Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अति कडक शिक्षणांतील धोका

    बालमडळी असलेल्या अनेक कुटुंबामधून शिस्तमय शिक्षणाची चांगली तरतूद केलेली आणि प्रगति झालेली आढळून येते. परंतु नियम बधनांच्याच आधारावर राखिलेल्या शिस्तीचे काय ? जर का एकादा नियमभंग झाला तर शिस्तीखाली आलेल्या मंडळीमध्ये स्वतंत्रपणे विचार करुन हालचाल करण्याची अगर निर्णय घेण्याची काहीं हिमतच आढळून येत नाहीं. CChMara 264.1

    तरुणांना नुसतेच कडक शिक्षण दिले व आपल्या मानसिक धोरणाप्रमाणे विचार करून हालचाल करण्याचे मार्गदर्शन दिले नाही आणि त्यांच्या विचारवृत्तीमध्ये प्रगती केली नाहीं, स्वाभिमानात इर्षा आली नाही, आणि आपल्या शक्तिनुसार कार्य साधण्याचा आत्मविश्वास त्यात निर्माण केला नाही तर तसल्या त्या शिस्तमय शिक्षणाने मानसिक व नैतिक सामर्थ्यांत पंगु राहाणार्‍य अशाच लोकांचा एक वर्ग उत्पन्न होऊन जाईल, असले हें लोक जेव्हां जगाच्या व्यवहारात उतरतात, तेव्हां तें काय म्हणतील? आम्हांला पशूप्रमाणे शिक्षण देण्यांत आलें होतें. सशक्षण दिलेले नाही, असेच तें उघड करून दाखविताल. त्यांच्या इच्छा शक्तीला मार्गदर्शन मिळण्याऐवजी आईबापाच्या व शिक्षकवर्गाच्या कडक शिस्तीखाली त्याना जुलमाने अंकित केलेले होतें.CChMara 264.2

    आपल्या स्वाधीन केलेल्या मुलांची मने व इच्छा संपूर्णत: आम्ही ताब्यात ठेवली होती. अशी अहकारी आईबापांना व शिक्षकांना मारता येते. परंतु आपली ती मुलें त्यांच्या भवितव्यात आमच्या जुलमाखाली व भयाच्या दडपणाने कशी लाचार निपजली हें त्यांनी शोधून पाहिलें तर त्याना त्यांची ती घमेंड बंद करावी लागेल. आपल्या चरित्रांतील जबरदस्त जबाबदार्‍यांत भाग घेण्यास त्याची बहतेक अगदीच तयारी झालेली नसेल. आमच्या ताब्यात असतां आपल्या विद्यार्थ्यांच्या इच्छा बहुतेक संपूर्णत: आम्हीं कह्यात ठेविलेल्या होत्या असें समाधान मानणारी शिक्षक मंडळी अगदी यशस्वी शिक्षक नसतात. त्यांच्या त्या तात्पुरत्या देखाव्याने तें आत्मस्तुति मात्र करितात.CChMara 264.3

    अनेक वेळा तें मोठ्या घमेंडींत असतात आणि आपल्या सत्तेचा उपयोग बेपरवाईने व निर्दयतेने करितात. अशा वागणुकीने तें आपल्या मुलांची व विद्याथ्र्यांची मने अकित करुं शकत नाहींत. जर तें मुलांना एकत्र करून जवळ घेतील व त्यांना आपली प्रीति दाखवतील, त्याच्या सर्व खटाटोपांत व त्यांच्या खेळांतसुद्धा आपले मन आहे असें दाखवितील, कधीं कधीं तर मुलांमध्ये मुलेंच बनून जातील, तर त्यांना मुलांना फार खूष ठेवितां येईल व त्यांची प्रीति आणि त्यांचा विश्वास संपादन करता येईल. मुलेंहि लवकरच आईबापांचा व शिक्षकांचा अविकार मान्य करून त्याजवर प्रीति करूं लागतील.CChMara 264.4

    उलटपक्षीं आपल्या आईबापांच्या व शिक्षकाच्या निर्णयाविषयीं स्वतंत्रपणे विचार करून वागू देण्याची वृत्त तरुणांना देण्यांत येऊ नये. अनुभवाचे निर्णय मान्य करण्यांत यावेत आणि आईबापांच्या व शिक्षकांच्या नजरेत राहून त्यांचा आदर करावा असें त्यांस शिक्षण देण्यांत यावें. तरुणांना असें शिक्षण देण्यांत यावें कीं तें आपल्या आईबापांच्या शिक्षकांच्या मनांत मन घालून राहतील व त्यांची सल्लामसलत ऐकूण घेण्याचे महत्त्व त्यांना दिसून येईल. नंतर मग आपल्या आईबापांच्या व शिक्षकांच्या मार्गदर्शक परिस्थितीतून तें बाहेर पडतील तेव्हां त्यांचे शीलधर्म वार्‍यने हालविणाच्या बोरूप्रमाणे हेलकावणार नाहींत. 113T 132-135;CChMara 264.5