Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    करितां येतें तेव्हांच देवाची प्रीति हस्तगत करा

    जुन्या काळच्या निष्ठावंत अब्राहामाकडे माझे मन धाव घेत आहे. रात्रींच्या वेळी बैरशेबाच्या दर्शनांत दिलेल्या दैवी आज्ञेप्रमाणे तो आपला प्रवास इसहाकाला घेऊन करीत आहे. ज्या डोंगरावर अर्पण करावयाचे म्हणून देवानें सूचित केलेले होतें तो डोगर त्याला पुढे दिसत होता.CChMara 257.3

    दु:खद पित्याच्या थरथर कापणाच्या व प्रेमळ हस्तांनी इसहाकाला बांधण्यात आलें. कारण देवाने तसेच आज्ञापले होतें. आपल्या पित्याच्या प्रामाणिक निष्ठेवर विश्वास असल्यामुळे पुत्र मान्य होत आहे, परंतु सर्व कांहीं तयार झाल्यावर आणि पित्याची निष्ठा व पुत्राचे आज्ञापालन यांची संपूर्ण कसोटी झाल्यावर मुलाचे अर्पण करणाच्या अब्राहामाचा उगारलेला हात पाहून देवदूत म्हणतो, बस्स, हें पुरे आहे. आपल्या एकुलत्या एक पुत्रासही मला अर्पिण्यास मागें पुढे पाहिलें नाहींस यावरून तू देवाला भिऊन चालणारा आहेस, हें मला दिसून आलें.” उत्पत्ति. २२:१२.CChMara 258.1

    अब्राहामाच्या श्रद्धेचे हें कार्य आमच्या हितासाठी नमूद करून ठेवण्यात आलें आहे. ईश्वर संकेत-मग तें कितीही निकटचे अगर दु:खदायी असोत त्यावर निष्ठा असावी असा महान् धडा यांत दिलेला आहे. मुलांनी आपापल्या मातापितरांशीं व देवाशीं संपूर्णत: आज्ञांकित असावे असें यांत शिकविले आहे. अब्राहामाच्या आज्ञाकितपणावरून आम्हांस असें शिक्षण दिले आहे कीं देवाला देण्यासाठी अत्यंत मौल्यवान असें आम्हांजवळ कांहीं नाहीं.CChMara 258.2

    ज्या जीवनचरित्रामध्ये मानखंडना, स्वसुखाचा त्याग, गरिबी, कष्ट, निंदा आणि क्रुसावरील यातनेचे मरण आहे, अशा जीवनासाठी देवाने आपल्या पुत्राला देऊन टाकले. “माझ्या प्रियकर पुत्रा, झाले तें पुरे, आतां प्राणार्पण करण्याचे कारण नाहीं.” असा आनंददायी निरोप देण्यास कोणीही दिव्यदूत सिद्ध झाला नाही. ज्याप्रमाणे अखेरच्या घटकेला इसहाकाचा मरणप्रसंग टाळण्यात आला तसेच हें लज्जास्पद मरण देव टाळून टाकील, अशी दु:खभरित अंत:करणांनी दृतसेना वाट पहात होती. परंतु देवपुत्रासाठी असला निरोप आणण्यास दूतांना परवानगी देण्यांत आली नाहीं. न्यायदालनात आणि काल्व्हरीकडे जातांना होत असलेली मानखंडना चालूच होती. त्याचा तिरस्कार करणारे त्याची मस्करी व विटबना करून त्यांच्या मुखावर थुकले त्याच्याकडून उपहास, विटंबना, आणि निर्भत्सना हीं अधस्तंभावर अंत होईपर्यंत त्यानें सहन केलीं. CChMara 258.3

    असल्या दु:खसागरांतून आपल्या पुत्राला जाऊ द्यावे. यापेक्षा आम्हावरच्या प्रीतीचा देवाला अधिक सबळ पुरावा देता येईल काय? ज्या अर्थी देवाच्या ह्या फुकट दानाने त्याची अमर्याद प्रीति व्यक्त होत आहे त्याअर्थी त्याच प्रमाणांत तो आमच्या निष्ठेची, आज्ञापालनाची, संपूर्ण समर्पणाची आणि आपल्या निर्भेळ प्रेमरुपी संपत्तीची हक्काने मागणी करीत आहे. जे काहीं देणे मानवाला शक्य आहे, तें सर्व त्यानें द्यावयास पाहिजे. देवाच्या दानाशी प्रमाणबद्ध राहील असेच आमचे समर्पण असावयास पाहिजे. त्यांत कांहीं एक न्यून न ठेविता तें परिपूर्ण असें हवे आहे. आम्ही तर सर्व देवाचे ऋणकरी आहों, पूर्ण स्वार्पण व राजीखुषीचा स्वार्थत्याग याविना आम्हांला त्याच्या हक्कयुक्त मागणीची भरपाई करिता येणें शक्य नाहीं. ताबडतोबीच्या आणि स्वखुषीच्या आज्ञापालनाशिवाय त्याला यर्किचितही उणे खपणार नाही. देवाची प्रीति व कृपा प्राप्त करून घेण्याची आतांच आम्हांला संधि आहे. ज्या कोणाला हें वाचावयास मिळेल त्यापैकी काहींच्या चरित्रांत हें अखेरचेच वर्ष असू शकेल. आस्थेवाईक संशोधकास आणि त्याच्या इच्छेनुरुप उत्साहाने वागणारास ख्रिस्त जी शांति देऊ करीत आहे ती बाजूला सारून, ही विनंति वाचून केवळ जगसौख्याची पसंती करणारे तरुण असतील का?CChMara 258.4