Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    विवाहाकडून प्राप्त होणारे विशेष अधिकार

    विवाहाच्या नात्यांतून लाभणाच्या प्रत्येक सवलतीचा कसा काय परिणाम घडतो ह्याचा ख्रिस्ती म्हणविणाच्या प्रत्येक व्यक्तीने यथायोग्य विचार करावा. आईबापांनी पुष्कळदां त्यांस प्राप्त झालेल्या वैवाहिक अधिकारांचा दुरुपयोग केलेला आहे. कारण शारीरिक संभोगापुरतीच त्यांची इच्छा बलवत्तर झालेली असते.CChMara 196.6

    (“कौटुंबिक नात्यातील एकांत आणि अधिकार’ याविषयी भिसेस व्हाईट दुसर्‍य ठिकाणी निवेदन करणार आहेत.)CChMara 197.1

    एरवी जे कायदेशीर आहे त्याचा अतिरेक केला कीं तें एक खेदजनक पाप होतें.CChMara 197.2

    वैवाहिक जीवनासाठी जे ज्ञान लागते, तें साध्य करून घेण्याच्या कामीं पुष्कळ आईबाप मागें पडतात. सैतान आपल्याला हात धरून आपली मनें व चारित्र्य आपल्या ताब्यात घेईल, याविषयी आईबाप सावधगिरी ठेवीत नाहींत. कोणत्याहि अतिरेकापासून आपली वैवाहिक चरित्रे आटोक्यात ठेवावी हें देवाला पाहिजे असतें; ही गोष्ट आईबापाच्या नजरेतच येत नाही. आपले मनोविकार आपल्या ताब्यात ठेवणे, हें एक धार्मिक कर्तव्य आहे असें फार थोडक्यांना वाटते. आपल्या मनपसंतीची तृप्ति करून घ्यावी हा त्याच्या एकत्रीत होण्याचा उद्देश असतो म्हणून एकदाचे लग्न होऊन गेले कीं नीच मनोविकारावर पांघरून पडले जाते असा त्याचा बुद्धिवाद असतो. ईश्वरनिष्ठ पुरुष व स्त्रियासुद्धां विषयवासनेच्या मनोविकारांना बळी पडतात. आपल्या उपयुक्त शक्तीच्या अशा दुरुपयोगाबद्दल परमेश्वर आपल्याला जबाबदार धरणार अशी कल्पना त्यांना शिवत नाही. असल्या वृत्तीने त्यांचे जीवन चरित्र आणि संबंध विवाहघटना हीं दुबळी होऊन जातात.CChMara 197.3