Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    खिस्ती शिक्षणाची निष्पत्ति

    “होसान्ना, प्रभूच्या नामाने येणारा धन्यवादित असो,’ हें गीत मंदिराच्या आवारात जसे गाऊन दाखवले, त्याचप्रमाणे ह्या अखेरच्या दिवसांत मुलें आपली वाणी उंचावून ह्या बुडत्या जगाला इषार्‍याचा शेवटचा संदेश देतील. सत्याची घोषणा वडील माणसांना जेव्हां करूं देणार नाहीत तेव्हां देवाचा आत्मा मुलांवर येईल, सत्याचे प्रगटीकरण करण्याचा पोक्त कामगारांचा मार्ग बंद केल्यामुळे तें घोषणा कार्य मुलेंच करतील.CChMara 284.5

    मुलांकडून हें महान् कार्य करण्यांत यावे म्हणून त्यांच्या तयारीसाठी देवाने आम्हांला मंडळीच्या शाळा दिलेल्या आहेत या ठिकाणी आजच्या काळासाठी मुलांना सत्याचे विशेष ज्ञान आणि मिशनरी (ख्रिस्ती) सेवेकरिता व्यवहारिक शिक्षण द्यावयाचे आहे. आजारात व अडचणीत सापडलेल्या मंडळीला साह्य करणारी जी सेना आहे तिच्यात मुलांनी आपलीं नांवें नोंदवायाची असतात, आणि आपल्या अल्प-स्वल्प मदतीने वैद्यकीय सेवाकार्यात त्यांना भाग घेता येईल. त्यांचे सेवाकार्य अगदी लहानसे दिसल, परंतु प्रत्येक अल्प साह्याने व प्रयत्नानी सत्यासाठी पुष्कळशा आत्म्यांना जिंकून घेता येईल. त्यांच्याचद्वारे सर्व राष्ट्राना देवाचा संदेश व त्याचे तारक-ज्ञान प्रगट केले जाईल, म्हणूनच मंडळाने कळपातील कोंकराचे ओझे वाहावयास पाहिजे आहे. मुलांना देवाच्या सेवेसाठी शिक्षण व वळण दिले पाहिजे, कारण तशी प्रभूची अपेक्षा आहे. CChMara 285.1

    मंडळीचा कारभार योग्य प्रकारे चालविला तर जेथें जेथें त्या संस्थापिल्या जातील तेथें तेथें सत्याचा दर्जा वाढविण्याची र्ती साधनेच होतील; कारण ख्रिस्ती शिक्षण घेतलेली मुलें ख्रिस्तासाठीं साक्षीदारच होऊन जातील. त्यांना न समजणाच्या गूढ गोष्टी विकसीत करून दाखविल्या. त्याचप्रमाणे पृथ्वीवरच्या ह्या अखेरच्या काळांत मुलांना जर योग्य शिक्षण दिले तर उच्च प्रतीच्या शिक्षणा’ विषयीं बडबड करणार्‍य लोकांना आपल्या साध्या शब्दानीं मुलें थक्क करून सोडतील. 416T 202, 203;CChMara 285.2

    आत्म्यांच्या तारणाचे महान कार्य साधण्याच्या उद्देशाने देवाने आम्हांला कॉलेज दिलेले होतें, असें मला सांगण्यांत आलें होतें. जर एकाद्या व्यक्तीचीं बुद्धिदाने पूर्णपणे उपयुक्त करावयाची असतील तर ती संपूर्णतः ईश्वरी आत्म्याच्या ताब्यांतच दिली पाहिजेत. धार्मिक नियम व तत्त्वे ज्ञानसंपादनाच्या कामी प्रथम पायया होत व खरोखरीच्या शिक्षणाला तीं पायाभूत असतात. उत्कृष्ट हेतु साध्य करावयाचे असतील, तर सर्वसाधारण ज्ञानांत व विज्ञानांत ईश्वरी आत्म्याचे चैतन्य निर्माण झाले पाहिजे. ज्ञानाचा योग्य विनियोग ख्रिस्ती माणसाला ख्रिस्ती माणसाला मात्र करून दाखविता येतो. धार्मिक दृष्टीने अवलोकन केले तरच मात्र विज्ञान शास्त्राचे गुणधर्म आकलन करिता येतात. ईश्वरी कृपने ज्या अंत:करणाला थोरवी लाभलेली आहे त्याला शिक्षणाचे खरे मोल उत्कृष्टपणे समजून येते, ज्याला उत्पन्नकर्त्यांचे ज्ञान आहे त्यालाच मात्र उत्पत्तिकार्यात दिसून येणारे देवाचे गुणधर्म चांगले कळून येतात. तरुणांना सत्याच्या प्रवाहाकडे घेऊन जावयाचे असेल आणि जगाचे पाप हरण करणारा देवाचा कांकरा याजपुढे सादर करावयाचे असेल तर शिक्षकांनी सत्त्याची तात्विकभूमीच ओळखून भागणार नाहीं तर त्यांना पवित्र जीवनाच्या मार्गाचे अनुभवजन्य ज्ञान असावयास पाहिजे. ज्ञान जेव्हां निर्भेळ धार्मिकतेशी संयुक्त झालेले असतें तेव्हाच त्यात सामर्थ्य नांदत असतें. 424T 427;CChMara 285.3