Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    मातेच्या कार्याची पवित्रता

    नवर्‍याच्या समानतेप्रत बायकोनेंहि व्हावें ही देवाची मूळ योजना स्त्रीने भरून काढावयाची असतें. केवळ नामधारी नसून माता ह्या उराखरी माताच व्हाव्यात असें जगाला पाहिजे आहे. स्त्रीचीं विशिष्ट कर्तव्ये ही पुरुषांच्या कर्तव्यापेक्षा अधिक पवित्र आणि अधिक शुद्ध असतात हें म्हणावयास काहीं एक हरकत दिसत नाही. आपल्या कार्याचा पवित्रपणा ओळखून ईश्वरी सद्भयाच्या सामर्थ्याने स्त्रीने आपल्या जीवन चारित्र्याचा हेतु हातीं घ्यावा. या जगीं आणि येणार्‍य अधिक चांगल्या जगांत आपल्या मुलानी उपयुक्त व्हावे म्हणून तिने त्यांना शिक्षण देत राहावे.CChMara 207.2

    सतत नवर्‍यवर टेंकून पत्नीनें म्हणजे मातेने शक्तिहीन होऊ नये व आपली सामथ्ये दडपून ठेवू नयेत. तिचे व्यक्तिमत्व त्यांच्यात विरून जाऊ शकत नाहीं. नवर्‍यांच्या खांद्याशीं खादा देऊन व त्याला आहेत तशीच तिलाही दिलेली कर्तव्ये विश्वासूपणे पार पाडून आपण नवयाच्या समानतेप्रत आहो, असें बायकोला वाटावे. नवर्‍यची कसलीही भारदस्त व थोर जागा असो, फार तर काय तो देशांतील बडा अधिकारी असो, परंतु मुलाना सुशिक्षित करण्याचे तिचे कर्तव्य हरएक प्रकारे तसेच भारदस्त व थोर असतें.CChMara 207.3

    राजा सिहासनारुढ असेल म्हणून मातेपेक्षा त्याचे कर्तव्य अधिक भारी होऊ शकत नाही. आपल्या गृहकारभारात माता ही राणी असतें. आपली मुलें उच्च प्रतीच्या व अविनाशी जीवनासाठी पात्र व्हावीत असें शिक्षण देऊन त्याचे शील बनविण्याचे सामर्थ्य आईत असतें. देवदृताला सुद्धा याहून थोर पदवी मागता येत नाही, कारण माता में कार्य करीत असताना देवाची सेवा करीत असतें. एवढे मात्र झाले पाहिजे कीं तिला आपल्या थोर कर्तव्याची जाणीव व्हावी म्हणजेच तिला धैर्यासह उत्तेजन प्राप्त होईल. आपल्या कार्याची थोरवी तिच्या लक्षात यावी व तिने देवाची शस्त्रसामुग्री अंगी ल्यावी म्हणजे जगताशी एक होण्याच्या मोहाला ती प्रतिकार करूं शकेल. तिच्या कार्याची व्याप्ति ह्या काळासाठीं व अनंत काळासाठी असते.CChMara 207.4

    विवाहीत पुरुष गृहांतील मुलांना आपल्या बायकांच्या हवाली करून आपापल्या कामावर गेले तर पत्नि म्हणजे माता आपल्या पतीप्रमाणेच म्हणजे पित्याप्रमाणेच मोठे व महत्त्वाचे कार्य करीत असतें. एक जण मिशन क्षेत्रात (उघड्या सेवाक्षेत्रात)कामाला जातो व दुसरी गृहक्षेत्रात सेवा करीत असतें. तिच्या वाट्याला आलेल्या काळज्या व चिता आणि कार्यभार नवग्याच्या म्हणजे पित्याच्या चिता-काळजीपेक्षा वारंवार फार अधिक व भारी असतात. तिचे कार्य तर गंभीर व महत्त्वाचे असतें. नवर्‍यांच्या कार्याचे मिशन क्षेत्रामध्ये लोक त्याचे गौरव करीत असतील परंतु ती जर आपल्या कौटुंबिक हिताची उत्कृष्ट सेवा करीत असेल व दैवी नमुन्याप्रमाणे त्याचे गौरव करीत असेल व दैवी नमुन्याप्रमाणे त्यांचे शील बनवीत असेल तर नोंद करणारा दिव्यदूत तिचे नाव जगांतील अति थोर मिशनेरींच्या यादीत नमुद करील. मानवाच्या मर्यादित (अकुंचित) दृष्टीप्रमाणे देवाची दृष्टि नसते. CChMara 208.1

    नश्वर जगाकडे जाण्याचा जगाचा ओढा असतो. तरुण लोकांवर शैलीचा व चालीरितीचा मोठा पगडा असतो. जर माता आपल्या मुलांना शिक्षण देण्याच्या, मार्गदर्शन करण्याच्या आणि आवरून धरण्याच्या कर्तव्यात चुकत असेल तर तिची ती मुल स्वभावात: सन्मार्ग सोडून वाईट मार्गाला कवटाळतील. प्रत्येक मातेने वारंवार उद्धारकाकडे जाऊन प्रार्थना करावी कीं, “मुलाला आम्ही आज्ञा कशी करावी व आम्ही त्यासाठी काय करावे, हें आम्हांस शिकीव.” परमेश्वराने आपल्या वचनांत जे शिक्षण दिलेले आहे त्याकडे तिने लक्ष द्यावे म्हणजे अवश्य लागणारे चातुर्य तिला देण्यांत येईल.CChMara 208.2

    प्रत्येक आईनें हें समजून घ्यावे कीं तिला प्राप्त झालेली सधि अमूल्य अशी आहे. जबाब देण्याच्या गभीर दिनी तिच्या कामाची कसोटी करण्यांत येईल. आपल्या मुलाची पोरकट पाऊले सन्मार्ग पथात नेण्याच्या कर्तव्यात पुष्कळ स्त्री-पुरुषांनी अज्ञानामुळे व निष्काळजीपणामुळे केलेल्या अनेक चुका व गुन्हे त्यावेळी आढळून येणार आहेत. ज्यांनी आपल्या अलौकिक बुद्धिसामथ्र्यांच्या प्रकाशाने आपल्या सत्यतेच्या निष्ठेने आणि पवित्र जीवनाने जगाला आशीर्वादसपन्न केले असेहि पुष्कळजण त्यावेळी आढळून येतील ख्रिस्ती तत्त्वेंच त्याच्या यशाची गुरुकिल्ली असें तें कबूल करितात व त्या तत्त्वाचे श्रेय आपल्या प्रार्थना करणार्‍य ख्रिस्ती मातेकडे जाते अशी तें कबूली देतात.CChMara 208.3