Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    प्रकरण ४० वें - वाचनाची निवड

    जीवन चरित्रांतील अखिल कर्तव्य-कमें उत्कृष्ट रीतीने करता यावीत म्हणून लागणाच्या शारीरिक, बौद्धीक आणि आत्मिक शक्तीची तयारी यालाच शिक्षण म्हणतात. सहनशीलता, सबळता आणि बुद्धीची कर्तव्यता यांना लागणाच्या शक्तीचा जसा विनियोग केला जाईल तशी ती शक्ति कमी-जास्त होईल. मनाला अशी काहीं तालीम देण्यांत यावी कीं त्याची प्रमाणबद्ध अशी वाढ होईल. CChMara 235.1

    पुष्कळ तरुणांना पुस्तकांची गोडी असतें जे हातीं येईल त्या प्रत्येकाचे वाचन करावे असें त्यांस वाटते. आपण काय वाचतों त्याचप्रमाणे काय ऐकतो याविषयी त्यांनी सावध असावें. अयोग्य प्रकारच्या वाचनाने भ्रष्ट होण्याच्या तें महान् संकटात आहेत असें मला सागण्यात आलें आहे. तरुणांची मने अस्थिर ठेवण्याचे सैतानाजवळ हजारों मार्ग आहेत त्यांना क्षणभरसुद्धा बेसावध राहूं देणे सुरक्षितपणाचे होणार नाही. त्यांनी आपल्या मनावर असा पहारा ठेवावा कीं शत्रूच्या मोहपाशांना त्यांनीं भुलून जाऊ नये. 1MYP 271;CChMara 235.2