Go to full page →

अध्याय १२—मोह DAMar 81

मत्तय ४:१-११; मार्क १:१२, १३; लूक ४:१-१३.

“येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन यार्देनेपासून मागे आला आणि त्याला आत्म्याने चाळीस दिवस अरण्यात नेले.” मार्कने काढलेले बोल अर्थपूर्ण आहेत. तो म्हणतो, “मग आत्म्याने त्याला लागलेच रानात घालविले आणि सैतान त्याची परीक्षा करीत असता तो अरण्यात चाळीस दिवस राहिला; तो वनपशूमध्ये होता.” “आणि त्या काळात त्याने काही खाल्ले नाही.’ DAMar 81.1

देवाच्या आत्म्याने येशूला अरण्यात परीक्षा घेण्यासाठी नेले होते. त्याने मोहाला आमंत्रण दिले नव्हते. एकांतात राहून त्याच्या जीवित कार्यावर चिंतन मनन करण्यासाठी तो अरण्यात निवांत स्थळी गेला. रक्ताने माखलेला पुढील रस्ता चालून जाण्यासाठी प्रार्थना व उपवास याद्वारे तो स्वतःची तयारी करीत होता. उद्धारक अरण्यात गेला आहे हे सैतानाला माहीत होते आणि त्याला भेटण्याची ही नामी संधि आहे असे त्याला वाटले. DAMar 81.2

प्रकाशाचा अधिपती आणि दुष्टपणाच्या राज्याचा पुढारी यांच्यामधील संघर्षात जगासाठी असलेले महत्त्वाचे विषय धोक्यात होते. मनुष्याला मोहात पाडून पाप करायला लावल्यावर ही पृथ्वी त्याच्या मालकीची आहे असे हक्काने सांगितले आणि तो ह्या पृथ्वीचा अधिपती असल्याचे जाहीर केले. लोकांनी त्याला सम्राट म्हणून निवडले आहे असे त्याने सांगितले. माणसाना नियंत्रित करून जगावर अधिकार प्रस्तापित केला. सैतानाने सांगितलेला मालकी हक्क खोटा आहे हे सिद्ध करण्यासाठी ख्रिस्त प्रगट झाला. मानवपुत्र म्हणून ख्रिस्त देवाशी एकनिष्ठ राहील. अशा रीतीने संपूर्ण मानवजात सैतानाच्या कबज्यात नाही हे दाखविले जाते. म्हणून सैतानाचा पृथ्वीवरील हक्क खोटा ठरतो. ह्या अधिकारातून सुटका करून घेण्याची इच्छा असलेल्यांची सुटका करण्यात येईल. पापामुळे आदामाने गमावलेले अधिपत्य पुन्हा मिळविता येईल. DAMar 81.3

एदेन बागेत केलेल्या घोषणेत सापाला सांगितले, “तू व स्त्री, तुझी संतति व तिची संतति यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन” (उत्पत्ति ३:१५), ह्यावरून सर्व जगावर संपूर्ण अधिकार नाही हे सैतानाला समजले होते. त्याच्या अधिकाराच्या विरूद्ध लढा देणाऱ्या शक्ती लोकांमध्ये कार्यरत आहेत हे दिसले. आदाम आणि त्याच्या पुत्रांनी केलेला यज्ञबली त्याने मन लावून पाहिला. ह्या यज्ञामध्ये पृथ्वी आणि स्वर्ग यामध्ये असलेला संबंध त्याच्या ध्यानात आला. ह्या संबंधाचा अर्थ सांगण्याचे त्याने ठरविले. त्याने देवाविषयी आणि ख्रिस्ताचे दर्शक असलेला विधिसंस्कार यांचा चुकीचा अर्थ सांगून विपर्यास केला. देवाला विध्वंश करण्यात आनंद आहे असे सांगून लोकांच्या मनात भीती निर्माण केली. प्रेम प्रगट करण्याच्या ऐवजी त्याचा क्रोध शांत करण्यासाठी यज्ञार्पणे होत होती. लोकांचा दुष्ट मनोविकार प्रक्षुब्ध करून सैतानाने त्यांच्यावरील सत्ता दृढ करण्याचा डाव केला. देवाचे वचन लिखीत स्वरूपात आल्यावर उद्धारकाच्या आगमनाविषयीच्या भाकीताचा सैतानाने अभ्यास केला. पिढ्यान् पिढ्या लोकांची मने अंध करून आगमनसमयी त्यांनी ख्रिस्ताचा नाकार करावा यासाठी तो फार प्रयत्न करीत होता. DAMar 81.4

येशूच्या जन्माच्या वेळी, त्याच्या आधिपत्याला प्रतिकार करण्यासाठी दैवी अधिकाराने तो आलेला आहे हे सैतानाला माहीत होते. नवीन जन्मास आलेल्या राजाविषयी देवदूताने काढलेल्या उद्गाराने तो भयभीत झाला. पित्याचा प्रिय या नात्याने ख्रिस्ताचा स्वर्गात असलेला मानसन्मान सैतानाला ज्ञात होता. देवपुत्र मानव म्हणून पृथ्वीवर येणे ह्या विचाराने तो आश्चर्यचकीत आणि भयभीत झाला. ह्या महान यज्ञाचे रहस्य तो उकलू शकला नाही. फसलेल्या मानवजातीसाठी व्यक्त केलेले प्रेम त्याच्या स्वार्थी मनाला उमगले नाही. स्वर्गातील गौरव व शांती आणि देवाच्या सख्यसंबंधातील आनंद ह्यांचा अर्थ अंधुकरित्या मानवाला समजला पण (लुसीफराला) सैतानाला ते पूर्णपणे समजले होते. स्वर्गातून तो खाली पडल्यानंतर इतराबरोबर सलगी करून त्याचा मोबदला घेण्याचा त्याने निश्चय केला. स्वर्गीय मूल्याची निर्भर्त्सना करून लोकांची मने जगीक गोष्टीवर केंद्रित करण्याद्वारे ते साध्य करण्याचा तो प्रयत्न करणार होता. DAMar 82.1

अडथळ्याविना लोकांची मने स्वर्गीय राज्याकडे वळविण्याचे काम स्वर्गीय सम्राटाला करावे लागले नाही. बेथलेहेममध्ये तो बाळ असल्यापासून सैतानाने सतत त्याच्यावर हल्ला केला. ख्रिस्तामध्ये देवाची प्रतिमा प्रगट झाली होती आणि त्याच्यावर मात करण्याचा सैतानाच्या सल्लागार मंडळाने निर्धार केला. जगात आलेली कोणतीही व्यक्ती ह्या फसव्याच्या तावडीतून सुटली नाही. दुष्ट शक्तींच्या कटाने त्याच्यावर पाळत ठेवून त्याच्याशी लढा देऊन त्याला नामशेष करण्याचा निश्चय केला. DAMar 82.2

उद्धारकाच्या बाप्तिस्म्याच्या समयी सैतान हजर होता. पित्याचे गौरवी तेज पुत्रावर अधिक तेजस्वी दिसत असल्याचे त्याने पाहिले. येशूच्या देवत्त्वाची घोषणा करणारी यहोवाहाची वाणी त्याने ऐकली. आदामाने पाप केल्यापासून देवाच्या प्रत्यक्ष सख्यसंबंधापासून मानव दुरावला होता; ख्रिस्ताद्वारे स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यातील दळणवळण सुरू झाले; आणि आता स्वतः पित्याने म्हटले, “पापी देहासारख्या देहाने’ येशू आला होता (रोम ८:३). आतापर्यंत ख्रिस्ताद्वारे त्याने मानवाशी दळणवळण ठेविले होते; परंतु आता तो ख्रिस्तामध्ये दळणवळण करितो. देवाला दुष्टाईचा तिटकारा, वीट असल्यामुळे स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामध्ये निरंतरचा वियोग, ताटातूट होईल असे सैतानाला वाटले होते. परंतु आता हा संबंध पुनर्स्थापित करण्यात आला हे उघड होते. DAMar 82.3

जींकू किंवा जीकला जाऊ हा मंत्र सैतानापुढे होता. संघर्षातील मुद्दे कठीण असे समजून ते हाताळण्याची जबाबदारी कटातील इतरावर सोपविण्याच्या ऐवजी स्वतःच त्याने तो लढा हातात घेतला. सर्व भ्रष्ट शक्तींचा लढा देवपुत्राच्या विरूद्ध होता. प्रत्येक दुष्ट हत्याराचे लक्ष ख्रिस्ताला केले होते. DAMar 83.1

ख्रिस्त आणि सैतान यांच्यामधील संघर्षाचा परिणाम आपणावर काही होणार नाही असे समजून पुष्कळजण त्याविषयी बेफिकीर राहातात. परंतु प्रत्येकाच्या जीवनात ह्या संघर्षाची पुनरावृत्ती होत आहे. सैतानाच्या हल्ल्याला तोंड दिल्याशिवाय कोणीही आपला अमर्धाचा मार्ग सोडून देवाच्या सेवेकडे वळणार नाही. ज्या मोहांना ख्रिस्ताने प्रतिकार केला त्यांना तोंड देण्यास आम्हाला कठीण झाले आहे. त्याचा स्वभाव आम्हाला जसा सरस आहे तसेच त्यांची तीव्र निकड त्याच्यापुढे मांडली होती. जगाच्या पापाचे मोठे ओझे घेऊन ख्रिस्ताने भुकेच्या कसोटीला. जगाच्या प्रेमपाशाला आणि आढ्यतेचे प्रदर्शन करण्याच्या मोहाला टक्कर दिली. ज्या मोहपाशाला आदाम व हवा बळी पडले तेच आम्हावर सहजगत्या मात करतील. DAMar 83.2

देवाच्या आज्ञा अन्यायी असून त्याचे पालन करू शकत नाही हे सिद्ध करण्यासाठी सैतानाने आदामाचे पाप पुढे केले. आदामाच्या अपयशाची भरपाई ख्रिस्त आमच्या मानवतेमध्ये करणार होता. भुलवणाऱ्याने आदामावर हल्ला केला तेव्हा पापाचे परिणाम त्याच्यावर झाले नव्हते. शारीरिक आणि मानसिक शक्तीने तो सुदृढ असून त्याने त्याला तोंड दिले. एदेन बागातील ऐश्वर्यात तो रमलेला असून सतत त्याचा स्वर्गाशी संबंध होता. अरण्यामध्ये सैतानाशी तोंड देतांना त्याची परिस्थिती अशी नव्हती. गेली चार हजार वर्षे मानवजात शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्टीने खालावलेली होती; आणि निकृष्ट मानवतेचा दुबळेपणा ख्रिस्ताने परिधान केला होता. अशा रीतीने तो मानवाचा बचाव करू शकत होता. DAMar 83.3

पुष्कळांना वाटते की ख्रिस्तावर मोहाचा विजय होणे अशक्य होते. तेव्हा त्याला आदामाच्या परिस्थितीत ठेवले नसते; आदाम अपयशी झाला तेथे त्याला यश प्राप्ती झाली नसती. ख्रिस्तापेक्षा अधिक तीव्र संघर्षाला आम्हाला तोंड द्यावे लागले असते तर त्याने आम्हाला मदत केली नसती. ख्रिस्ताने तिच्या उणीवासहित मानवता परिधान केली. त्याने मनुष्याचा स्वभाव धारण केला. तो मोहाला बळी पडण्याची शक्यता होती. त्याने न सहन केलेल्याला आम्हाला तोंड द्यावे लागणार नाही. DAMar 83.4

एदेनातील पवित्र दांपत्याप्रमाणेच ख्रिस्तावर आलेल्या पहिल्या मोहाचा पाया भूक होता. जेथे उध्वंशाला सुरूवात झाली तेथेच उद्धारकार्य सुरू झाले पाहिजे. भूकेच्या अनावर लाडामुळे आदामाचे जसे पतन झाले तसेच भूकेच्या अनावर प्रवृत्तीवर मात करून ख्रिस्त विजयी झाला. “मग तो चाळीस दिवस व चाळीस रात्री उपाशी राहिल्यानंतर त्याला भूक लागली. तेव्हा परीक्षक त्याजजवळ येऊन म्हणाला तू देवाचा पुत्र असलास तर या धोंड्याच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर; परंतु त्याने असे उत्तर दिले की, मनुष्य केवळ भाकरीने नाही तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल, असे लिहिले आहे.” DAMar 84.1

आदामापासून ते ख्रिस्ताच्या काळापर्यंत चैनबाजीमुळे खाणेपिणे आणि अनुराग, मनोविकार वाढत्या प्रमाणात राहील, शेवटी त्याच्यावर आळा, ताबा राहिला नाही. अशा रीतीने मनुष्य खालच्या पातळीवर जाऊन रोगी बनला, आणि स्वसामर्थ्याने त्यातून मान वर काढणे त्याला अशक्य झाले. माणसाच्या वतीने ख्रिस्ताने तीव्र कसोटीला तोंड देऊन विजय मिळविला. भूक किंवा मरण यापेक्षा आमच्यासाठी त्याने अधिक आत्मसयमन केले. अंधाराच्या सत्तेच्या संघर्षात अंतर्भूत असलेल्या सर्व बाबी ह्या पहिल्या विजयात समाविष्ट झाल्या आहेत. DAMar 84.2

येशूने अरण्यात प्रवेश केला तेव्हा त्याच्यावर पित्याचे गौरव होते. देवाशी संवाद करण्यात गुंग होता तेव्हा तो मनुष्याच्या दुर्बलतेपासून मुक्त होता. प्रत्येक क्षण त्याच्यावर दडपण आणीत होता. त्याच्यापुढे ठाण मांडून बसलेल्या संघर्षामुळे त्याचा मानवी स्वभाव कचरत होता. चाळीस दिवस उपवास करून त्याने प्रार्थना केली. गळून गेलेला आणि भुकेने रोड व क्षीण झालेला, शारीरिक तीव्र वेदनाने थकलेला आणि निस्तेज झालेला होता. “त्याचा चेहरा मनुष्यांच्यासारखा नव्हता, त्याचे स्वरूप मनुष्य जातीसारखे नव्हते इतका तो विरूप होता.’ यशया ५२:१४. आता सैतानाला सुसंधि मिळाली. त्याला वाटले आता तो ख्रिस्तावर सहजरित्या मात करील. DAMar 84.3

त्याच्या प्रार्थनेचे जणू काय उत्तर म्हणून स्वर्गातून दूताच्या वेषात एकजण उद्धारकाकडे आला. ख्रिस्ताचा उपवास संपलेला आहे हे सांगण्यासाठी तो देवाचा संदेश घेऊन आला होता. इसाकाचा बळी देण्यापासून देवाने आब्राहामाचा हात आवरण्यासाठी दूताला जसे पाठविले होते तसेच रक्ताने माखलेल्या रस्त्यावर चालण्यास ख्रिस्त राजी असल्याचे पाहून त्याची सुटका करण्यासाठी दूताला पाठविण्यात आले होते. हा संदेश ख्रिस्ताला दिला. उद्धारक भुकेने व्याकूळ झाला होता. खाण्यासाठी तो याचना करीत होता. त्याचवेळेस सैतान अचानक तेथे आला. जंगलात सर्वत्र विखुरलेले दगड पाहून त्याने म्हटले, “तू देवाचा पुत्र असलास तर या धोंड्यांच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर.” DAMar 84.4

प्रकाशाचा दूत असल्याचे जरी त्याने भासविले तरी त्याचे हे शब्द त्याच्या स्वभावाचा विश्वासघात करितात. “जर तू देवाचा पुत्र असलास.” ह्यातच अविश्वास, शंका याची खोच, लाघव आहे. सैतानाच्या म्हणण्याप्रमाणे येशूने केल्यास त्या शंकेचा स्वीकार केल्यासारखे होईल. प्रारंभी ज्या साधनाने मानवजातीला धुळीस मिळविले त्याच साधनाने ख्रिस्ताचा दारुण पराजय करण्याची योजना भुलविणाऱ्याची होती. एदेन बागेत अगदी कुशलतेने सैतान हवेशी बोलला! “तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले हे खरे काय?” उत्पत्ति ३:१. आतापर्यंत भुरळ घालणाऱ्याचे शब्द बरोबर होते; परंतु ज्या शैलीने त्याने हे उद्गार काढिले त्यात कपटवेषाचा तिटकारा होता. त्यात दैवी सत्याविषयी शंका, लपलेला नकार होता. देव उक्तीप्रमाणे कृती करीत नाही हा विचार हवेच्या मनात घालण्याचा सैतान प्रयत्न करीत होता; अशा प्रकारचे उत्तम फळ त्यांच्यापासून मागे ठेवणे, नाकारणे हे मानवाविषयी असलेल्या त्याच्या प्रीतीत कसे बसते! म्हणून आता सैतान स्वतःच्या अभिप्रायाने ख्रिस्ताला स्फूर्ती देण्याचा प्रयत्न करीत आहे. “जर तू देवपुत्र असलास.” त्याच्या मनात हे शब्द कडवटपणाने सलत होते. त्याच्या वाणीच्या आवाजातच निखालस अश्रद्धा व्यक्त होत होती. देव आपल्या पुत्राला अशी वागणूक देईल काय? अन्न पाण्यावाचून, हाळात, बिनासोबतीचा, जंगली जनावरामध्ये त्याला अरण्यात सोडील काय? अशा दुःसह अवस्थेत पुत्राने असावे असे देवाला कदापीही वाटले नाही. “जर तू देवाचा पुत्र असलास’ तर व्याकूळ झालेल्या भुकेचे शमन करण्याचे सामर्थ्य दाखीव. ह्या धोंड्यांच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर. DAMar 84.5

“हा माझा पुत्र, मला परमप्रिय, याजवर मी संतुष्ट आहे” (मत्तय ३:१७.) हे शब्द सैतानाच्या कानात घोळत होते. परंतु ही वाणी विश्वसनीय नाही हे ख्रिस्ताला पटवून देण्याचा तो अटोकाट प्रयत्न करीत होता. देवाची वाणी त्याच्या दैवी कार्याची खात्री होती. मनुष्य या नात्याने मानवामध्ये राहाण्यास तो आला होता, आणि त्या वाणीद्वारे स्वर्गाशी असलेला संबंध घोषीत केला होता. त्या वाणीविषयी मनात शंकाकुशंका निर्माण करण्याचा प्रयत्न सैतान करीत होता. देवावरील ख्रिस्ताचा विश्वास एकदा डळमळीत केला की संपूर्ण संघर्षात आपला विजय हमखास हे सैतान जाणून होता. तो येशूवर प्रभुत्व मिळवू शकत होता. त्याला वाटले की तीव्र निराशा आणि भूकेची व्याकुळता यामुळे ख्रिस्ताचा देवावरील विश्वास ढळेल आणि स्वतःसाठी तो चमत्कार करील. त्याने तसे केले असते तर तारणाची योजना मोडखळीस आली असती. DAMar 85.1

प्रथमच ह्या संघर्षात, लढ्यात सैतान आणि देवपुत्र समोरासमोर आले तेव्हा ख्रिस्त स्वर्गीय गणाचा सरसेनापती होता; आणि सैतान स्वर्गातील बंडाचा पुढारी होता, त्याला खाली टाकण्यात आले होते. वरकरणी त्यांची परिस्थिती आता व्यस्त, उलटी झाली होती आणि शक्यतो त्याचा अधिक फायदा करून घेण्याचा सैतान प्रयत्न करीत होता. तो म्हणतो दूतांतून एका महान शक्तीशाली दूताला स्वर्गातून हाकलण्यात आले आहे. येशूच्या चेहऱ्यावरून दिसते की खाली पडलेला दूत तो असावा, देवाने त्याग केलेला आणि माणसाने नाकारलेला. दैवी व्यक्ती चमत्कार करून आपला हक्क, अधिकार शाबूत ठेवील; “जर तू देवाचा पुत्र असलास तर या धोंड्याच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर.” अशा प्रकारची उत्पादक शक्ती देवत्त्वाची साक्ष आहे असे त्याने आग्रहाने सांगितले. त्याद्वारे लढा संपुष्टात येईल. DAMar 85.2

येशूने अदृल दगलबाजाचे म्हणणे शांतपणे पण प्रयासाने ऐकून घेतले. परंतु देवपुत्र आपले देवत्त्व सैतानाला सिद्ध करून दाखविणार नव्हता किंवा त्याच्या मानहानीचे स्पष्टीकरण करणार नव्हता. बंडखोराची मागणी मान्य करून मानवाचे कल्याण किंवा देवाचे गौरव होणार नव्हते. शत्रूची सूचना ख्रिस्ताने मान्य केली असती तर सैतानाने पुढे म्हटले असते की तू देवपुत्र असल्याची खूण मला दाखीव म्हणजे मी विश्वास ठेवीन. त्याच्या मनातील बंडखोर वृत्तीचे खंडन करण्यासाठी सादर केलेल्या पुराव्याचा काही लाभ झाला नसता. स्वतःच्या फायद्यासाठी ख्रिस्त दैवी सामर्थ्याचा वापर करणार नव्हता. आमच्याप्रमाणे त्याची परीक्षा, कसोटी झाली पाहिजे होती आणि त्याद्वारे श्रद्धा आणि नम्रता या बाबतीत तो आमचा किता, आदर्श राहाणार होता. या ठिकाणी किंवा पृथ्वीवरील त्याच्या जीवनात केव्हाही त्याने स्वतःच्या हितासाठी, कल्याणासाठी चमत्कार केला नव्हता. त्याचे अद्भुत कार्य दुसऱ्यांच्या कल्याणासाठी होते. प्रारंभापासून येशू सैतानाला ओळखून होता आणि त्याच्या वादात पडण्यास त्याला स्वारस्य नव्हते. स्वर्गातील वाणीने अधिक बलवान होऊन पित्याच्या प्रीतीत तो विसावला होता. मोहाशी तो समेट करणार नव्हता. DAMar 86.1

येशूने सैतानापुढे शास्त्रवचन मांडले. त्याने म्हटले, “असे लिहिले आहे.” देवत्त्वाच्या खूणेसाठी सैतानाने येशूपासून चमत्काराची मागणी केली होती. सर्व चमत्कारापेक्षा श्रेष्ठ म्हणजे “प्रभु असे म्हणतो” यावर सर्वस्वी अवलंबून राहाणे हे चिन्ह निर्विवाद आहे. ह्या भूमीकेशी ख्रिस्त चिकटून राहिल्याने सैतानाला काही फायदा होऊ शकला नाही. DAMar 86.2

अति दुर्बलतेच्या वेळी ख्रिस्तावर उग्र मोहाचे हल्ले होत होते. अशा प्रकारे वर्चस्व मिळविण्याचा सैतानाचा व्याप होता. ह्या उपद्व्यापाने मनुष्यावर त्याने विजय संपादन केला होता. जेव्हा शक्तीहीन बनतो, इच्छाशक्ती कमजोर होते, आणि देवावरील विश्वास डळमळीत होतो तेव्हा सत्यासाठी दृढ आणि बळकट राहिलेल्यांच्यावर मात करण्यात येते. मोशे अरण्यामध्ये चाळीस वर्षे इस्राएल लोकाबरोबर भटकत असतांना थकून गेला होता त्यावेळेस अनंत सामर्थ्यावरील त्याच्या विश्वासाची पक्कड क्षणासाठी ढिली पडली होती. आश्वासीत देशाच्या सीमेवरच हे घडले. तीच कथा एलीयाची. तो अहाब राजापुढे धैर्याने उभे राहिला होता. बालमूर्तीच्या साडेचारशे संदेष्ट्यासहित इस्राएल राष्ट्राला त्याने तोंड दिले होते; कार्मेल डोंगरावरील भयंकर घटनेनंतर, खोट्या संदेष्ट्यांची कत्तल केल्यावर, देवाशी एकनिष्ठ राहाण्याचे लोकांनी घोषीत केल्यानंतर मूर्तीपूजक ईजबेलच्या धमकीला भिऊन यलीया जीव घेऊन पळून गेला होता. अशा प्रकारे सैतानाने मानवाच्या अशक्तपणाचा फायदा करून घेतला आहे. ह्या प्रकारेच आतासुद्धा तो तसेच करील. जेव्हा एकादा ढगांनी घेरला जातो, परिस्थितीने गोंधळून जातो, किंवा गरीबीने वा तणावाने ग्रस्त होऊन जातो तेव्हा सैतान मोहपाशात अडकवण्यासाठी किंवा अति त्रासात पाडण्यासाठी सज्ज असतो. स्वभावातील उणीवता, कमकुवतपणा यावर तो हल्ला करितो. देवावरील आमचा विश्वास ढासळण्यासाठी तो आम्हाला हालवून सोडतो. विश्वास ढासळण्यासाठी, त्याच्या प्रेमावर साशंक होण्यासाठी आमच्यावर मोह येतात. आमच्या उणीवता आणि अशक्तपणा पुढे मांडून, ख्रिस्तापुढे सैतान जसा उभा राहिला तसाच आमच्यापुढे उभा राहातो. व्यक्तीची निराशा करून देवावरील त्याची श्रद्धा ढिली करण्याचा तो प्रयत्न करितो. त्यानंतर सावज पकडीत आल्याची तो खात्री करून घेतो. ख्रिस्ताप्रमाणे आम्ही मोहाला तोंड दिल्यास आमच्यावर येणारे पुष्कळ पराजय टळतील. शत्रूशी लाडीगोडी करण्याद्वारे आम्ही त्याला संधि देतो, लाभ करून देतो. DAMar 86.3

ख्रिस्ताने सैतानाला बोललेले शब्द “मनुष्य केवळ भाकरीने नाही तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल,’ चौदाशे वर्षापूर्वी इस्राएलाला बोललेल्या शब्दांची ही पुनरावृती होती. त्याने इस्राएलाला म्हटले, “तुझा देव परमेश्वर ही चाळीस वर्षे रानातून तुला घेऊन आला... त्याने तुला लीन केले, तुझी उपासमार होऊ दिली, तेव्हा तुला किंवा तुझ्या पूर्वजास ठाऊक नसलेला जो मान्ना त्याच्या योगाने त्याने तुझे पोषण केले; ते यासाठी की मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल हे तुझ्या प्रत्ययास आणून द्यावे.” अनुवाद ८:२, ३. जेव्हा अरण्यामध्ये उपजीविकेची सर्व साधने कमी पडली, अपयशी ठरली तेव्हा देवाने लोकासाठी आकाशातून मान्ना पाडला; तो पुरेसा आणि सतत पडत होता. देवावर विश्वास ठेवून त्याच्या मार्गावरून वाटचाल केली तर देव त्यांना पारखा होणार नव्हता हा धडा त्यांना ह्या घटनेद्वारे शिकवायचा होता. इस्राएलाला घालून दिलेला धडा उद्धारकाला आता तो अमलात आणावयाचा होता. देवाच्या वचनाने इस्राएल लोकांना मदत मिळाली आणि त्याच शब्दाने ही मदत येशूला मिळणार होती. मदत मिळण्यासाठी तो देवाच्या वेळेची वाट पाहात होता. तो अरण्यात देवाच्या आज्ञेमुळे होता आणि सैतानाचे ऐकून त्याला जेवण मिळणार नव्हते. देवाची आज्ञा अवमानण्याऐवजी आलेल्या कोणत्याही संकटाला तोंड देणे सोपे आहे अशी साक्ष याद्वारे जगापुढे दिली. DAMar 87.1

“मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने वाचेल.” वारंवार असे घडते की, ख्रिस्ताच्या अनुयायाला देवाची धंड सेवा करता येत नाही आणि त्याच वेळी त्याचे जगातील कार्यही पार पाडता येत नाही. कदाचित देवाची इच्छा अमलात आणतांना त्याच्या निर्वाहाची साधने तुटली जातील. सदसद्विवेक बुद्धिशी प्रामाणिक असलेल्या खात्रीवर त्याने पाणी सोडावे ह्यासाठी सैतान आग्रही राहील. ह्या जगामध्ये आम्ही केवळ देवाच्या वचनावरच अवलंबून राहू शकतो. “तुम्ही प्रथम त्याचे राज्य व त्याची धार्मिकता मिळवावयाची खटपट करा, म्हणजे याबरोबर तीही सर्व तुम्हास मिळतील.’ मत्तय ६:३३. सद्यासुद्धा देवाच्या इच्छेविरुद्ध जाणे हिताचे नाही. देवाच्या वचनाच्या सामर्थ्याचे आकलन झाल्यावर अन्नपाणी मिळण्यासाठी किंवा जीवाचे रक्षण करण्यासाठी आम्ही सैतानाच्या सूचना मान्य करणार नाही. देवाची आज्ञा काय आहे हाच केवळ आमचा प्रश्न असणार? त्याचे अभिवचन काय आहे? हे समजल्यावर आम्ही एकाचे पालन करू आणि दुसऱ्यावर विश्वास ठेऊ. DAMar 87.2

सैतानाबरोबर चाललेल्या शेवटच्या महान संघर्षाच्यावेळी देवाशी एकनिष्ठ असलेले जगातील सर्व आधार कापून टाकण्यात आलेले पाहातील. देवाची आज्ञा पाळण्यासाठी ते जगातील सत्ताधिशाचा अवमान करतात म्हणून त्यांचे विकत घेणे व विकत देणे यावर बंदी घालण्यात येईल. शेवटी त्यांच्यावर मरण दंडाची शिक्षा ठोठावण्यात येईल. प्रगटी. १३:१११७ पाहा. परंतु आज्ञाधारकांना अभिवचन देण्यात आले आहे, “तो उच्च स्थानी वास करील, दुर्गम पहाड त्याचा दुर्ग होईल, त्याला अन्नाचा मुबलक पुरवठा होईल, त्याचे जल आटणार नाही.” यशया ३३:१६. ह्या आश्वासनाने देवाचे लोक जीवंत राहातील. दुष्काळाने पृथ्वी ओसाड होईल तेव्हा त्यांना अन्न पुरविले जाईल. “ते विपत्काली लज्जित होणार नाहीत; दुष्काळाच्या दिवसात तृप्त राहतील.’ स्तोत्र. ३७:१९. ह्या विपत्तीच्या काळाकडे हबक्कूक संदेष्ट्याने दृष्टी फेकली आणि त्याच्या शब्दात मंडळीचा विश्वास प्रकट करण्यात आला आहे: “अंजीराचे झाड न फुलले, द्राक्षीच्या वेलीस फळ न आले, जैतुनाचे उत्पन्न बुडाले, शेतात धान्य न पिकले, मेंढवाड्यातील कळप नाहीतसे झाले, व गोठ्यात गुरेढोरे न उरली, तरी मी परमेश्वराच्या ठायी हर्ष पावेन, मला तारण देणाऱ्या देवाविषयी मी उल्लास करीन.’ हबक्कूक ३:१७, १८. DAMar 88.1

प्रभूवर आलेल्या पहिल्या मोहापासून जितके धडे शिकता येतात त्यामध्ये सर्वांत महत्त्वाचा धडा म्हणजे भूक आणि तीव्र भावना, मनोविकार यावर नियंत्रण ठेवणे होय. सर्व युगामध्ये शारीरिक स्वभावाला भुरळ टाकणारे मोह मानवजातीला भ्रष्ट करून निकृष्टावस्थेत नेण्यास फार प्रभावी ठरलेले आहेत. मानसिक आणि आत्मिक सामर्थ्याची अमूल्य देणगी देवाने मानवाला प्रदान केली आहे तिचा नाश सैतान अतिरेक, असंयम याद्वारे करितो. त्यामुळे अनंत मूल्याच्या गोष्टींचे मोल ठरविणे किंवा गुण ओळखणे मनुष्याला अशक्य होऊन जाते. मनुष्य देवाच्या प्रतीमेचा निर्माण केला आहे ही विचारसरणी मनुष्यापासून पूर्णतः पुसून टाकण्याचा प्रयत्न विषयासक्त अनावर लाडाद्वारे सैतान करितो. DAMar 88.2

अनियंत्रित अतिरेक किंवा अनावर लाड आणि परिणामी येणारे रोग आणि अवनति ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनाच्यावेळेस अस्तित्वात होती ती मोठ्या प्रमाणात इजा करणारी अशी ख्रिस्ताच्या द्वितियागमनाच्या वेळी अस्तित्वात असेल. ख्रिस्ताने घोषीत केले आहे की, जगाची स्थिती जलप्रलयाच्या अगोदरच्या सारखी आणि सदोम आणि गमोरासारखी राहील. त्यांच्या मनात येणारे सर्व विचारतरंग केवळ एकसारखे वाईट असतील. अशा त्या भयानक काळात आम्ही राहात आहोत. म्हणून ख्रिस्ताच्या उपवासाचा धडा आमच्या मनाला उकलला पाहिजे. त्याने दिलेल्या उदाहरणावरून स्पष्ट होते की, ईश्वरेच्छेच्या नियंत्रणाखाली भूकलालसा आणि अनावर भावना किंवा मनोविकार आणल्याशिवाय अनंतकालिक जीवनाची आशा नाही. DAMar 88.3

आमच्या भ्रष्ट स्वभावातील गलबला, गोंगाट स्वःसामर्थ्याने नाकारणे मुष्किलीचे आहे. ह्या मार्गाने सैतान आम्हावर मोहपाश आणील. आनुवंशिक उणिवतेचा फायदा उपसण्यासाठी आणि खोट्या लाघवी भाषणाने देवावर श्रद्धा नसलेल्यांना मोहपाशात अडकवण्यासाठी शत्रू प्रत्येक व्यक्तीकडे जाईल हे ख्रिस्ताला ज्ञात होते. माणसाला ज्या रस्त्यावरून जावे लागणार त्यावरून जाऊन प्रभूने आमच्या विजयाचा मार्ग तयार करून ठेविला आहे. सैतानाबरोबरच्या झगड्यात आमची अडचण व्हावी अशी त्याची इच्छा नाही. सर्पाच्या हल्ल्याने आम्ही निराश व भयभीत व्हावे अशी त्याची इच्छा नव्हती. त्याने म्हटले, “धीर धरा; मी जगाला जिंकिले आहे.” योहान १६:३३. DAMar 89.1

भूकेवर नियंत्रण ठेवण्याच्या बाबतीत जे झगडत आहेत त्यांनी अरण्यातील मोहाला तोंड दिलेल्या उद्धारकावर दृष्टिविक्षेप करावा. “मला तहान लागली आहे’ असे म्हणताना प्राणांतिक यातनेतून जाणाऱ्या वधस्तंभावरील येशूवर नजर केंद्रित करा. आम्हाला भोगावे लागणाऱ्या सर्व गोष्टी त्याने सहन केल्या आहेत. त्याचा विजय तो आमचा आहे. DAMar 89.2

समंजसपणा आणि सामर्थ्य यासाठी येशू आपल्या स्वर्गीय पित्यावर अवलंबून होता. त्याने जाहीर केले, “प्रभु परमेश्वर मला साहाय्य करणार म्हणून मी लज्जित झालो नाही... माझी फजिती होणार नाही हे मला ठाऊक आहे... पाहा, प्रभु परमेश्वर माझा साहाय्यकर्ता आहे.” स्वतःचे उदाहरण पुढे करून तो म्हणतो, “परमेश्वराचे भय बाळगणारा तुमच्यामध्ये कोण आहे? ... जो अंधारात चालतो आणि ज्याला प्रकाश मिळत नाही त्याने परमेश्वराच्या नामावर भाव ठेवावा आणि आपल्या देवाचा आश्रय करावा.’ यशया ५०:७-१०. DAMar 89.3

येशूने म्हटले, “जगाचा अधिकारी येतो; तरी मजमध्ये त्याचे काही नाही.” योहान १४:३०. सैतानाच्या फसव्या युक्तीवादाला प्रत्युत्तर देण्यासारखे त्याच्याठायी काही नव्हते. पाप करण्याला त्याने संमती दिली नव्हती. विचारानेसुद्धा तो मोहाला बळी पडला नाही. तीच गोष्ट आमची होऊ शकेल. ख्रिस्ताची मानवता देवत्त्वाशी संलग्न झाली होती; पवित्र आत्म्याच्या वास्तव्याद्वारे तो ह्या लढ्यासाठी सज्ज झाला होता. दैवी स्वभावाचे आम्हाला सहकारी बनविण्यासाठी तो आला. जोपर्यंत आम्ही विश्वासाने त्याच्याशी एकचित्त झालो आहोत तोपर्यंत देवत्त्वाला विश्वासाने मिठी मारावी म्हणून देव आम्हाला मार्गदर्शन करितो. DAMar 89.4

हे साध्य कसे करता येईल हे ख्रिस्ताने दाखवून दिले आहे. सैतानाबरोबरच्या संघर्षात कोणत्या साधनाने त्याला विजय मिळाला? देववचनाद्वारे. केवळ वचनाद्वारेच तो मोहाचा प्रतिकार करू शकला. त्याने म्हटले, “असे लिहिले आहे.” “त्यांच्या योगे मोलवान व अति महान अशी वचने आपल्याला देण्यात आली आहेत, यासाठी की त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे विभागी व्हावे.” २ पेत्र १:४. देवाच्या वचनातील प्रत्येक आश्वासन आमचे आहे. “देवाच्या मुखातून निघणारा प्रत्येक शब्द” आमच्या जीवनासाठी आहे. जेव्हा मोहाचा हल्ला होतो त्यावेळी परिस्थिती किंवा स्वतःमधील उणीवता ह्यांचा विचार न करता देववचनावर मन केंद्रित करा. त्यातील सर्व सामर्थ्य तुम्हाला लाभेल. स्तोत्रकर्ता म्हणतो, “मी तुझ्याविरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेविले आहे.” “तुझ्या तोंडच्या वचनाने मी आपणाला जबरदस्तांच्या (संहारक) मार्गापासून दूर राखिले आहे.” स्तोत्र. ११९:११; १७:४. DAMar 90.1