Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    प्रकरण २५ वें - बाप्तिस्मा

    बाप्तिस्मा व प्रभूभोजन हें संस्कार दोन स्मारकस्तंभ असून त्यापैकी एक स्तंभ मंडळींत व दुसरा मंडळी बाहेर आहे. ह्या संस्कारांवर ख्रिस्ताने सत्य देवाचे नाम कोरून ठेविलेले आहे.CChMara 166.1

    आत्मिक राज्यात प्रवेश मिळण्याची बाप्तिस्मा ही एक खूण म्हणून ख्रिस्ताने प्रगट केले आहे. बाप, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या सत्तेखालीं नांदावयाची ज्याची इच्छा आहे, त्या सर्वांना ख्रिस्तानें ही एक निश्चित अट घातलेली आहे. ख्रिस्ती मंडळी ही आपलें सुख-धाम आहे असें समजून येण्यापूर्वी व देवाच्या आत्मिक राज्याचा उदरा चढून जाण्यापूर्वी “परमेश्वर आमची धार्मिकता’ (यिर्मया २३:६) ह्या दैवी नामाची छाप मानवाने स्त:वर मारून घेतली पाहिजे.CChMara 166.2

    बाप्तिस्मा हा जगिक गोष्टींचा गांभिर्यपूर्वक त्याग होय. आपल्या ख्रिस्ती जीवनांत प्रवेश करितांना बाप, पुत्र व पवित्र आत्मा या त्रैक्याच्या नावात ज्याचा बाप्तिस्मा झालेला आहे, तें उघडपणे असें कबूल करितात कीं त्यांनी सैतानाची सेवा झुगारून दिलेली आहे व तें राजघराण्याचे सभासद व स्वर्गीय राजाचे संतान बनलेले आहेत. त्यातून निघा व वेगळे व्हा..... आणि अशुद्ध वस्तूला शिवू नका,” ही आज्ञा त्यांनी मान्य केलेली आहे असें होईल तरच मग “मी तुम्हांस स्वीकारीन आणि मी तुम्हांस पिता असा होईन, आणि तुम्ही मला पुत्र व कन्या अशीं व्हाल.” (२ करिथ ६:१७-१८) हें सर्वसमर्थ प्रभूचे अभिवचन त्यांच्यांत परिपूर्ण असें होऊन जाईल.CChMara 166.3

    बाप्तिस्मा घेतेवेळी ज्या शपथा आम्ही घेतो त्यांत पुष्कळ गोष्टींचा समावेश होतो. बाप, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावें बाप्तिस्मा घेतांना आम्ही ख्रिस्ताप्रमाणे पुरले जातो त्याच्याप्रमाणे पुनरुत्थत होतों व आम्हांला नवीन जीवित जगाावयाचे असतें. ख्रिस्ताच्या जीवन-चरित्रांत आमचे जीवनचरित्र समरस व्हावयाचे असतें. यापुढे ख्रिस्त व पवित्र आत्मा यांना आपण समर्पित झालेले आहों, असें विश्वासणार्‍यने आपल्या मनाशी गाठ बांधून घ्यावयाची असतें. सर्व जगिक आचारविचार ह्या नवीन नात्यापुढे गौण असें वाटावेत व अहंकाराने व आत्मप्रतिष्ठेनें जगावयाचें नाहीं अशी त्यानें ग्वाही दिलेली असावी. निष्काळजीपणे व बेपरवाईने यापुढे मी वर्तणार नाही असाच त्यानें देवाशी करार केलेला असावा. जगाशीं तो मेलेला परतु प्रभूसाठी तो जिवंत असें त्याला जगावयाचे असतें. प्राप्त झालेल्या सर्व देणग्याचा उपयोग केवळ प्रभुसाठींच करावयाचा असतो. देवाचा छाप आपल्यावर पडलेला असून आपण ख्रिस्त राज्यांतील प्रजा आहों आणि दैवी शीलाचे भागीदार आहों, हें त्यानें कदापि विसरता कामा नये. स्वत:ला आणि आपल्या सर्वस्वाला त्यानें देवासमोर समर्पण करायाचे असतें. आपल्या सर्व देणग्यांचा उपयोग देवाच्या गौरवार्थ त्याजसाठी करावयाचा असतो.CChMara 166.4

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents