Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

मोक्षमार्ग

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    पापाचें महत्त्व

    ईश्वर आपल्या प्रेमामुळें अगर दयाळूपणामुळें त्याच्या कृपेची अवहेलना करणारासही तारण करील ह्या विचारानें कोणीहि आपली फसवणूक करून घेऊं नये. वधस्तंभावर दृष्‍टीनेंच मात्र पापाचा विचार केला जातो. जेव्हां कांहीं लोक असें म्हणत बसतात कीं, ईश्‍वर आपल्या दयाळूपणानें पापी माणसांचा त्याग करीत नाहीं, तेव्हां अशा लोकांनीं कॅलव्हेरी येथें घडलेल्या गोष्‍टीकडे लक्ष द्यावें. त्याचें कारण असें होतें कीं मनुष्यप्राण्याचें तारण होण्यास तिजशिवाय दुसरा मार्गच नव्हता व ह्या आत्मयज्ञाचे अभावीं मनुष्याला पापाच्या तावडीतून सुटून त्यांचें पवित्र योनींतील प्राण्यांशीं पुन्हां दळणवळण सुरू होणें व आत्मिक जीवनाचें पुन्हा वाटेकरी होणें निव्वळ अशक्य होतें. परंतु ख्रिस्‍तानें त्यांच्या आज्ञाभंगाचें पातक आपल्या माथीं घेऊन त्यांजबद्दल दु:ख सोसलें. देवाच्या पुत्राचें तें प्रेम, तें दु:ख सोसणें, तें मरण हीं सर्व पापाच्या भयंकर दुष्टतेची साक्ष देत आहेत, व मोठ्या जोरानें सांगत आहेत, कीं ख्रिस्‍ताच्या स्वाधीन आत्मा केल्याशिवाय आपल्या तावडींतून कोणालाही सुटतां येत नाहीं, व उच्च प्रकारच्या जीवनाची आशाहि बाळगता येत नाहीं.WG 27.1

    पश्चात्ताप न झालेला मनुष्य कधीं कधीं “सच्छील अशा ख्रिस्‍ती मनुष्यांइतकाच चांगला आहे” असें बोलून स्वतांचे समर्थन करीत असतो. “असे ख्रिस्‍ती मनुष्य मजपेक्षां अधिक स्वार्थत्यागी, शांत व परिस्थितीप्रमाणें वर्तन करणारे नाहींत. मला ज्याप्रमाणें ऎहीक सुखाची आवड आहे त्याप्रमाणें त्यांसही ती असते,” अशाप्रकारें तो मनुष्य आपल्या स्वतांच्या कर्तव्याच्या उपेक्षेबद्दल दुसर्‍याचें उणें काढून आपल्यावरील आरोप टाळण्याचा प्रयत्न करितो. परंतु दुसर्‍यांची पातकें व त्यांची व्यंगें काढण्याच्या ह्या सबबीना कोणीहि सुटत नाहीं. कारण प्रभुनें आपणां सर्वांस सर्वथैव चुकीस पात्र व केवळ अनुकरण करणारीं पात्रें असें केलें नाहीं. निष्कलंक असा देवाचा पुत्र कित्त्यादाखल आपणांला दिलेला आहे; व जे नाणावलेल्या ख्रिस्ती माणसाचा मार्ग चुकलेला आहे अशी तक्रार करीतात त्यांनीं त्यांच्यापेक्षां अधिक चांगला जीवनक्रम चालवून लोकांना अधिक चांगला धडा घालून द्यावा. ख्रिस्‍ती मनुष्यानें कसें असावें ह्याबद्दल त्यांची उच्च्त्वाची कल्पना असेल तर त्या कल्पनेप्रमाणें अधिक चांगलें न करणें हें त्यांचें स्वतांचें पाप नव्हें काय ?योग्य गोष्ट कोणती हें त्यास माहीत असूनहि ती करण्याचें तें नाकारितात.WG 27.2