Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

मोक्षमार्ग

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय ९ वा.—कार्य आणि जीवनक्रम

    ईश्वर हा सर्व विश्वाच्या जीवनाचा, तेजाचा व आनंदाचा कंद आहे. सूर्यप्रकाशाच्या किरणांप्रमाणें अगर जिवंत झर्‍यापासून निघणार्‍या पाण्याच्या प्रवाहाप्रमाणें त्याच्यापासून सुखाचा प्रवाह प्राणिमात्रांकडे वाहात असतो. आणि ज्या ज्या ठिकाणी म्हणुन मनुष्याच्या अंत:करणांत ईश्वराचें जिवन असतें, त्या त्या ठिकाणीं तें प्रेमानें व अशीर्वादानें इतरांकडे धाव घेतें.WG 73.1

    पतित मनुष्यांचा उद्धार करून त्यांचें तारण करण्यांतच ख्रिस्ताला आनंद होता, व म्हणूनच त्यानें स्वताला प्रिय असाजो जीव त्याकडे न पाहतां लाजलज्जा वगैरे सर्वांस तुच्छ मानून खांब पत्करला. त्याचप्रमाणें देवदूत हे दुसर्‍यांच्या सुखासाठीं रात्रंदिवस झटत आहेत, व त्यांतच त्यांस आनंद आहे. दुष्‍टांची व शीलनें व दर्जानें कमी असलेल्यांची सेवा करणें हें कमीपणा आणणारें काम आहे, असें स्वार्थी लोकांस वाटतें; परंतु अशांची सेवा करणें हेंच निष्पाप देवदूतांचें कार्य असतें. ख्रिस्ताचा स्वार्थत्यागी प्रेमाचा आत्मा जगद्वयापी व सर्व सुखांचा निष्कर्ष आहे. हाच आत्मा ख्रिस्‍ताच्या अनुयायांस मिळेल.WG 73.2

    अंत:करणांत ख्रिस्ताचें वास्तव्यहोतें त्यावेळीं तें मधुर वासाप्रमाणें लावून ठेवतां येत नाहीं. त्या प्रेमाच्या पवित्रपणांचें वजन ज्यांच्या ज्यांच्याशीं म्हणुन आपला सहवास घडेल त्या सर्वांच्या अनुभवास येईल. अंत:करणांतील ख्रिस्ताचा आत्मा हा सर्वास ताजेतवाने करणार्‍या व मरायास टेकलेल्यास जीवनाचें पाणी पिण्यासाठीम उत्सुक करणार्‍या वाळवंटातील झर्‍याप्रमाणें आहे.WG 73.3

    मनुष्याच्या सुखासाठीं व त्याच्या उद्धारासाठीं ख्रिस्ताचें कार्य चालू असतां, आपणांस कार्य करण्याची जी इच्छा होते तींत आपलें ख्रिस्ताविषयींचें प्रेम दिसून येईल. तें प्रेम आपल्या स्वर्गीय पित्याच्या देखरेखींत असलेल्या सर्व प्राणिमात्रांबद्दल प्रेम, ममताळूपणा व सहानुभूति उत्पन्न करील.WG 73.4

    त्या आपल्या तारकाचें पृथ्वीवरील जिणें सुखाचें व स्वताचे ठायींच आसक्त झालेलें नव्हतें ; तर पतित अशा मनुष्यजातीच्या तारणासाठीं त्यानें दृढनिश्चयानें, उत्सुकतेंनें सतत प्रयत्न केले. गव्हाणींत जन्मल्यापासून तों कॅलव्हरी येथें वधस्तंभावर जाईपर्यंत त्यानें स्वनाकाराचा मार्ग धरीला व आपल्या कष्‍टमय कामगिरीपासून, दु:खप्रद प्रवासापासून व खालावून टाकणार्‍या काळजीपासून व श्रमंपासून सुटून जाण्याचा त्यानें प्रयत्न केला नाहीम. तो म्हणाला, “मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यायास नाहीं, तर सेवा करावयास व बहुतांची खंडणी व्हावीं म्हणून आपला जीव देण्यास आला.”1मत्तय२०:२८. हाच त्याच्या जिण्याचा थोर हेतु असुन दुसर्‍या गोष्टी त्यास दुय्यम प्रतीच्या होत्या. ईश्वराच्या इच्छेप्रमाणें करून आपलें कार्य तडीस नेणें हेंच त्याचें अन्नोदक होतें. त्यानें केलेल्या श्रमांत त्याच्या स्व्ताच्या हितास मुळींच जाग नव्हती.WG 74.1

    ज्यांच्यासाठीं प्रभु खांबी गेला त्यांनीं स्वर्गीय देणगीचें वाटेकरी व्हावें म्हणून कोणत्याही प्रकारचा स्वार्थ त्याग करण्यास जे लोक ख्रिस्ताच्या कृपेचे वाटेकरी झालें आहेत ते तयार होतील. जगांतील त्याम्चें वास्तव्य अधिक सुखकर करण्यासाठीं सर्व कांहीं ते करतील. अशा प्रकरचा उत्साह हाच खर्‍या पालटलेल्या आत्म्याची खरी वाढ होय. कोणी मनुष्य ख्रिस्ताकडे वळतांच त्याच्या अंत:करणांत ख्रिस्त हा आपणांस किती उत्तम मित्र लाभला आहे, हें इतरांस कळविण्याची इच्छा उत्पन्न होते. ज्याच्या योगानें तारण व शुद्धीकरण होत, असें सत्य त्याच्या अंत:करणांत लपून राहातच नाहीं. ख्रिस्ताच्या नीतिमत्वाचा झगा आपण घालून त्याच्या अंत:स्थ आत्म्यापासून होणार्‍या आनंदानें आपण परिपूर्ण भरलेले असलों तर आपल्याच्यानें स्वस्थ बसवणार नाहीं. प्रभु चांगला आहे असा आपण अनुभव घेतला, तर दुसर्‍यांस कांहींना कांहीं तरी सांगावयास आपणांस सांपडेल. तारकाचा शोध लागल्यावर फिलिपाप्रमाणें आपणाही दुसर्‍यांस ख्रिस्तासमोर आणूं. ख्रिस्ताकडे वळण्याचें व अदृश्य परंतु सत्य असें पुढील जग त्याम्स दाखवून देऊं. ज्या मार्गानें ख्रिस्त चालला, त्या मार्गाचें अवलंबन करण्याची प्रबळ इच्छा मग त्यांस होईल, व जगांचें पाप हरण करणारा देवाचा कोंकरा”1योहान्न१:२९. पाहण्याची उत्कट इच्छा आपल्या सभोवतीं असणारांस होईल.WG 74.2

    दुसर्‍यांस सुखी करण्याच्या प्रयत्नानें आपल्या स्वतांवरही सुखाची उलट प्रतिक्रिया होईल. जगाचें तारण करावें, हा जो त्याचा हेतु त्यांत आपणांसही भागीदार करण्यांत ईश्वराचा हाच हेतु आहे. दैवी शीलाचे भागीदार होण्याचा हक्क त्यानें मनुष्यांस दिला आहे. आणि मनुष्यांनीं आपल्यापरी दुसर्‍या मनुष्यांस सुखी करण्याचाही हक्क दिला आहे. मनुष्यांस देतां येण्यासारख्या सर्व मोठ्या मानांत हाच मोठा मान व हाच मोठा आनंद त्यांस दिला आहे.WG 75.1

    शुभवर्तमानाचा निरोप सांगण्याचें व प्रेमानें सेवा करण्याचें सर्व काम हीं ईश्वराला दुसर्‍या दूतांस सांगतां आलीं असतीं; आपला उद्देश सिद्धीस नेण्यास त्यानें दुसरी साधनें उपयोगांत आणिलीं असतीं; परंतु प्रेमामुळें आपल्या स्वताबरोबर, ख्रिस्ताबरोबर व दूतांबरोबर आपणांस भागीदार करून सुख व आनंद यांची प्रीति करून द्यावी, व निरपेक्ष सेवेपासून घडणारी आत्मिक उन्नति करावी हाच त्याचा उद्देश आहे. ख्रिस्तानें सोसलेल्या दु:खाचे भागीदार झाल्यानें त्याची सहानुभूती आपणांस मिळते. दुसर्‍याच्या कल्याणासाठीं केलेल्या स्वार्थत्यागाचें प्रत्येक कार्य आपल्या अंत:करणांत परोपकार बुद्धी अधिक दृढ करून “तो धनवान असतां तुम्हांकरीतां दरिद्री झाला, यासाठीं कीं तुम्ही त्याच्या दरिद्रानें धनवान व्हावें.”2२करिंथ८:९. त्याशीं तुमचा संबंध अधिक निकट जोडितें, आणि ह्याप्रमाणें जेव्हां जग उत्पन्न करण्याचा हेतु आपण पूर्ण करतों, तेव्हांच आयुष्यक्रम सुखाचा होतो.WG 75.2

    आपलें शिष्य जाऊन आपणासाठीं आत्मे जिंकतील हा जो ख्रिस्ताचा संकल्प तो तुम्हीं करुं लागला, तर आत्मिक गोष्‍टींमध्यें अधिक अनुभव व थोर प्रकारचें ज्ञान आपणांस असावें अशी तुम्हाम्स जरुरी भासेल व नीतिमत्त्वाची भूक व तहान तुम्हांस लागेल. तुझी ईश्वराची विनवणी कराल, तुमचा विश्वास दृढ होईल व तारणाच्या विहीरींतून तुझ्यांस मनमुराद जिवनाचें पाणी प्यावयास मिळेल. प्रतिकाराच्या व कसोटीच्या गोष्टीस तोंड देण्याचा प्रसंग तुझास शास्त्राकडे व प्रार्थनेकडे धाव घ्यावयास लावील. तुझी कृपेंत व ख्रिस्ताच्या ज्ञानांत वाढून तुमचा अनुभवहि अधिक वाढेल.WG 75.3

    इतरांसाठीं अहेतुक वृत्तीनें खपण्याच्या उत्साहानें शीलाला थोरपणा, स्थैर्य, व ख्रिस्तासारखें सौंदर्य प्राप्‍त होऊन तें शील धारण करणारास शांतता व सुख हीं प्राप्‍त होतात. त्याच्या आकांक्षा थोर प्रकारच्या होतात. आळस अगर स्वार्थ ह्यांस त्याच्यामध्यें थाराही मिळत नाहीं. ह्याप्रमाणें ख्रिस्ताचें कृपादान प्राप्‍त झालेल्यांची वाढ होऊन ते ईश्वराच्या कार्यासाठीं दृढ मनाचे होतात. त्यांस स्पष्‍ट अशी आत्मिक दृष्‍टि, निश्चल व वाढत जाणारी श्रद्धा व प्रार्थनेंत वाढतें सामर्थ्य हीं प्राप्‍त होतात. त्याच्या आत्म्यावर देवाचा आत्मा कार्य करितो व दैवी स्पर्शाच्या उत्तरादाखल म्हणून आपणाशीं जुळणार्‍या यांच्या मनोवृत्तीस तो बोलावतो. ह्याप्रमाणें दुसर्‍यांच्या हितासाठीं अहेतुक वृत्तीनें प्रयत्न करणारे लोक स्वतांचें तारण नि:संशय करून घेतात.WG 76.1

    ख्रिस्तानें नेमून दिलेलें कार्य--ज्यांस मदतीची अपेक्षा आहे त्यांस मदत करण्यांत आपल्या शक्तीप्रमाणें गुंतण्याचें निष्काम बुद्धीनें करणें हाच काय तो त्याच्या कृपेंत वाढण्याचा मार्ग आहे. अभ्यासानें सामर्थ्य येतें, व कार्यक्षमता हेंच जीवनाचें तत्व.WG 76.2

    कृपेमुळें प्राप्‍त झालेल्या सुखांचा सुखानें उपभोग घेऊन जे लोक ख्रिस्ती जीवनक्रम चालविण्याचा प्रयत्न करितात व ख्रिस्तासाठीं कांहीं एक करीत नाहींत, तें कांहीं एक काम न करतां आयतोबा होऊन खाण्याचा प्रयत्‍न करतात. ह्याचा परिणाम आत्मिक व भौतिक सृष्‍टींत नीचावस्था व अखेरीस नाश असा होतो. हातपाय हालविण्याचें जो मनुष्य नाकारतो, तो लौकरच त्यांचें काम करण्याचें सामर्थ्य गमावितो. म्हणुन जो ख्रिस्ती मनुष्य आपल्या ईश्वरदत्त सामर्थ्याचा उपयोग करीत नाहीं, त्याची ख्रिस्तांत वाढ होत नाहीं, इतकेंच नव्हें, तर त्याजवळ असलेलें सामर्थ्यहि लयास जातें.WG 76.3

    ख्रिस्ताची मंडळी म्हणजे मनुष्यांच्या तारणासाठीं उभारलेली एक संस्थाच आहे. तिचें काम म्हटलें म्हणजे सर्व जगाला शुभवर्तमान सांगणें. हें काम सर्व ख्रिस्ती मनुष्याचें आहे. प्रत्येक मनुष्यानें आपल्या बुद्धीप्रमाणें व संधि सांपडेल त्याप्रमाणें त्या तारकानें नेमून दिलेलें कार्य करावयाचें आहे. आपणांस प्रगट झालेले ख्रिस्ताचें प्रेम, ज्याम्स तें माहींत नाहीं त्यांचे ऋणी करतें. ईश्वरानें आपणांस प्रकाश दिला, तो स्वतांकरितां नव्हें, तर दुसर्‍यांसहि आपण तो द्यावा म्हणून दिला आहे.WG 77.1

    ख्रिस्ताचें अनुयायी आपल्या कर्तव्यास जागतील, तर विधर्मी लोकांत शुभवर्तमानाच्या प्रसाराचें काम करणारा आज जो एक दिसत आहे, त्याऎवजी हजारों दृष्‍टिस पडतील. ज्यांस हें शुभवर्तमानाच्या प्रसाराचें काम स्वतां करतां येत नसेल, त्यांनीं आपल्या इतअ साधनांनीं, सहानुभूतीनें आणि प्रार्थनांनीं ह्या कामास हातभार लावावा.WG 77.2

    ख्रिस्ताकरीता काम करण्याची आपल्याच घरांत जरूरी असेल तर परदेशांत जाण्याची जरूरी नाहीं. हें काम आपणांस आपल्या घरांत, मंडळींत, आपल्या सोबत्यांत, अगर ज्यांशीं आपला व्यवहार आहे अशा लोकांतहि करतां येण्यासारखें आहे.WG 77.3

    आपल्या तारकाच्या आयुष्याचा बराचसा भाग नासरेथ येथील त्याच्या सुतारकीच्या दुकानांत शांतपणें उद्योग करण्यांत गेला. शेतकर्‍यांबरोबर व मजुरांबरोबर चालत असतां सेवा करणारे देवदूत अनोळखी व मानरहीत अशा त्याजबरोबर असत. आजार्‍यांस बरे करीत असतांना व गालील समुद्रांतील तुफानाच्या लाटांमधून चालत असतांना तें चालविलें. म्हणून क्षुल्लक अशा कामांत व खलक्या दर्जाच्या जिण्यांतहि ख्रिस्ताबरोबर आपण चालून काम करावें.WG 77.4

    प्रेषितानें म्हटलें आहे, कीं “ज्या स्थितींत ज्याला बोलावणें झालें त्या स्थितींत देवाजवळ राहों”1१करिंथ७:२४. प्रभूच्या गौरवासाठीं धंदेवाल्या मनुष्यानें सत्यपणानें आपलें काम करावें. ख्रिस्ताचा खरा अनुयायी तो असेल, तर प्रत्येक बाबतींत आपला धर्म तो दाखवील, व इतर मनुष्यांस ख्रिस्त प्रगट करील. गालील प्रांतातील डोंगराळ प्रदेशांत एकांत प्रवास करुन श्रम करणार्‍या प्रभूचा उत्साही व विश्वासु असा प्रतिनिधी यंत्रशास्त्रज्ञानेंहि व्हावें. ख्रिस्ताचें नावं सांगणार्‍या प्रत्येकानें अशी कृति करावी, कीं तेणेंकरून इतरांनीं त्याची कामें पाहून त्यांचा उत्पन्नकर्ता व तारक ह्याचें गौरव करण्याच्या मार्गास लागावें.WG 77.5

    आपणांहून इतरांस अधिक मोठीं साधनें व अनुकूलता हीं आहेत अशा सबबीवर ख्रिस्ताच्या सेवेसाठीं जें कांहीं त्यांनीं करावयाचें तें करण्यापासून आपली सुटका कांहीं लोक करून घेतात. ज्यांस विशेष प्रकारची बुद्धि आहे, त्यांनींच ती ईश्वराच्या सेवेला लावावी अशा प्रकारची कित्येकांची समजूत असते. कित्येकांची अशी असते, कीं इतर वर्ग खेरीज करून एका विशिष्‍ट वर्गासच बुद्धीचें दान दिलें आहे, व म्हणुन त्या इतर वर्गातील लोकांस ख्रिस्तांसाठीं श्रम करून बक्षीस मिळविण्यास पाचारण केलें नाहीं परंतु प्रभूनें दाखल्यांत असें सांगितलेलें नाहीं. घराच्या मालकानें नोकराला बोलविलें, तेव्हां प्रत्येकास त्यानें आपापलें काम दिलें.WG 78.1

    प्रेमभरीत आत्म्यानें आपण “प्रभुसाठीं”2कलस्सै. ३:२३. आपल्या आयुष्यक्रमांतील क्षुल्लक कामें करावीं. अंत:करणांत प्रभूविषयी प्रेम असेल, तर तें आयुष्यक्रमांत दिसून येईल। ख्रिस्ताच्या मधुर सुवसानें आपण भरून जाऊं व मग आपला थोंरपणा वाढून आपणांस सुखप्राप्ति होईल.WG 78.2

    देवाचें काम करण्यास जावयास मोठा प्रसंग अगर विलक्षण बुद्धि प्राप्त होण्याची वाट पहात बसण्याचें कारण नाहीं। जग काय म्हणेल ह्याचाहि विचार करण्याचें कारण नाहीं। तुमच्या विश्वासाच्या शुद्धतेचा व सत्यतेचा पुरावा म्हणजे तुमाचा रोजचा आयुष्यक्रम हा असेल, तर फायदा करण्याची इच्छा तुम्हांस आहे, अशी लोकांची खात्री होईल, व तुमचे प्रयत्न सर्वस्वी वायां जाणार नाहींत.WG 78.3

    अति नम्र व अति गरिब असे ख्रिस्ताचे शिष्य दुसर्‍यांस सुख देणारेच असतात. आपण एखादें चांगलें कृत्य करीत आहों, असें त्यांस समजून न येवो, परंतु त्यांच्या न कळत पडणार्‍या वजनामुळें ते सुखाच्या लाटा-दूरवर जाणार्‍या-उत्पन्न करतील व बक्षिसाच्या अखेरच्या दिवसापर्यंतहि त्यांस कदाचित आपणांला सुख मिळणार आहे हें कळुन येणार नाहीं. आपण एखादें मोठें कृत्य करीत आहों, असें त्याम्स न वाटो. आपल्या कार्याम्त यशप्राप्ति होईल किंवा नाहीं. ह्याबद्दल चिंतातूर होऊन बसण्याचें त्यांस कारण नाहिं. त्याचें काम म्हटलें म्हणजे धिमेपणानें ईश्वरानें नेमून दिलेलें काम पुढें चालवावयाचें; म्हणजे मग त्यांचें जिणें व्यर्थ होणार नाहीं. त्यांचा आत्मा हळूहळू ख्रिस्तांत वाढत जाईल. ह्या जिण्यांत ते ईश्वराशीं सहभागीदार होतील, व पुढें येणार्‍या आयुष्यांतील खर्‍या आनंदाचे भागीदार होण्यास व अति थोर कार्यास आपणांस लायक करून घेतील.WG 79.1