Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    वाचक व साक्षी

    ७० वर्षे मिसेस व्हाईट यांनी देवाने त्यांना जे प्रगट केले तें लिहिले व सांगितलें. पुष्कळदा पवित्रशास्त्रांतील सत्याच्या बाबीत जे चुकले आहेत. त्यांना दुरुस्त करण्यास सल्ला देण्यांत आला आहे. पुष्कळदा आपल्या लोकांनी जो मार्ग स्विकारावा म्हणून देवाची इच्छा आहे ता मार्ग दाखविण्यांत आला. पुष्कळदा ह्या साक्षींचा जीविताशी, गृहाशी व मंडळीशी सबध आला आहे. मंडळीच्या सभासदांनी हें संदेश कसे स्वीकारले? CChMara 28.1

    त्यांच्या कामावरून जबाबदार पुढार्‍यांनी भविष्याच्या दानाचे प्रगटीकरण खरे आहे याची खात्री करून प्रेषित पौल म्हणतो, “संदेशाचा धिक्कार करूं नका, सर्व गोष्टींची पारख करा चांगले तें बळकट धरा.” १ थेस्स. ५:२० २१. मिसेस व्हाईट यांच्या कामासबधाने पवित्रशास्त्रामधील भविष्यवाद्याच्या कसोट्या लावण्यांत आल्या. त्यांना जसे पाहिजे तसे हें आहे. त्या लिहितात:CChMara 28.2

    “हें काम देवाचे आहे कीं नाही. देव सैतानाशी भागी कांही करीत नाही. गेल्या ३० वर्षांतील माझे काम देवाचा शिक्का दर्शविते किंवा सैतानाचा शिक्का दर्शविते ? यांत अर्धे काम नाही.”CChMara 28.3

    भविष्यवादाची परीक्षा करण्यासाठी पवित्रशास्त्रामध्ये चार प्रकारच्या कसोट्या दिल्या आहेत मिसेस व्हाईट याचे कार्य प्रत्येक कसोटीला उतरते.CChMara 28.4

    १ खर्‍य भविष्यवाद्याचा संदेश देवाच्या नियमाला व संदेष्ट्यांच्या निरोपाला जुळता असला पाहिजे. (यशा. ८:२)CChMara 28.5

    इ.जी.व्हाईट यांचे लिखाण देवाच्या नियमाला उंचावते व पुरुष आणि स्त्रियांना बायबलाच्या पूर्णतेकडे मार्गदर्शन करते. त्या शास्त्राकडे आपल्या विश्वासाचा व वागण्याचा नियम या नात्याने त्याकडे बोट दाखवितात. त्याचप्रमाणे तो मोठा प्रकाश समजून त्यांचे लिखाण “लहान प्रकाश या नात्याने वाचणार्‍यांना मोठ्या प्रकाशाप्रत नेते.CChMara 28.6

    २. भविष्यवाद्याचे भविष्य खरे ठरले पाहिजे (यिर्मया २८:९)CChMara 28.7

    मिसेस व्हाईटचे काम माशाप्रमाणे लोकांना मार्गदर्शन करण्यासारखे होतें तरी त्यानी घडणाच्या पुष्कळ गोष्टी पुढे होणार अशा रीतीने लिहिल्या आहेत. १८४८ तील आमच्या छापखान्याच्या आरंभासारखे आहे. सर्व जग प्रकाशाने कसे भरून जाईल तें त्यांनी सांगितलें. आज से, डे. अॅडव्हेंटिस्ट लोक दरवर्शी आपले वाङ्मय २०० भाषेंत व ९।। कोटी रुपये किमतीचे छापीत आहेत.CChMara 28.8

    १८९०त जेव्हां आणखी युद्ध होणार नाही व शांततेचा काळ येणार आहे असें जाहीर केले तेव्हां एलन व्हाईट लिहितात: “वादळ येत आहे व त्याच्या तडाक्याला आपण तयार असले पाहिजे. चोहोकडे त्रास उद्भवलेला आपल्याला दिसेल. हजारो जहाज समुद्राच्या तळाला बुडतील. आरमार खालीं जाईल आणि मानवी जीवांची लाखांनी आहुती पडेल.” ही गोष्ट जागतिक पहिल्या व दुसर्‍य युद्धाच्या वेळी पूर्ण झाली आहे. CChMara 28.9

    ३. खरा भविष्यवादी हा येशू ख्रिस्त मानवी देह धरून आला आहे व देवाने मानवी अवतार घेतला आहे हें कबूल करतो. (१ योहान ४:२)CChMara 28.10

    डिझायर ऑफ एजेस या पुस्तकाच्या वाचनाने एलन जी. व्हाईट या कसोटीला उतरतात हें स्पष्ट होतें पुढील शब्दाकडे लक्ष द्या:CChMara 29.1

    “येशू पित्याच्या बाजूला राहिला असतां तर त्यानें स्वर्गाचे गौरव राखून ठेवले असतें व दूतांची सेवा राखून ठेविली असती. पण पित्याच्या हातांत राजदंड देण्याचे त्यानें निवडले व स्वर्गाच्या सिंहासनावरून खालीं उतरला अशासाठी कीं त्यानें जे नाश पावत आहेत त्यांना जीवन व अंधारांत पडले आहेत अशाना प्रकाश द्यावा.CChMara 29.2

    “सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी एक रहस्यमय अशी वाणी ऐकू आली. “पहा मी येतो.” यज्ञपशु व अन्नार्पण याची तुला इच्छा नाही तू माझ्यासाठी शरीर तयार केले आहे. हें देवा, तुझ्या इच्छेप्रमाणे करावयासाठी मी आलो आहे. इब्री १०:५-७ ह्या शब्दांत जाहीर केले आहे कीं सार्वकालिक युगापासून जो हेतू दडला होता तो पूर्ण झाला आहे. ख्रिस्त आमच्या जगाला भेट देणार होता व अवतार घेणार होता. जगाच्या दृष्टीने त्याला रूप नव्हते. ज्याद्वारे त्याना तो हवासा वाटेल. तरी तो अवतारी देव होता व जगाचा व स्वर्गाचा प्रकाश होता. त्याचे गौरव पडद्याआड होतें, त्याचा मोठेपणा व ऐश्वर्य ही लपली होती अशासाठी कीं, जे दु:खी आहेत व मोहात पडले आहेत अशाजवळ त्यानें यावे.”CChMara 29.3

    ४. कदाचित् खर्‍या भविष्यवादाची अति खडतर कसोटी त्याच्या जीवितांत, कार्यात व त्याच्या शिकवणीच्या परिणामांत आढळून येते. ख्रिस्ताने ही कसोटी मय ७:१५,१६ मध्ये प्रतिपादन केले आहे “तुम्ही त्यांच्या फळांवरू त्यास ओळखाल.” CChMara 29.4

    एलन जी. व्हाईट यांच्या जीविताची तपासणी केल्यावर तर आम्ही असें म्हणू कीं, त्यांनी त्यांच्या शिकवणीला व भविष्यवाद्याने जे पाळावे अशी अपेक्षा करूं त्या गोष्टी जुळेल असें प्रशंसनीय ख्रिस्ती जीणे जगल्या आहेत. ज्यांनी संदेशाच्या आत्म्याचे अनुकरण केले आहे त्यांच्या जीवितातंतील फळें आहेत असें आढळून येते. त्यांच्या साक्षीने चांगले फळ दिले आहे. मंडळीकडे पाहिल्यास वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यात या सल्याद्वारे मार्गदर्शन झाले आहे हें समजून मिसेस व्हाईट याचे कार्य या कसोटीला उतरते. त्यांच्या ७० वर्षाच्या काळांतील लिखाणातील मेळ त्यांच्या भविष्याच्या दानाच्या सत्यतेविषयी साक्ष देतो.CChMara 29.5