Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

मोक्षमार्ग

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अध्याय १२ वा—संशयाचें काय करावयाचें

    बऱ्याच लोकांत व विशेषतः ख्रिस्ती जिण्यातील तरुण लोकांत शास्त्र हें ईश्वराचा शब्द नाहीं अशा प्रकारच्या मतांनी कधींकधीं चलबिचल उडते. अशा लोकांस प्रतिपादन करितां येत नाहींत, अगर त्यांस समजत नाहींत अशा काहीं गोष्टी शास्त्रांत आहेत, व शास्त्र हें देवाचें प्रगटीकरण नाहीं असें लोकांस भासविण्यासाठीं त्याच गोष्टींचा उपयोग सैतान करीत असतो. असे संशय घेणारे लोक असें विचारतात कीं, “सत्यमार्ग आम्हीं कसा समजावा ? शास्त्र म्हणजे जर खरोखरच ईश्वराचा शब्द आहे, तर आमचे संशय व आमच्या मनाचे गोंधळ कसे नाहीसे होतील ?”WG 100.1

    ज्या गोष्टींवर आमची श्रद्धा बसावी अशी ईश्वराची इच्छा आहे त्या गोष्टींबद्दल भरभक्कम पुरावा दिल्याशिवाय तो आम्हांस तीवर विश्वास ठेवण्यास सांगत नाहीं. त्याचें अस्तित्व, त्याचें शील. त्याच्या वचनांची सत्यता आपल्या विचारशक्तीचा कसोटीस टिकतील अशा पुराव्यानेच तीं सिद्ध झालीं आहेत; व असा पुरावा शास्त्रांत भरपूर आहे. इतकें आहे खरें, तथापि त्यांत संशयास मुळीच जागा मिळूं नये अशी मात्र व्यवस्था ईश्वरानें केलेली नाहीं. आपला विश्वास पुराव्याच्या पायावर असावा, गृहीत गोष्टींवर असतां कामा नये. संशय घेण्याची इच्छा असणारांस तशीहि संधी दि आहे, व सत्यान्वेषण करणारांस भरपूर पुरावाहि दिला आहे.WG 100.2

    अमर्याद अशा ईश्वराचें शील, अगर त्याचीं कार्यें पुरतेपणीं समजणें मर्यादित बुद्धीच्या मनुष्यप्राण्यांस केवळ अशक्य आहे. अति तीक्ष्ण बुद्धीला, अगर अति सुसंस्कृत मनाला तो पवित्र परमेश्वर सदोदित अगम्यच असला पाहिजे. “तुझ्यानें शोध करून देवाला जाणवेल काय ? सर्वसमर्थाविषयीं तुला पूर्ण ज्ञान होईल काय ? तें आकाशासारखें उंच आहे, तूं काय करशील? तें अधोलोकांपेक्षां खोल आहे, तूं काय जाणशील?”1ईयोब११:७,८ .WG 100.3

    प्रेषित पौल यानें म्हटले आहे, “अहा, देवाची संपत्ति, बुद्धी व ज्ञान हीं किती अगाध आहेत ! त्याचे संकल्प किती दुर्ज्ञेय आणि त्याचे मार्ग किती अनुपलक्ष्य आहेत, ”2रोम११:३३. परंतु जरी “त्याजसभोंवतीं मेघ व अंधकार आहेत” तरी “नीती व न्याय त्याच्या आसनाचा आधारच आहेत.”3गीत९७:२, ३ . आपल्याशीं त्याचे चाललेले व्यवहार, आपल्याविषयीं ज्या हेतूने तो प्रेरित झाला आहे ते हेतू अशा रीतीनें आपणांस समजावे कीं, त्याचे अमर्याद प्रेम व अमर्याद सामर्थ्ययुक्तत्वाची दया हीं आपणांस ओळखता यावी. आपल्या कल्याणाचे असतील, तेवढेच मात्र त्याचे हेतू आपणांस ओळखतां यावी. आपल्या कल्याणाचे असतील, तेवढेच मात्र त्याचे हेतू आपणांस समजतात; ह्या पलीकडे त्याच्या सर्व समर्थ हस्तावर व प्रेमपुरीत अंतःकरणावर आपण नुसता विश्वासच ठेवावयाचा आहे.WG 101.1

    ज्या गूढ गोष्टी मर्यादित अशा मनुष्यप्राण्यास कधीहि पूर्णपणें समजावयाच्या नाहींत, अशा गूढ गोष्‍टी आपल्या दैवी जन्मदात्याप्रमाणेंच देवच शब्द दाखवितों. शास्त्रांत सांगितलेल्या गोष्टी- जगांत पापाचा शिरकाव, ख्रिस्ताचा अवतार, नवीन जन्म, पुनरुत्थान व ह्याशिवाय बऱ्याच इतर गोष्टी-इतक्या गूढ आहेत, कीं त्यांचे मनुष्याला कारणही सांगता येणार नाहीं व समजूनही येणार नाही; व म्हणून त्याच्या वचनांविषयी शंका घेण्याचें कारण नाहीं. ह्या भौतिक सृष्टीत आपली अक्कल गुंग करून टाकणाऱ्या गोष्टी आपणाभोवती आहेत. अगदी साध्या आयुष्याक्रमांत अशीं काही गूढ प्रमेयें दिसून येतात, कीं तीं सोडविणें महान् महान् तत्ववेत्यांसही मुष्कील पडतें. आपल्याला अज्ञेय असे चमत्कार जिकडे तिकडे दिसतात. असें असतां ज्या गोष्टींचा उलगड आपणांस होणार नाहीं, अशा गोष्टी आत्मिक सृष्टीत आढळतील म्हणून आपणांस आश्चर्य वाटावें काय? ह्या बाबतीत मुख्य अडचण म्हटली म्हणजे मनुष्याच्या मनाचा अशक्तपणा व कोतेपणा ही होय. शास्त्राच्या दैवीपणाबद्दल बळकट पुरावा ईश्वरानें शास्त्रांतच सांगितला आहे; व आपण त्याच्या वचनाच्या सत्यतेबद्दल मुळीच शंका बाळ- गावयाची नाहीं, कारण त्यांची कार्यें समजणें आपणांस अशक्य आहे.WG 101.2

    प्रेषित पेत्रासानें म्हटलें आहे, “त्यांत संमजायास कठीण अशा काहीं गोष्टी आहेत त्यांचा, अज्ञानी व अस्थिर मनुष्य जेणेंकरून त्यांचा नाश होण्यार अशा इतर शास्त्रलेखांप्रमाणें ओढून ताणून विपरीत अर्थ करितात.”1l२पेत्रस३:१६. शास्त्राच्या दैवी उत्पत्तीबद्दल शंका घेणारे लोक शास्त्रांतूनच काहीं कठीण भाग घेऊन त्याचाच विरुद्ध प्रतिपादन करण्याकरितां पुढें आणितात; परंतु हें त्यांचे करणें इतकें शुष्क असतें, कीं असे भागाचा त्या शास्त्राच्या दैवीपणाबद्दल बळकट पुरावा देतात. आपणांला सहज समजेल अशी ईश्वराविषयी हकीकत त्यांत मुळीच नसली, व त्याचा थोरपणा मर्यादित बुद्धीच्या मनुष्यास समजून आला, तर त्या शास्त्रांत दैवी प्रमाणाचा बिनचूक व विश्वसनीय भागच असणार नाहीं. त्यांतील विषयांचा मोठेपणा व गूढ गोष्टी हीं तें शास्त्र ईश्वराचा शब्द आहे, असा विश्वास उत्पन्न करतील.WG 102.1

    अंत:करणाच्या गरजा व इच्छा यांस पूर्णपणें व सहज रीतीनें लागू पडतील अशीच सत्यवचनें शास्त्रांत सांगितलेलीं आहेत. ह्या सत्यवचनांनी अतिशय सुसंस्कृत मनाच्या लोकांस थक्क करुन सोडलें आहे, व नम्र परंतु अशिक्षित अशा लोकांस मुक्तीचा मार्गं दाखवून दिला आहे. हीं साध्या रीतीनें मनुष्याच्या समजाबाहेर आहेत, कीं त्यांचे आपण ग्रहण करावयाचें ते फक्त तीं ईश्वरानें सांगितलेली आहेत म्हणून करावयाचें. ह्याप्रमाणे तारणाचा मार्ग आपणांस अगदी उघड करून ठेविला आहे, कारण प्रत्येक आत्म्यानें पश्चातापी होऊन ईश्वराचा मार्ग पत्करण्यास त्या तारणाच्या पायऱ्या (सत्यवचनें) पाहाव्या, व ईश्वराच्या नियमित मार्गानें तारण पावावें म्हणून ख्रिस्ताकडे यावें. तथापि शास्त्रसंशोधन करीत असतां ह्या सहज समजणाऱ्या सत्यवचनांत मनाला चकित करून सोडणारीं, परंतु मनापासून सत्यसंशोधन करणाराचे मनांत पुज्यभाव व श्रद्धा उत्पन्न करणारीं, व ईश्वराच्या वैभवाचें गुप्तस्थान होऊन बसलेलीं गूढ तत्वे भरलेलीं आहेत. शास्त्राचें संशोधन आपण जों जों अधिक करितों, तों तों त्याची पक्की खात्री होते, कीं तें ईश्वराचा शब्द आहे. व मग मनुष्याची विचारशक्ती त्या ईश्वराच्या प्रगतीकरणामुळें नम्र होऊन जाते.WG 102.2

    आपणाला पूर्णपणे शास्त्रांतील वचनें समजत नाहीं असें म्हणणें म्हणजे मर्यादित बुद्धीच्या मनुष्याला अमर्याद मनाचें ज्ञान होणें व सर्वदृष्ट्या ईश्वराचे हेतू समजणें अशक्य आहे असें कबूल करणें होय.WG 103.1

    ईश्वराची सर्व गूढ तत्वें त्या सत्यवचनाद्वारें समजत नाहींत म्हणून शास्त्राबद्दल शंका घेणारे व अविश्वासू लोक देवाचें वाचन मानीत नाहीत. शास्त्रावर शंका घेणारे व अविश्वासू लोक देवाचें वचन मानीत नाहीत. शास्त्रावर विश्वास ठेवणारे सर्वच लोक वर सांगितलेल्या दोषारोपापासून मुक्त असतात असें नाही. प्रेषितानें म्हटलें आहे, “भावांनो, जिवंत देवाला सोडून द्याल, असे अविश्वासाचें दुष्ट मन तुम्हांतील कोणाचेंहीं होऊ नये म्हणून जपा.”1इब्री३:१२. शास्त्राचा अगदीं कसून अभ्यास करणें व त्यात सांगितलीं आहेत तितक्याb“देवाच्या रहस्याचा शोध करणें”2१करिंथ२:१०. हीं रास्त आहेत. परंतु “ज्या गोष्टी गुप्त ठेविलेल्या आहेत, त्या आमचा देव परमेश्वर याच्या आहेत, व ज्या उघड्या केलेल्या त्या आमच्या आहेत.”3अनुवाद२९:२९. मनाची संशोधकशक्ति नाहीशी करणें हें सैतानाचें काम आहे. शास्त्रांतील सत्यवचनांच्या विचाराशीं युक्त अशा अभिमानामुळे मनुष्यांस आपल्या मानस पटेल अशा रीतीने शास्त्रांतील भाग न समजला, तर उतावळे होतात व त्यांस आपली फजिती झालीसें वाटतें. ईश्वराच्या प्रेरणेनें लिहिलेलीं वचनें आपणांस समजत नाहींत असें कबूल करणें त्यांस कमीपणाचें वाटतें. ईश्वर त्यांस सत्य प्रगत करण्यास ते लायक आहेत असें पाहीपर्यंत वात पाहण्यास ते नाखूष असतात. त्यांस वाटत असतें, कीं आपलें एकट्याचें शहाणपण शास्त्रवचनें समजण्यास पुरेसें आहे, व ह्या त्यांच्या समजुतीप्रमाणें तीं समजून न आली तर त्यांचे प्रामाण्य ते मानीत नाहींत. हि गोष्ट मात्र खर आहे किं, लोकांच्या समजुतीनें हल्लीं रूढ असलेले शास्त्रांतील सिद्धांत व त्यांतील मतें ह्यांस शास्त्रांत खर्‍या आधार नाहीं, व तीं खरा प्रेरित वचनांच्या अगदी विरुद्ध आहेत. अशीं वचनें पुष्कळ लोकांच्या संशयाचें व घोटाळ्यांचें कारण आहे. ह्याचा दोषारोप ईश्वराच्या वाचनावर नसून तो मनुष्यानें केलेय त्यांच्या अर्थविपर्यासाकडे आहे.WG 103.2

    ईश्वर व त्याची कार्यें हीं पूर्णपणें समजणें त्यानें निर्माण केलेल्या प्राण्यांस शक्य असतें., व ते तीं समजले असतें, तर पुढें शोध करण्यास त्यांस कांहीच राहिले नसतें; व मग ज्ञानवृद्धीहि झाली नसती, व मनाची अगर अंतःकरणाची वाढही झाली नसती ; ईश्वर सर्वश्रेष्ठ असाहि झाला नसता; व ज्ञानाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचल्यामुळें मनुष्याची पुढची वाढ खुंटली असती. परंतु तसें नाहीं म्हणून आपण ईश्वराचे आभार मानु या. ईश्वर अमर्याद आहे; त्याचे ठायीं “ज्ञानाचे व बुद्धीचे सर्व गुप्तनिधी”1कलसे. २:३. आहेत. मनुष्यानें चिरकाल शोधच करीत असलें पाहिजे, तरीही त्याच्या ज्ञानाचा, दयाळूपणाचा व सामर्थ्याचा संग्रह कधी संपून जाणार नाही.WG 104.1

    आपल्या वचनाची सत्यता लोकांस समजून ती त्यांच्या आयुष्यांत यावी अशी परमेश्वराची योजना आहे खरी, तथापि ती समजून येण्याचा एकच मार्ग त्यानें ठेविला आहे. तो हा कीं, ज्या आत्म्याच्या प्रकाशानें तीं सत्यवचनें लिहिलीं गेलीं त्या आत्म्याचा प्रकाशाच्याद्वारेच तीं समजतील “देवाच्या गोष्टीं देवाच्या आत्म्याशिवाय कोणीहि जणात नाही.” “ कारण आत्मा हा सर्व गोष्टींचा व देवाच्या रहस्यांचाहि शोधक आहे,”2१करिंथ२: ११,१०. तारक प्रभूचें आपल्या शिष्यांस असें वचन होतें कीं, “तरी तो म्हणजे सत्याचा आत्मा येईल तेव्हां तो तुम्हांस मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. कारण जें माझें आहे त्यातून घेऊन तें तुम्हांस विदित करील.”3योहान्न१६:१३, १४.WG 104.2

    मनुष्यानें आपल्या बुद्धीसामर्थ्याचा उपयोग करावा अशी ईश्वराची इच्छा आहे; व शास्त्राचा अभ्यास त्याचें मन दृढ व उच्च करील. दुसरा कोणताहि अभ्यास तसें करणार नाही. आपण त्या देव मानलेल्या बुद्धीविषयी सावध असावें; कारण ती, मनुष्य या नात्यानें त्याच्या ठिकाणी असणाऱ्या दुर्बलतेस व व्यंगास पात्र अशी आहे. शास्त्रांतील अति साधीं वचनें आपणांस समजूं नयेत आशा रीतीनें त्यांनीं आपल्या मनांत गोंधळ न करण्याची आपली इच्छा असल्यास आपल्याठायीं बालकाप्रमाणें साधेपणा, बळकट श्रद्धा, शिकण्याची उत्सुकता, व पवित्र आत्म्याच्या मदतीची अपेक्षा हीं असलीं पाहिजेत.WG 104.3

    ईश्वराच्या सामर्थ्याच्या, ज्ञानाच्या, व त्याचा मोठेपणा न समजण्याच्या आपल्या अपात्रतेच्या जाणीवेमुळें आपण प्रथम नम्रता धारण करावी व त्याच्या समक्षतेंत पुज्यभावानें जाऊन मग त्याचें शास्त्र उघडावें. शास्त्र उघडतांना आपल्या बुद्धीने प्रथम आपल्यापेक्षां कोणीतरी जास्त श्रेष्ठ आहे हें प्रमाणभूत तत्व काबुल करावें व मीं आहें असें म्हणणाऱ्या ईश्वराला नमन करावें.WG 105.1

    बाहेरून दिसण्यांत गहन व न समजणाऱ्या अशा गोष्टी समजून घेण्याच्या इराद्यानें जे लोक प्रयत्न करितात, त्यांस ईश्वर त्या सोप्या व सरळ करून दाखवितो; अशा प्रकारच्या गोष्टी शास्त्रांत बऱ्याच आहेत. परंतु पवित्र आत्म्यानें मार्ग दाखविल्याशिवाय शास्त्रवचनांच्या अर्थाचा आपल्या हातून विपर्यास होण्याचा बराच संभव असतो. बरेच लोक त्यांस कांहीं एक फायदा न होतां, शास्त्राचा अभ्यास करितात; परंतु त्यांचे यापासून बरेंच नुकसान होतें. मनांत पूज्यभाव न बाळगतां व प्रार्थना न करितां आपण जेव्हां शास्त्र उघडतों, व आपले विचार व आपलें प्रेम ईश्वराचें ठिकाणीं, अगर त्याच्या इच्छेशीं अनुरूप नसतें, तेव्हां मन संशयग्रस्त होऊन, शास्त्राचा अभ्यास करतांनाच अविश्वास दृढ होतो. विचारावर शत्रू आपला ताबा बसवितो, व भलभलते अर्थ सुचवून देतो. उच्चारानें व आचारानें मनुष्यें जेव्हां ईश्वराशीं एकतानता करण्याचा प्रयत्न करीत नाहींत, तेव्हां, मग तीं कितीका विद्वान असताना,शास्त्रवचन समजण्यांत ढोबळ चुका करितात. अशा लोकांनी सांगितलेल्या असंबद्धता शोधून काढण्याच्या इराद्यानें जे शास्त्राकडे पाहतात त्यांस आत्मिक परिशीलनबुद्धी नसते. ज्या गोष्टी खरोखर सरळ व सोप्या असतात त्यांजबद्द्ल संशय व अविश्वास धरण्यास त्यांस आपल्या चालबिचल झालेल्या दृष्टीमुळें बरीच करणे सापडतात.WG 105.2

    अशा लोकांस अविश्वासाचें खरें कारण खुशाल लपवूं द्या, खरें कारण म्हटलें म्हणजे अशांतील बहुतेक लोकांस असलेली पापाची आवड हें होय. अभिमानी व पापप्रिय अंत:करण शास्त्रांत दिलेलें शिक्षण व त्यांत सांगितलेले नियम स्वीकारीत नाहीं, व जे लोक त्यांत सांगितलेल्या जरूर त्या गोष्टी पाळण्यास नाखूष असतात, ते त्याच्या प्रामाण्याबद्दलहि संशय घेण्यास तयार असतात. सत्य मिळविण्याची इच्छा असेल, तर तें मनापासून जाणण्याची इच्छा असली पाहिजे, व त्याप्रमाणें वागण्याची ख़ुशीं असली पाहिजे. ह्या हेतूनें जे लोक शास्त्राचा आभ्यास करितात, त्यांस तें देवाचा शब्द आहे अशाबद्दल भरपूर पुरावा त्यांतच मिळेल, व तारणाचा मार्ग दाखविणारें सत्य समजून येईल.WG 106.1

    ख्रिस्तानें सांगितलें आहे, “त्याच्या इच्छेप्रमाणें करावयास जर कोणी इच्छील, तर ह्या शिक्षणाविषयीं त्याला समजेल.”1योहान्न७:१७ . जें तुम्हांस समजत नाहीं त्याविषयीं शंकाकुशंका काढण्याऐवजीं जो प्रकाश तुम्हांला मिळालेला आहे त्याकडे लक्ष द्या, म्हणजे मग अधिक प्रकाश मिळून सत्य समजेल. ख्रिस्ताच्या कृपेनें तुमच्या समजुतीस पटणारें असें प्रत्येक कर्तव्य करा, व मग ज्या वचानाबद्दल तुम्ही साशंक असाल तीं समजण्यास समर्थ व्हाल.WG 106.2

    सुशिक्षित, अशिक्षित वगैरे सर्व लोकांस पटेल अस उघड उघड दिलेला एक पुरावा आहे. तो पुरावा म्हटला म्हणजे प्रत्यक्ष अनुभव हा होय. शास्त्राची व त्यानें दिलेल्या वचनांची सत्यता सिद्ध करण्यास तो आम्हांस सांगत आहे , त्याची अशी आज्ञा आहे, “अनुभवून पहा, कीं परमेश्वर चांगला आहे.”2गीत३४:८ . दुसर्‍याच्या शब्दावर विसंबून न राहतां आपण आपल्या करितांच प्रचीती पहावयाची आहे. आणखीहिं त्यानें सांगितले आहे, “मागा म्हणजे तुम्हांस मिळेल.”3योहान्न१६:१४ त्यानें दिलेली वचनें पूर्ण केलीं जातील. तीं आजपर्यंत कधींहि खोटीं ठरलीं नाहीत, व पुढेहि कधीं ठरणार नाहींत. ख्रिस्ताकडे आपणा जात असतां व त्याच्या प्रेमांत आनद करीत असतां आपले संशय व आपलें अज्ञान हीं त्याच्या समक्षतेंत पार नाहीशीं होऊन जातील.WG 106.3

    प्रेषित पौलानें म्हटलें आहे. “त्यानें आम्हांस अंधाराच्या सत्तेंतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेविलें.”1कलसै१:१३ . जो मरणाच्या स्थितीतून जीवांच्या स्थितीत गेला तो “ देव खरा आहे म्हणून शिक्का करण्यास”2योहान३:३३. समर्थ आहे. तो साक्ष देतो, कीं “मला मदतीची अपेक्षा होती, व ती मदत मला ख्रिस्तांत मिळाली. प्रत्येक गरज पुरविली गेली, व माझ्या आत्म्याची तहान भागविली व आतां शास्त्र म्हणजे मला प्रभु येशू ख्रिस्ताचें प्रगटीकरणच आहे. मी ख्रिस्तांवर कां विश्वास ठेवितों असें तुम्ही मला विचारतां काय ? तर याचें कारण तो माझा दैवी तारक आहे. मी शास्त्रांवर कां विश्वास ठेवितों ? कारण तें माझ्या आत्म्याला देवाचा शब्द आहे असे आढळून आले आहे.” शास्त्र खरें आहे व ख्रिस्त देवाचा पुत्र आहे अशाबद्दल आपल्या अंत:करणांतच साक्षी असा. आम्हांस माहित आहे, कीं लबाडीनें रचलेल्या कल्पित गोष्टीस आम्ही अनुसरत नाहीं.WG 107.1

    “ कृपेंत व आमचा प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात वाढा.”3२पेत्रस३:१८. असें प्रेषित पेत्रस आपल्या भावांस आग्रहपूर्वक सांगत आहे. देवाचे लोक त्याच्या कृपेत वाढतात तेव्हां त्यांस त्याच्या वचनांचें ज्ञान सदोदित व स्पष्टपणें मिळतें. त्याच्या सत्यवचनांत नवीन प्रकाश व नवीन सौंदर्य हीं दिसून येतील. सर्व काळीं ख्रिस्ती मंडळीच्या इतिहांसात ह्याची सत्यता दिसून आली आहे, पुढेंहि तीअखेर पर्यंत दिसून येईल. “जो प्रकाशणारा उजेड उत्तरोतर दुपारपर्यंत प्रकाशत चालतो त्यासारखी न्यायींची गती असते.”4नीती४:१८.WG 107.2

    श्रद्धेने आपण भविष्यकालाकडे पाहावें, व बुद्धीच्या वाढीसाठीं ईश्वरानें दिलेले वचन लक्षांत ठेवावें. मनुष्याच्या मनाच्या गुणधर्मांचें ईश्वरी मनाच्या गुणधर्मांशीं ऐक्य होऊन आत्म्याच्या प्रत्येक गुणधर्मांचा, प्रकाशाचा उगम जो ईश्वर त्यांशी सहवास घडतो; व मग ईश्वराच्या कार्यांविषयीं जो आपल्या मनांत गोंधळ उडून गेलेला असतो, तो नाहींसा होतो, व जेथें आपल्या मर्यादित बुद्धीचा गोंधळ उडून तीस कोणत्याही गोष्टीचा उलगडा होत नाहीं तेथेच मग आपणांला त्या गोष्टी पूर्णपणें कळून येऊन त्यांचें सौंदर्यहि कळतें. “आम्हांला आतां भिंगातून अंधक दिसतें, परंतु तेव्हां तोंडोतोंड पाहूं; आतां मी किंचित् जाणतों, परंतु जशी माझी ओळख होईल, तसें मी ओळखीन.”1१करिंथ१३: १२WG 107.3