Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

मोक्षमार्ग

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    निष्कलंकवनिर्दोषकोंकराजोख्रिस्त

    ह्यापुढें तुम्ही स्वताचें नाहींत, तर मोबदला देऊन विकत घेतलेले आहांत. “तुम्ही सोनें रुपें अशा नाशवंत वस्तूंनीं नव्हे तर निष्कलंक व निर्दोष कोंकरा असा जो ख्रिस्‍त त्याच्या मौल्यवान रक्तानें मुक्त झाला आहां.”2२पेत्र१:१८,१९. ईश्वरावर विश्वास ठेवणें यासारख्या सोप्या गोष्‍टींनीं पवित्र आत्म्यानें तुमचे अंत:करणांत नवीन जीवन घातलें आहे. ईश्वराच्या कुटुंबांत जन्मलेलें असें एक लेकरूं तुम्हीं आहांत, व आपल्या मुलावर जशी तो प्रीति करितो तशीच तो तुम्हांवरहि करितो.WG 49.1

    तुम्ही आतां ख्रिस्‍ताला वाहिलेले आहांत म्हणून माघार घेऊ नका, व त्याजपासून दुरावूं नका. उलट असें म्हणा, कीं “मी ख्रिस्ताचा आहे. मीं त्याला वाहून घेतलें आहे,” व त्याजवळ त्याचा पवित्र आत्मा देण्याविषयीं व त्याच्या कृपेंत राखण्याविषयीं मागा. तुम्हीं स्वतांला ईश्वरार्पण करन्यानें व त्यावर विश्वास ठेवण्यानें त्याचे पुत्र असे झाला आहांत व म्हणुन तुम्हांला त्याजमध्यें रहावयाचें आहे. प्रेषितानें म्हटलें आहे “तर ख्रिस्‍त येशू प्रभु असा तुम्हीं स्वीकारिला त्यांतच चाला.”3कलस्सै. २:६.WG 49.2

    ईश्वराचा आशीर्वाद मिळण्यापूर्वी आपन त्याचे पसंतीस उतरलों पाहिजे व आपली सुधारणा झाली आहे असें त्यास सिद्ध करून दिलें पाहिजे अशी कित्येकांची समजूत असल्याचें दिसतें, परंतु तसें नाहीं. त्यांस आतांसुद्धां ईश्वराचा आशीर्वाद मागता येतो. त्यांस त्यांच्या अशक्ततेंत मदत करण्यांत ईश्वराची कृपा-ख्रिस्ताचा आत्मा-पाहिजे आहे, नाहींतर त्यानां दुष्टाचा प्रतिकार करणें अशक्य आहे. आपण आहों त्या स्थितींतच पापी, अशक्त व परावलंबी--त्याजवळ जाणें ख्रिस्‍तास आवडतें. आपण त्याजवळ आपल्या अशक्‍त, मूर्खपणाच्या व पापी अशा स्थितीत त्याजवळ जाऊन पश्चात्तापी होत्साते त्याच्या चरणांवर लोटांगण घातलें पाहिजे. आपल्या प्रीतिरुप बाहूंत आम्हांस कंवटाळून घेंणें, आमच्या जखमा बांधणें व आमचा अशुद्धपणा घालविणें हेंच त्याचें वैभव आहे.WG 49.3

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents