Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    आमच्या शिक्षणसंस्थांचा नैतिक पाठिंबा

    आपल्या मुलांच्या अंतर्पालटासाठीं जो आस्थापूर्वक परिश्रम घेत आहे अशा शिक्षकाशीं आईबापांनी सहकार करावयास पाहिजे. आपल्या गृहामध्ये धार्मिकतेचे वातावरण जोमदार व शुद्ध ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न करावा व प्रभूने सांगितल्याप्रमाणे त्यांचे संवर्धन करावे. आपल्या मुलाप्रमाणेच आपणही शिकत आहों असें समजून प्रत्येक दिवशी त्यांनी कांही वेळ अभ्यासांत घालवावा. अशा प्रकारे त्यांना अभ्यासाचा तास सौख्याचा व बुद्धीचा होऊन जाईल आणि आपल्या मुलांच्या तारणप्राप्तींत ही पद्धत त्यांना अधिक खात्रीदायक अशी वाटेल. 126T 199; CChMara 277.5

    कांहीं विद्यार्थी शिक्षणसंस्थेतून घरी आल्यावर कुरकुर व तक्रारी करितात. त्या अतिशयोक्तीच्या व एककल्ली गोष्टी आईबाप व मंडळीचे सभासद फार कान लावून ऐकत असतात. प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात याचा त्यांनी विचार करणे बरे होईल. परंतु तसे न करिता या अपुर्‍यबातमीवरून स्वत:मध्ये व कॉलेजमध्ये विघ्न उत्पन्न करतात. याचा आधार घेऊन कॉलेजच्या कारभाराविषयीं तें शकाकुशंका मनात येऊ देतात. असले वातावरण महाघातकी होऊन जाते. असंतोषाचे शब्द सांसार्गिक आजाराप्रमाणे फैलावतात व त्यांचा मनावर होणारा परिणाम नाहींसा करणे कठीण पडते. जसजसा ह्या गोष्टींचा पुनरुच्चार केला जातो तसतशी ही बाब वाजवीपेक्षा जास्त अवाढव्य दिसूं लागते. अखेरीस जेव्हां विचारपूस (चौकशी) एक दोष नसून शाळेच्या नियमांची अंमलबजावणी करण्याचे कर्तव्य मात्र तें करीत होतें, तें जर त्यानी केले नसते तर शाळेची नालस्ती झाली असती. CChMara 278.1

    जर आईबाप स्वत: शिक्षकाच्या ठिकाणी असतें तर वेगवेगळ्या दर्जाच्या व मानसिक प्रवृत्तीच्या शेकडों विद्याथ्र्यांना शिस्तीत ठेवणे किती अवश्य व दुरापास्त असतें हें त्यांना दिसून आलें असतें. विचारांती त्यांना कांही वेगळेच वाटले असतें. कांही मुलांना गृहांतील शिस्त कदापि लाभलेली नसते. अविश्वासू आईबापांनी त्यांची जी दु:खदायक निष्काळजी केलेली असतें, त्या मुलासाठी कांही तरी केले पाहिजे नाहींतर येशू त्यांना कदापि जवळ करणार नाहीं. त्यांना आटोक्यात आणण्यासाठी जर कांही अधिकाराचा उपयोग केला नाही तर ती मुलें ऐहिक जीवनांत निरर्थक होतील व भावी जीवनांत त्यांना कसलाही भाग मिळावयाचा नाहीं. 134T 428; 429;CChMara 278.2

    निष्ठावंत शिक्षकांच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यांत पुष्कळ आईबाप चुकतात. आपल्या अपुर्‍य बुद्धीमुळे व कोत्या समजशक्तीमुळे तरुणांना व मुलांना शिक्षकाचे सर्व उद्देश व पद्धति नेहमीच समजून येत नाहींत. तथापि शाळेत काय म्हटले व केले याची बातमी घरीं दिल्यावर कुटुंबात आईबाप त्याविषयी वाटाघाट करितांत व शिक्षकावर बेताल टीका करतात. येथे मुलांना जे धडे मिळतात, तें तीं सहसा सोडून देत नाहीत. परिपाठच नसलेला नियमितपणा राखण्याचा अगर मन लावून अभ्यास करण्याचा जोर झाला कीं मुलें आपल्या अविचारी आईबापांकडे कळवळा व लाड मिळावा म्हणून पाहतात. अशा रितीने मुलांची मने अशांत व अतृप्त ठेवण्यास मदत होतें. यामुळे शाळेच्या दृष्टीने संस्थेचे वजन कमजोर होतें व शिक्षकावर मोठा ताण पडतो. तथापि आईबापाच्या गैरकारभारामुळे मुलांची जी हानी होतें ती अत्यत मोठी असतें. शीलामधील उणीवा योग्य वळणाने दुरुस्त न होता त्या वर्षानुवर्षे बळावत जातात व त्यामुळे मुलाच्या उपयुक्त जीवनात नुसतीं अडखळणेच येत नाहीत तर त्या जीवनांचा कदाचित् नाशही होतो. 14FE 64, 65;CChMara 278.3

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents