Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    प्रकरण ४६ वें - ख्रिस्ती शिक्षण

    या जगांतील इतिहासांत अखेरची क्रांतिकारक घटना अगदी जोराने समीप येत आहे, तिकडे आम्ही जात आहो. आमच्या शाळांतून मिळणारे शिक्षणविषयक हक्क या जगांतील इतर शाळांतून मिळतात त्यांहून अगदीं भिन्न असावयास पाहिजेत, ही महत्वाची बाब आम्हीं समजून घेतली पाहिजे. 1CT 56CChMara 275.1

    शिक्षणविषयींच्या आमच्या कल्पना अति अकुचित आणि हलक्या दर्जाच्या आहेत. त्याविषयी अधिक उदार धोरण व अधिक श्रेष्ठ ध्येय असावयास पाहिजे. अमुक एक प्रकारचा अभ्यासक्रम पुरा करण्याहून खरे शिक्षण अधिक महत्त्वपूर्ण असतें. सांप्रतच्या जीवनासाठी तयार व्हावे, त्याहून तें अधिक असतें. आमच्या संबंध अस्तित्वाशी किंबहुना मानवाला लाभणाच्या शक्य त्या आयुष्य काळाशीं त्याचा संबंध असतो. शारीरिक, मानसिक व आत्मिक त्या आयुष्य काळाशी त्याचा संबंध असतो. शारीरिक, मानसिक व आत्मिक शक्तीचा सुसंगत विकास हेच तें शिक्षण होय. या जगांतील सेवेच्या आनंदासाठी आणि भावी जगांतील अधिक विस्तृत सेवेच्या उत्कृष्ट आनंदासाठी तें शिक्षण विद्यार्थीगणाला तयार करतें. 2Ed. 13;CChMara 275.2

    अगदीं श्रेष्ठ दृष्टीने अवलोकन केल्यास असें दिसून येईल कीं, शिक्षणाचे कार्य व तारणाचे कार्य हीं एकच होत. कारण “घातलेला पाया जो येशू ख्रिस्त त्यावाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. ही गोष्ट शिक्षणाच्या बाबींत तशीच तारणाच्या बाबींत सारखीच लागू पडते. 3Ed. 30;CChMara 275.3

    मानवाला देवाच्या सुसंगतींत परत आणावे, असें कीं त्याचा नैतिक स्वभाव वरच्या दर्जाचा व थोर बनेल व त्यांत उत्पन्नकर्त्यांची प्रतिमा दिसून येईल हेच सर्व शिक्षणाचे व जीवनातील शिस्तीचे अंतिम ध्येय होय. हें कार्य इतके महत्त्वाचे होतें कीं तारणाच्याने आपला स्वर्गीय दरबार सोडून तो व्यक्तिश: पृथ्वीवर आला अशासाठीं कीं उच्च दर्जाच्या जीवनप्राप्तीसाठी लायक कसे व्हावे याचे शिक्षण त्यानें मानवास द्यावें. 4CT 49;CChMara 275.4

    जगिक धोरणांत, कार्यपद्धतींत आणि राहणीत वाहवत जावे व आपण कोणत्या काळांत जगत आहो अगर आपणाकडे कोणती मोठी कामगिरी सोंपविलेली आहे. याविषयी कांहीं एक विचार न करणे अगदी सोपे आहे. देवाने दिलेल्या नव्हत्या अशा वहिवाटी, प्रघात आणि दंतकथा यांशी समरस होऊन यहूदी जगत होतें. त्याच मार्गाने आमचा शिक्षणप्रेमी गुरुवर्ग जाईल कीं काय असा एक धोका वारंवार नजरेपुढे येतो. कित्येकजण पुराणकाळच्या वहिवाटींना इतके भक्कमपणे चिकटलेले व ज्यांची आवश्यकता नाहीं अशा अभ्यासात इतकें मग्न झालेले दिसतात कीं, जणू काय त्याचे तारण याच गोष्टींवर असावे. असल्या वागणुकीने तें देवाच्या विशिष्ट कार्यापासून दुरावले जातात व आपल्या विद्यार्थी-वर्गाला अपुरे आणि चुकीचे शिक्षण देतात. 56T 150, 151;CChMara 275.5

    आमच्या मडळीमधून काम करण्यास लायक असें स्त्रीपुरुष पाहिजे आहेत त्यानी आमच्या तरुण मंडळीला सेवेच्या विशेष बाजू दाखवून द्याव्यात, असें कीं येशूच्या दर्शनासाठी त्यांना आत्म्याचा संग्रह करिता यावा. आम्ही ज्या शाळा संस्थापल्या आहेत, त्यांनी हेच ध्येय आपल्यापुढे ठेवावे आणि मंडळ्यांनी उघडलेल्या शाळाप्रमाणे अगर जगिक संस्था व कॉलेज सागतील त्या हुकमाप्रमाणे त्या नसाव्यात, त्या सर्वस्वी उच्च दर्जाच्या असून त्यामधून कोणत्याही प्रकारच्या पाखंडी मताला थारा अगर उत्तेजन मिळु नये. व्यवहारिक ख्रिस्ती धर्माचे ज्ञान विद्याथ्र्यांना द्यावयाचे आणि पवित्रशास्त्र हेच श्रेष्ठ व अत्यंत महत्त्वाचे पाठ्यपुस्तक असें गणावयाचे असतें. 6FE 231;CChMara 276.1