Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अक्षम्य पाप

    पवित्र आत्म्याविरुद्ध जें पाप आहे त्यांत कशाचा समावेश होतो? जाणून बुजून पवित्र आत्म्याचे कार्य में सैतानाचे आहे असें समजल्याने पाप होतें. उदाहरणार्थ देवाच्या आत्म्याच्या विशेष कार्याची साक्ष असा एकजण आहे. पवित्र शास्त्राप्रमाणे जुळते असें त्याचे कार्य आहे असा बळकट पुरावा आहे. आत्माहि साक्ष देतो कीं, हें देवाचे कार्य आहे. नंतर तो मोहात पडतो व गर्व, स्वसतोषपणा व इतर वाईट गुणांचा त्याच्यावर पगडा बसतो, व देवी स्वभावाचा सर्व पुरावा नाकारून पूर्वी जे आत्म्याचे सामर्थ्य आहे असें कबूल केले होतें तें आता सैतानाचे सामर्थ्य आहे असें जाहीर करितो. देव आपल्या आत्म्याद्वारे मानवी अंत:करणावर कार्य करतो. जेव्हां मनुष्य जाणून बुजून पवित्र आत्म्याचा नाकार करतो व तो सैतानापासून आहे असें जाहीर करतो तेव्हां देव त्याच्याशीं ज्या मार्गाने दळणवळण ठेवतो तो मार्ग मनुष्य कापून टाकतो. देव त्यांना जो पुरावा देण्यास तयार आहे तो नाकारून त्यांच्या अंत:करणांत प्रकाशणार। प्रकाश बंद पाडतात व त्याचा परिणाम तें अंधारांत राहतात. म्हणून ख्रिस्ताच्या पुढील शब्दांवरून ही सत्यता पटते : “यास्तव तुझ्यातील प्रकाश अंधार असला तर तो अधार केवढा !” मत्तय ६:२३. कांही काळापर्यंत ज्यांनी हें पाप केले आहे तें देवाची मुलें म्हणून दर्शवितात. पण जेव्हां त्याचे शील बनते व त्यावरून तें कोणत्या आत्म्याचे आहेत हें दर्शविले जाते तेव्हां तें शत्रुच्या रणांगणावर त्याच्या काळ्या निशाणाखाली उभे असलेले आढळून येतील. 95T 634;CChMara 142.1