Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

मोक्षमार्ग

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    ऎहीक दु:खांबद्दल वरवर केलेला पश्चात्ताप.

    पुष्कळांना पश्चात्तापाचें खरें लक्षण समजत नाहीं. आपण पाप केलें म्हणून पुष्कळांना वाईट वाटतें व तें आपली बाह्यांगीं सुधारणाहि करितात; परंतु ते आपल्या दुष्कृत्यामुळेम एखादें संकट ओढवेल या हेतुनें ती करीतात. शास्‍त्रांत सांगितल्याप्रमाणें हा पश्चात्ताप नव्हें. असे लोक पापापेक्षां दु:ख भोगाबद्दलच शोक करितात. आपल्या ज्येष्टपणाच्या जन्मसिद्ध हक्काला आपण कायमचे मुकलों, असें जेव्हां एसावानें पाहिलें, तेव्हां त्यास अशाच प्रकारचें दु:ख झालें. आपल्या वाटेवर देवदूत तरवार उपसून उभा आहे, असें पाहून गर्भगळीत झालेल्या बालामानें जीव जाइल या भीतींनें आपला गुन्हा कबूल केला; परंतु या ठिकाणीं त्यास पापाबद्दल खराखुरा पश्‍चाताप झालेला नव्हता, त्याचा मूळ हेतु त्यानें सोडिला नव्हता, व आपल्या दुष्कृतीचा त्यास वीट आलेला नव्हता. आपल्या प्रभूचा विश्‍वासघात केल्यानंतर यहुदा इस्कार्योंत यानें “मीम निर्दोष मनुश्याचा घात केला हें महत्पाप केलें आहे”1मत्तय२७:४. असें उद्गार काढलें. कृतापराधाच्या भयंकर जाणिवेमुळें व न्यायासनाच्या प्रीतिप्रद देखाव्यामुळें स्वतांच्या दुष्कृतीबद्दल त्याच्या आत्म्याकडून असा कबूली जबाब आला.WG 18.3

    भविष्यकाळीं घडनार्‍या परिणामाच्या धास्‍तीनें त्याला घेरलें खरें, परंतु निष्पाप अशा देवाच्या पुत्राचा घात केल्याबद्दल व इस्त्राएलाच्या पवित्राला नाकारल्याबद्दल अंत:करणाला घावच पडतील इतकें जबर दु:ख त्यास झालें नव्हतें. ईश्‍वरी क्षोभामुळें फारोला दु:ख प्राप्‍त झालें तेव्हां त्यानें आणखी जास्‍त शिक्षा होऊं नये म्हणून आपलें पाप कबूल केलें. परंतु पटकी वगैरे संकटें नाहींशीं झाल्यावर फिरुन तो ईश्‍वराला तुच्छ मानूं लागला. वर सांगितलेल्या इसमांस पापाच्या परिणामाबद्दल दु:ख झालें खरें. परंतु मूळ पापाबद्दल त्यांस तें झालेलें नव्हतें.WG 19.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents