Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    प्रकरण ३६ वें - गृहांतील अर्थकारभार

    आपल्या लोकांनी विचारवंत व सावध असावे अशी देवाची इच्छा असतें. प्रत्येक गोष्टींत आणि कोणत्याही गोष्टींत उधळपट्टी करूं नये, याचा त्यांनी चांगला विचार करावा. CChMara 219.1

    बचत केव्हां करावी आणि खर्च कधीं करावा हें चिंतनपूर्वक ठरवावें. रचनाकार करून ख्रिस्ताच्या वधस्तंभाची उभारणी केल्याशिवाय आम्हांला त्याचे अनुयायी होता यावयाचें नाहीं. आपल्या देण्याघेण्यात चोख राहिलों, चुकून राहिलेल्या बारीकसारीक गोष्टींची दुररुस्ती केली आणि भानगडीचे व्यवस्थित केले, तरच मात्र आपल्या आर्थिक कारभाराचा आपलेपणा तुम्हांला कळून येईल. स्वार्थीच्या फंदात खर्चलेले थोडे थोडे का होईना त्या सर्वांची नोंद करून ठेवा. केवळ आपल्या लहरी आवडीमध्ये दुरुपयोगाच्या नादात आणि चैनबाजीची तृप्ती करण्यांत आपण काय खर्च करितों यावर नजर ठेवावी. निरुपयोगी मिष्टान्नावर खर्चिलेला पैसा तुमच्या कौटुबिक सुखसाईच्या प्रगतीसाठी कितीतरी चांगल्या प्रकारे खर्चिता येईल. तुम्हांला कुपण व्हावयाचें नाहीं तर स्वत:शी व बंधुवर्गाशी उदारतेने वागावयाचे आहे. चिकूपणाचे जीवन देवाच्या औदार्याचा एक दुररुपयोग होय. उधळपट्टी हाही दुरुपयोग होय. तुम्हांस कांहींच वाटत नाहीं अशा अल्पस्वल्प खर्चाची अखेरीस मोठी रकम होऊन जाते. CChMara 219.2

    दिखाऊपणात खर्च करण्याचा तुम्हांला मोह होतो तेव्हां पतित मानवाच्या उद्धारकार्यासाठी ख्रिस्ताने रचनाकार व स्वार्पण करून जे दु:ख सहन केले, त्याची आठवण तुम्हांला यावी. रचनाकार कसा करावा व स्वत:वर ताबा कसा ठेवावा, हें आपण आपल्या मुलास शिकवावें. आर्थिक बाबी पुष्कळशा धर्मसेवकांना (दीक्षित लोकांना) इतक्या जड जाण्याचे कारण असें कीं त्यांच्या लहरी आकाक्षा व त्याच्या लहरी आकाक्षा व त्यांच्या प्रवृत्ति त्याच्याने आटोक्यात ठेविता येत नाहींत. पुष्कळजण दिवाळखोर व अप्रामाणिक असें मानले जातात कारण तें आपल्या बायकामुलांच्या उधळपट्टीला बळी पडतात. आपल्या शिक्षणाने व उदाहरणाने आपल्या मुलास काटकसर शिकविण्याकडे आईबापांनी किती काळजीपूर्वक लक्ष द्यावयाचे असते.CChMara 219.3

    नम्र व लीन अशा तारकाचे आपण गरीब अनुयायी असतां आपण श्रीमंत आहो अगर त्यापेक्षा अधिक आहो असें ढोंग करणे अतिशय अनिष्ट होय. आमचे शेजारी-पाजारी जशी घरें बाधितात व उभारतात, तशी करण्याचा आम्हांला अधिकार नाही म्हणून आम्हांला खंत वाटण्याचे काहीं एक प्रयोजन नाहीं. स्वार्थासाठीं, पाहुणचारासाठी आणि आपल्याच लहरी भागविण्यासाठी जर आम्ही स्वार्थी तरतूद करुं लागलों तर येशू आम्हांकडे केव्हा काय पाहील! आम्ही किंवा आमच्या ताब्यांतल्या मुलांनी बडेजावपणा दाखविण्याचा प्रयत्न करणे हा एक मोहपाशच असतो. 1AH 379-384;CChMara 219.4

    उपयोगास पडेल असें काहीं एक फेकून देऊ नका. या कामीं सूज्ञबुद्धि, दूरदृष्टी आणि निरंतरची देखरेख असावी लागेल. ज्यांना लहानसहान गोष्टी सांभाळून ठेविता येत नाहीत अशा अनेक कुटुंबाना ह्याच एका कारणामुळे जीवनातील अवश्य अशा गोष्टी लाभत नाहीत, असें माझ्या निदर्शनास आणून दिलेले आहे. 2CG 135: CChMara 220.1

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents