Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    मंडळीच्या व संस्थांच्या पुढार्‍यांवरील टीकाशस्त्राचे परिणाम

    वितुष्ट व कलह यांचे बिजारोपण करावे. मित्रामित्राची ताटातूट करावी आणि पुष्कळांना त्यांच्या निष्ठानिग्रहापासून परावृत्त करावे, ह्या सैतानाच्या ज्या विशिष्ट योजना आहेत त्यांत पोकळ थापेबाजीचे व चहाडखोरपणाचे मन ही एक आहे. दुसर्‍याच्या अगी जे दोष व चुका आहेत असें त्यांना वाटते त्याविषयी बोलण्याची बंधुभगिनींची अगदी तयारीच असतें, व त्यातल्या त्यात देवाच्या अनुग्रहाप्रमाणे जे निर्भिडपणे खरडपट्टी काढितात तें तर विशेषतः असतातच. अशांची मुलें उघड्या कानांनी ह्या गोष्टी ऐकून घेतात आणि असंतुष्टतेच्या विषाने बाधीत होतात. मुलांच्या अंत:करणांची सुसज्जता करण्याचे जे मार्ग असतात तें आईबाप याप्रमाणे अविचाराने बंद करून टाकतात. यामध्ये देवाचा अपमान केला जातो कारण ख्रिस्ताचे असें म्हणणे आहे कीं, “ज्याअर्थी तुम्ही या माझ्या अति कनिष्ठ बंधूतील एकाला केले त्याअर्थी तें मलाच केले.” म्हणून ख्रिस्ताच्या सेवकांची निंदा म्हणजेच ख्रिस्ताचा उपमद व अपमान होय.CChMara 245.5

    देवाच्या निवडलेल्या सेवकांना आधार देण्याचे ज्यांचे कर्तव्य असतें, तेच कांही लोक त्यांच्या नामांची, बदनामी करितात किंबहुना कित्येकांना तें अगदीच तुच्छ लेखितात. देवाच्या सेवकांनी दिलेले गभीर इशारे आणि टोमणे याविषयी आईबापांनी काढलेले अनादरपणाचे उद्गार मुलांनी ऐकण्याचे कमी केले नाही. तिरस्कारणीय शब्दांनीं केलेल्या थट्टा त्यांना समजून, येत होत्या आणि वेळोवेळी केलेली बदनामीकारक भाषणे मुलांच्या कानांवर आदळत होती. पवित्र व सार्वकालिक हिताच्या गोष्टी जगांतील सर्वसाधारण बाबींप्रत आणण्याचा हा कल होता. लहानपणापासूनच आपल्या मुलांना नास्तिक बनविण्याचे कार्य हें आईबाप कसे करितात तें पहा ! पापाचा निषेध करण्याच्या स्वर्गीय उद्देशांविषयी बेपर्वाई व बंडखोर होण्याची मुलांची वृत्ति अशीच त्यांना शिकविण्यात येते. CChMara 246.1

    असले दुराचार जेथे चालतात, तेथें आत्मिकतेचा -हास झालाच पाहिजे. शत्रूने अंध केलेले हेच बाप व ह्याच माता चकित होऊन म्हणतात कीं, आमची मुलें अविश्वासाकडे का झुकतात व पवित्र शास्त्रामधील सत्याविषयी साशक का होतात. नैतिक व धार्मिक वजनाचा त्यावर पगडा बसविणे का दुरापास्त व्हावे याविषयी त्यांना विस्मय वाटतो त्यांना जर आत्मिक दृष्टि असती तर हा सर्व आमच्या गृहवातावरणाचा आणि आमच्या मत्सरी व अविश्वासाचा परिणाम होय असें त्यांना ताबडतोब कळून आलें असतें. या प्रकारे ख्रिस्ती म्हणविणाच्या कुटुंबसमुहांकडून पुष्कळ नास्तिकांची सिद्धता होते.CChMara 246.2

    देवाच्या संस्थांमधून भारी भारी जबाबदार्‍य वाहणार्‍य सेवकाच्या खर्‍य अगर काल्पनिक उणेपणांविषयी वाटाघाटी व विचार करण्यांत पुष्कळांना मोठा आनंद वाटतो. आपल्या परिश्रमात त्यांनी हितकर असें काय काय साध्य केले आहे आणि त्यांच्या उद्योगी श्रमाकडून आणि त्यांच्या अढळ तत्परतेकडून काय काय कल्याणकारी परिणाम घडून आलेले आहेत याकडे तें कानाडोळा करतात. उघडकीस आलेल्या एखाद्या चुकीवर भर देऊन, जी गोष्ट घडली व तिचा परिणामही होऊन गेलेला आहे तीच अधिक चांगल्या रितीने कशी करता आली असती याचा तर्कवितर्क करीत बसतात. पण खरी वस्तुस्थिती पाहा तेच काम जर त्यांच्याकडे दिले असतें तर त्यांतील नैराश्य पाहून तें हाती घेण्याचे त्यांनी नाकारले तरी असतें किंवा तें करण्यांत आलें त्यापेक्षा त्यानीं अधिक अविचाराने केले असते.CChMara 246.3

    परंतु शेवाळ जसे एकाद्या ओबडघोबड दगडाला चिकटून बसतें; त्याप्रमाणें हें स्वच्छंदी बडबडे त्या कार्यातील असंमत भागावर फार भर देतील. इतरांच्या चुका व अपराधत यावरच अशा लोकांची नजर असल्यामुळे आत्मिकतेत तें खूजे झालेले असतात. हितकर व थोर कृत्यें काय असतात, नि:स्वार्थी प्रयत्न कोणते, वास्तविक शूरत्व कशात आणि स्वनाकार म्हणजे काय या गोष्टी समजून घेण्याचे त्यांना नीतिबळ नसते. आपल्या जीवनांतील आशा-क्षेत्रांत थोर आणि श्रेष्ठ, आपल्या कल्पना व ध्येय क्षेत्रात उदार आणि उदात्त असें त्यांना होता येत नाहीं. ख्रिस्ती जीवितांतील गुणधर्म पाहाण्यासाठी जो मनाचा उदारपणा लागतो तो त्यांना कमविता येत नाहीं. रोजरोज तें सद्गुणभ्रष्ट होतात आणि आपल्या कलुषित मनामुळे व धोरणामुळे तें एकसारखे अंकुचित होत जातात. क्षुद्रता त्याचे मूलतत्त्व बनते आणि त्यांच्या सभोवारचे वातावरण शांतीच्या व सौख्याच्या प्राप्तीसाठीं विषारी झालेले असतें. 74T 195-196;CChMara 247.1

    प्रत्येक संस्थेला अडचणीशी झगडावे लागते. देवाच्या लोकांच्या अंतर्यामाची कसोटी पाहाण्यासाठी परीक्षा घेण्यात येते. प्रभूच्या कार्यसाधनांवर संकट येते तेव्हाच मात्र देवावरची निष्ठा आणि त्याच्या कार्यावरची भक्ति दिसून येते. अशावेळी कोणीही परिस्थितीकडे क्षुद्र बुद्धीन पाहून संशयाला आणि अविश्वासाला जागा देऊ नये. जबाबदारीची ओझी वाहणाच्यावर टीकाशस्त्र उभारू नये. प्रभूच्या सेवकावरच्या टीकेने आपल्या गृहातील बोलाचाली विषारी बनवू नका. जे आईबाप टीकेंत मन घालतात, ती आपल्या मुलांना तारणासाठीं सूज्ञ करण्याचे ज्ञान त्यांना देत नाहींत. त्यांच्या बोलण्याभाषणांकडून केवळ मुलांच्याच धर्मनिष्ठेला व विश्वासाला डळमळीत करीतात एवढेच नव्हें तर घरातील वयस्करही मनात अस्थितर होतात. 87T183;CChMara 247.2

    ज्यांच्या ताब्यात तरुण आहेत अशा संस्थाचालकांपुढे सुव्यवस्था व चतुराईची शिस्त राखणे ही अत्यंत अवघड कामगिरी असतें. मंडळीच्या सभासदांनी सहकार दिल्यास फार मोठे कार्य होईल. संस्थेच्या शिस्तीला जर तरुण मंडळी मान्य नसेल अगर वरिष्ठांशी मतभेद झाल्यामुळे ती आपलाच हेका चालवूं पाहात असेल तर आईबापांनीं अधदृष्टीने आपल्या मुलास सहानुभूति दाखवू नये.CChMara 247.3

    सत्याशीं, आपल्या सहबांधवांशी आणि देवाशी असलेल्या निष्ठेचा मूळ पाया म्हणून जी तत्वे आहेत त्यांचा धिक्कार करण्याच्या शिकवणीपेक्षा तुमच्या मुलानी दु:खसहन करावे हें अधिक बरे किंबहुना ती नष्ट झालेली अधिक पुरवली. 97T 185, 186;CChMara 247.4