Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

मोक्षमार्ग

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    खरा अनुताप.

    आपलें अंत:करण ईश्‍वरी आत्म्याच्या इच्छेच्या स्वाधीन होतें त्यावेळीं सद्सद्विचारबुद्धि ही आपलें काम करूं लागते, व पापी मनुष्याला ईश्वराच्या पवित्र नियमाच्या उदात्तपणाची, पावित्र्याची, व स्वर्गांतील व पृथ्वीवरील त्याच्या साम्राजाच्या पायाची (प्रेमाची) कांहींशी ओळख पटते. “जगांत येणारा जो खरा प्रकाश प्रत्येक मनुश्याला प्रकाशित करितो,”2योहान्न१:९. तो अंधारांत लपलेल्या गोष्टी उघदकीस आणितो, व मनाची व अंत:करणाची तीं अपराधी असल्याबद्दल खात्री करितो. यहोवा न्यायी आहे असें पापी मनुष्यांस कळून येतें, व आपल्या अपराधी व अपवित्र अशा स्थितींत अंत:- करणाची झडती घेणार्‍या ईश्‍वरासमोर जाण्यास त्यास भीति वाटते. ईश्वराचें प्रेम, पवित्रपणाचें सौदर्य व त्यापासून होणारा आनंद ही त्याच्या नजरेसमोर येतात, तो अंत:करणशुद्धीची व ईश्‍वराशीं पुन्हां दळणवळण सुरुं होण्याची इच्छा करतो. पतन झाल्यानंतर दाविदानें केलेली प्रार्थना पापाबद्दल झालेल्या खर्‍या दु:खाचें स्वरुप कसें असतें, हें दाखवितें. त्यास झालेला पश्‍चात्ताप हा अंत:करणापासून होता. आपलें अपराध कमी करून दाखविण्याचा त्यात प्रयत्‍न केलेला नव्हता. अनिवार्य ईश्‍वरी दंड चुकविण्याच्या इच्छेमुळें त्यास प्रार्थना करण्याची प्रेरणा झाली नव्हती. आपण केलेल्या ईश्वरी आज्ञेच्या उल्लंघनाचें महत्व त्याच्या ध्यानांत आलें, आपल्या आत्म्याची नीचावस्‍था त्याच्या दृष्‍टीस पडली, व पापाचा प्रार्थना केली असें नव्हें, तर अंत:करणशुद्धि व्हावी ह्या हेतूनें ती केली. पवित्रपणापासून होणारा आनंद, ईश्वराशीं पुन्हां दळणवळण व स्‍नेहभाव हीं प्राप्‍त व्हावीं अशी त्यानें इच्छा धरिली, त्याच्या आत्म्यानें पुधें दिल्याप्रमाणें उद्गार काढलें.WG 19.2

    “ज्याचा अपराध क्षमा केला आहे, ज्याचें पाप झाकलें आहे तो सुखी आहे, ज्याला परमेश्वर दोष लावीत नाहीं आणि ज्याच्या मनांत कपट नाहीं तो मनुष्य सुखी आहे.”1गीत३०:२,१. “हे देवा, तूं आपल्या कृपेप्रमानें मजवर दया कर, आपल्या परम कृपेप्रमाणें मजवर दया कर, माझें दोष पुसून टाक, मला माझ्या अन्यायापासून स्वच्छ धू व माझ्या पापापासून मला निर्मल कर, का कीं मी आपले अपराध स्वीकारतों व माझें पाप मजपुढें नित्य आहे.” “एजोवानें मला निर्मल कर, मग स्वच्छ हृदय उत्पन्न कर, आणि माझ्या अंगी शुद्ध आत्मा नवा कर. तूं आपल्या समोरून मला टाकूं नको, आणि अपला पवित्र आत्मा मजपासून काढूं नको. आपल्या तारणाचा आनंद मला परत दे, आणि आपल्या उदार आत्म्याकडून मला संभाळ. हे देवा, माझ्या तारणाच्या देवा, हिंसादोषापासून मला मुक्‍त कर, म्हणजे माझी जीभ तुझ्या न्यायाचें कथन करील.”1गीत५१:१-१४.WG 20.1

    अशा प्रकारचा पश्चात्ताप प्राप्‍त होणें आपल्या सामर्थ्याच्या धावेबाहेर आहे. जो आकाशांत गेला व ज्यानें मनुष्याला देणग्या दिल्या आहेत त्या फक्त खिस्‍ताकडूनच ती सिद्धि प्राप्‍त होते.WG 21.1