्यक्त होईल. पापाचे निर्मूलन झाल्याने देवाच्या प्रीतीचे समर्थन होईल आणि त्याची आज्ञा ज्यांच्या अंतःकरणात वसते व तिचे पालन करण्यास ज्यांना अत्यानंद होतो त्यांच्यासमोर त्याचे गौरव प्रस्थापित होईल. DAMar 666.3

नंतर उद्धारकाच्या वधस्तंभाकडे पाहून दिव्यदूतांना अति हर्ष होईल. त्यावेळी ह्या सर्वांचा त्यांना जरी उमज झाला नाही तरी त्यांना सैतान व पाप यांचा समूळ नाश होणार यांची खात्री, मानवाचा उद्धार निश्चित आणि विश्वाच्या निरंतर सुरक्षितेची हमी याविषयी ज्ञान झाले. वधस्तंभावर केलेल्या यज्ञबलीच्या परिणामाचे ख्रिस्ताला पूर्णपणे आकलन झाले. वधस्तंभावर जेव्हा त्याने “पूर्ण झाले आहे’ असे उद्गार काढिले तेव्हा त्याने हे सर्व पुढे पाहिले होते. DAMar 666.4