Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    संपादक मंडळ

    सुखप्राप्तीसाठी ख्रिस्ती लोकांच्या हातीं अनेक साधने आहेत व त्यातील कायदेशीर व योग्य कोणती हें त्यांना अचुकपणे सांगता येईल. जेणेकडून मानसिक अगर आत्मिक मानखडणा होणार नाहीं असल्या कोणत्याही करमणुकीत त्यांना रमून जाता येईल किंवा परिणामी त्या आत्माभिमानाला अगर उपयुक्ततेला विघातक होता कामा नयेत. जर त्यांच्यासह येशूचे मन व प्रार्थनेचा आत्मा असू शकेल तर तें अगदीं निर्धास्त असू शकतील.CChMara 226.4

    मौजेखातरची कसलीही करमणूक घ्या, तिच्यात जर ईश्वरी आशीर्वादाची निष्ठापूर्वक मागणी केली तर ती घातक होणार नाही. परंतु ज्या करमणुकीमध्ये एकांत प्रार्थना प्रार्थनेसाठ भक्तिशीलता अगर प्रार्थनामंडळांत सामील होता येणार नाहीं ती करमणूक घातक समजावी. CChMara 226.5

    या जिवंतांच्या भूमीवर आहों तोंवर आमच्या आयुष्यातील हरएक दिवशी देवाच्या गौरवार्थ आम्हांला सँध मिळत असतें, असा आमचा विश्वास आहे, आमच्या स्वत:च्याच मौजेखातर व केवळ आमच्या लहरीप्रमाणे जगण्यासाठी आम्ही जगत नाहीं. मानवजातीच्या कल्याणासाठी व सामाजिक आशीर्वादासाठी आम्हांला जगावयाचे आहे. आम्ही पुष्कळजण नीचावस्थेत जाऊन केवळ व्यर्थतेच्या आणि मूर्खतेच्या फदांत पडू तर आमच्या जातीस व पिढीस आशीर्वाद म्हणून आपण कसे राहूं शकू? आमच्या आसपास असलेल्यांस आम्ही आशीर्वाद संपन्न असें कसे होऊ शकू? आमची सर्वसाधारण कर्तव्ये अधिक निष्ठापूर्वक पार पाडण्यास अपात्र ठरल्यानंतर आम्हांला निष्कपटपणे कसल्याही करमणुकीत पडता येणार नाहीं. CChMara 226.6

    पुष्कळ अशा गोष्टी आहेत कीं त्या चागल्या असूनही त्या सैतानाने हाती घेतलेल्या असल्या तर त्या बेसावध मंडळीस मोहपाश ठरतात. CChMara 227.1

    अवांतर प्रत्यक्ष क्षेत्रांत जसा नियमितपणा लागतो तशी करमणुकीमध्ये सुद्धा त्याची अत्यंत आवश्यकता असतें. ह्या करमणुकींची कशी काय तन्हा आहे याची फार काळजीपूर्वक व कसून चौकशी करावयाची असतें. मी ज्या करमणुकीत पडतो आहे त्यांचा माझ्या शारीरिक, मानसिक व आत्मिक प्रकृतीवर कसा काय परिणाम घडून येणार हें प्रत्येक तरुणाने स्वत:ला विचारून पाहावें. मला देवाचें ध्यानच राहूं नये असें माझे मन उन्मत होईल का? मजपुढे त्याचे गौरव नष्ट होऊन जाईल का ? 1.CChMara 227.2