Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    आध्यात्मिक गोष्टींच्या अभिरुचीचा विकास करा.

    तरुण मंडळीला जर बिनधोकपणा हवा असेल तर तो अखंड जागृतींत व नम्रतेच्या प्रार्थनेत मिळेल. या व्यतिरिक्त आपण खिस्ती राह शक अशी त्यांनी स्वत:ची खुशामत करुन घेऊ नये. अरण्यामध्ये ख्रिस्ताला केल्याप्रमाणे सैतान ज्ञानाचे ढोंग करून आपले मोहपाश व करामती गुप्त ठेवीत असतो. देवदूतांच्या मंडळातले आपण एक आहों असें तो दाखवित होता. जणू काय स्वर्गीय अतिथी या नात्याने आमच्या आत्म्याचा शत्रू म्हणजे सैतान आपल्या जवळ येईल. सावधगिरीत व जागृतितच आमची सुरक्षिता असतें अशी प्रेषिताची शिफारस आहे. ख्रिस्त झाला तसे विजयी होण्याच्या ऐवजी तरुण लोक बेपरवाईत व क्षुद्रतेत मन रमू देतात व आपल्या ख्रिस्ती कर्तव्याची हयगय करितात म्हणून तें कायमचे शत्रूच्या मोहपाशांना बळी पडतात. 23T 374;CChMara 255.1

    आपण प्रभूच्या बाजूचे आहो असें पुष्कळजण बोलून दाखवितात, पण तें तसे नसतात. त्यांच्या कृतींचा सर्व कल सैतानाकडे असतो. आपण कोणाच्या बाजूचे आहों हें कसे ठरवावें ? आपले अंत:करण कोणाकडे असतें ? आमच्या विचारांचा ओघ कोठे असतो? कोणाशी बोलाचाली करण्यांत आपण रमतों ? आमच्या निकट आवडी व आमचा अत्युत्तम उत्साह कोणाच्या हवालीं आहेत ? जर आम्ही प्रभूच्या पक्षाचे असलो तर आमचे विचार त्याच्यासह व आमचे गोड चिंतन त्याच्यासाठीच असतें. जगाच्या मैत्रीत आम्ही गुंतलेले नसतो. आम्हाजवळ आहे नाहीं तें त्याला समर्पित केलेले असतें. त्याचे प्रतिरूप धारण करण्याची आमची मनीषा असतें, तो आमचा श्वासोच्छ्वास असतो, त्यांच्या इच्छेप्रमाणे आम्ही जगतों आणि सर्व गोष्टींत आम्ही त्याला खुश ठेवितों.CChMara 255.2

    हितकारक फलप्राप्ति साध्य करण्यासाठी बुद्धिसामथ्र्यांचा उपयोग करणे यालाच खरें शिक्षण म्हणावे. जगामध्ये मेंदु, मज्जा व स्नायुंचे बळ उपलब्ध असूनही आमचे धर्माकडे एवढे अंकुचित लक्ष का ? याचे कारण एवढेच कीं आम्ही आपल्या सर्व शक्तींचा भर त्याच बाजूला जाऊ देतो. आमची आस्था व सामर्थ्य जगीत खटपटींतच घालण्याची तालीम दिल्यामुळे मन सहजासहजी तिकडेच ओढले जाते. यामुळेच ख्रिस्ती लोकांना धार्मिक जीवन जड आणि ऐहिक जीवन सोपें भासते. आमच्या बुद्धिसामर्थ्याचा जोर त्याच दिशेने नेण्याचे वळण दिलेले असतें. आमच्या धार्मिक जीवनांत देवाच्या आज्ञेतील सत्यांना आम्ही मान्यता देतो. परंतु प्रत्यक्ष जीवनकलेंत त्याचा मागमूसही दिसून येत नाही. CChMara 255.3

    धार्मिक विचारसरणी व भक्तिपर भावना-प्रवृत्ति यांचे संगोपन करणे हा शिक्षण शास्त्रातील भाग समजत नाहीत. खरे म्हणाल तर ह्यांनी आमच्या अवघ्या जीविताला चालना द्यावयास पाहिजे. यथायोग्य रीतीने जगण्याच्या संवयीचा अभावच दिसून येतो. (यथायोग्य रितीने जगण्याची भावनाच दिसून येत नाहीं.) सोईस्कर दाब असला तर लहरीखातर काहींतरी घडून येते, परंतु स्वभावत: व स्वसंतोषाने दैवी गोष्टीचे चिंतन करावे हा कांहीं त्यांचा प्रमुख मनोविकार नसतो. (हें कांहीं मनाचे अधिकृत तत्त्व नसतें.)CChMara 256.1

    जें कांहीं शुद्ध आहे त्यावर आवड ठेवण्याची मनाला तालीम दिली पाहिजे. आत्मिक गोष्टींच्या पसंतीसाठीं मनाला उत्तेजन देण्यांत यावे. सद्गुणाच्या आणि पवित्रतेच्या भावनाच म्हणाल तर त्या योग्य होत, पण तेथेच थकबून चालत नाहीं, त्यातून काहींच निष्पन्न होणार नाहीं. चांगले उद्देश यथायोग्य असतात. परंतु निश्चयपूर्वक तें अमलांत आणल्याशिवाय तें निरर्थक ठरतात. ख्रिस्तीत्व धारण करण्याची आशा व इच्छा बाळगणारे पुष्कळजण नष्ट होऊन जातील कारण तसे होण्यासाठी त्यांनीं आस्थापूर्वक प्रयत्न केले नाहीत म्हणून अखेरच्या कसोटीच्या प्रसंगी तें उणे असें आढळून येतील. इच्छाशक्तीला योग्य प्रकारचे मार्गदर्शन दिले पाहिजे. संपूर्ण अंत:करणाचा असा मी ख्रिस्ती होणार आहे. पूर्णत्वाने संपन्न अशा प्रीतीची लांबी, रुंदी आणि उंची व खोली मी जाणून घेणार आहे. येशू काय सांगतो तें ऐकाः “जे धार्मिककतेचे भुकेले व तान्हेले तें धन्य, कारण तें तृप्त होतील.” मत्तय ५:६. धार्मिकतेसाठी भुकेल्या व तृषित झालेल्या आत्म्यांची तृप्ति करण्यासाठीं खिस्ताने मुबलक सामुग्री सिद्ध करून ठेविलेली आहे.CChMara 256.2