Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

मोक्षमार्ग

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    खरा अनुताप म्हणजे ईश्‍वराची ख्रिस्‍तद्वारां एक देणगीच!

    पुष्कळ लोक या ठिकाणीं चुकतात; म्हणून ख्रिस्‍त जी मदत त्यांस करण्यास तयार असतो ती त्यांस मिळत नाहीं. त्यांस वाटतें, कीं प्रथम पश्चाताप केल्याशिवाय ख्रिस्‍ताकडे आपणांस जातां येणार नाहीं. पश्चाताप हा आपल्या पापांच्या क्षमेबद्दल तयारी करतो, व पापाची क्षमा होण्यास पश्‍चात्ताप अगोदर व्हावा लागतो ह्या गोष्टी खर्‍या, कारण दु:खानें व्याप्‍त व कष्‍टी झालेल्या अंत:करणासच तारकाची जरुरी असणार. परंतु पापी मनुश्य ख्रिस्‍ताकडे येण्यापूर्वी खराखुरा पश्चात्ताप होण्याची वाट पहात बसलें पाहिजे काय ? व अशा रीतीनें पापी व तारणारा प्रभु यांच्यामध्यें पश्चात्ताप होण्याची वाट पहात बसलें पाहीजे काय? व अशा रीतीनें पापी व तारणारा प्रभु यांच्यामध्यें पश्‍चात्ताप ही एक अडचण होऊन बसायाची काय ?WG 21.2

    “अहो कष्‍टी व भाराक्रांत जनहो, तुम्हीं सर्व मजकडे या म्हणजे मी तुम्हांला विश्रांति देईन.”2मत्तय११:२९. या ख्रिस्ताच्या बोलण्याकडे लक्ष देण्यापूर्वी पापी मनुष्याला पश्चात्ताप झालाच पाहिजे असें शास्‍त्रांत सांगितलेलें नाहीं, ज्याच्यायोगानें खराखुरा पश्चात्ताप होतो तो गुण ख्रिस्‍ताकडून प्राप्‍त होतो. इस्‍त्रायली लोकांस सांगितलेल्या वचनांत प्रेषित पेत्रस यानें ही गोष्‍ट अगदीं उघड करुन सांगितली आहे; यावेळीं तो इस्त्राएलांस म्हणाला “त्यानें इस्‍त्राएलाला पश्चात्ताप व पापांची क्षमा ही देणगी द्यावी म्हणून देवानें त्याला आपल्या उजव्या हातानें राजा व तारणारा असा उंच केला.”3प्रे.कृ. ५:३१. ख्रिस्‍ताच्या आत्म्याशिवाय जसें आपणांस क्षमा होणें नाहीम तसें सद्सद्विचारशक्‍तीला जागें करणार्‍या ख्रिस्‍ताच्या आत्म्यावाचून पश्चात्ताप करतां येणार नाहीं.WG 21.3

    प्रत्येक चांगल्या चेतनेचा उगम ख्रिस्‍त हा होय. पाप शत्रूसारखें वाटणें ही भावना अंत:करणांत उत्पन्न करणाराहि फक्त तो एकच आहे. सत्य व शुद्धीकरण यांची उत्कंठा व स्वतांच्या पापांबद्दल पूर्ण खात्री हीं, ख्रिस्‍ताचा आत्मा आपल्या अम्त:करणांत वास करीत आहे, याची साक्ष देतात.WG 22.1

    येशूनें म्हटलें आहे, कीं “मला पृथ्वीपासून उंच केलें तर मी आपणाकडे सर्वांस ओढीन.”1योहान्न११:३२. ख्रिस्‍त हा जगाचें तारन करणारा असून तो जगाच्या पापासाठीं मरण पावला असा पापी मनुष्यास प्रगट झाला पाहिजे, आणि देवाचा कोंकरा कॅलव्हरी वधस्तभांवर आपण पहात असतां आपल्या मनाशीं तारणाच्या गुढाचा उलगडा व्हावयास लागतो, व ईश्वराचें चांगुलपण आपणांस पश्चात्तापाचा मार्ग दाखवितें. पापी मनुष्याला ती कळुन आली म्हणजे तिच्या योगीनें त्याचें अंत:करण मृदु होतें, त्याच्या मनावर तिचा परिणाम घडून येतो व त्याच्या आत्म्याल पश्चात्तापाची प्रेरणा होते.WG 22.2

    ही गोष्‍ट खरी, कीं मनुष्यांला कधींकधीं आपल्या पापकृत्यांची लाज वाटते, व आपण ख्रिस्ताकडे जात आहों हें त्यांस समजण्यापूर्वीच ते कांहीं पापकृत्यांचा त्याग करितात. जेव्हां जेव्हां ते स्वत:ला मनापासून सुधारण्याचा प्रयत्न करितात व त्या रीतीनें वागण्याची आवड धरीतात, तेव्हां तेव्हां ख्रिस्‍ताचें सामर्थ्य त्यांच्या आत्म्यावर कार्य करीत असतें, व यामुळें त्यांचे सद्सद्विचारबुद्धीस चलन मिळून त्यांचे आचार पालटतात. स्वतांच्या खांबाकडे त्यांची दृष्‍टी लागण्यासाठीं व त्यांच्या पापांनी ज्याला छिन्नभिन्न केलें त्याला पाहण्यासाथीं त्यांचें लक्ष आकर्षून घेत असतां ख्रिस्‍ताची आज्ञा त्याच्या मनाला पटते. त्यांच्या जिण्यांतील दुष्‍टपणा व आत्म्यांत भिनून गेलेलें पाप हीं त्यांस दिसायास लागतात. ख्रिस्‍ताच्या न्यायीपणाची ओळ्ख त्यांस होऊंन ते ओरडून म्हणतात. ज्या पापाच्या भक्ष्यस्थानीं पडलेल्या मनुष्यांच्या तारणाबद्दल प्रभूस एवढा मोठा यज्ञ करावा लागला असें तें पाप आहे तरी काय ? आपला नाश होऊं नये व आपणांस सार्वकालिक जीवन प्राप्‍त व्हावें म्हणून का एवढी प्रीति, हें इतकें सोसणें, व अशा तर्‍हेचा अपमान ह्यांची जरूर होती?WG 22.3

    पाप्‍यानें ह्या प्रीतीला प्रतिकार करावा अगर न करावा, व ख्रिस्‍ताकडे वळण्यास कबूल व्हावें अगर नाकबूल व्हावें हें त्याच्या खुषीवर अवलंबून आहे. परंतु जर त्यानें तसा प्रतिकार केला नाहीं, तर मात्र तो ख्रिस्‍ताकडे ओढला जाईल. जीं आपलीं पापें देवाच्या पुत्राच्या मार्गाचें झालेलें ज्ञान त्यांस वधस्‍तंभाच्या पायथ्याशीं नेतें.WG 23.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents