Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    आज्ञापालन हें एक वैयक्तिक कर्तव्य

    मानवाच्या उत्पन्नकत्र्याने आमची शरीरें ही एक सजीव यत्ररचना बनविलेली आहे. तिची प्रत्येक हालचाल अद्भुत व चतुराईची आहे. मानव हा देवाचा हस्तक असून जर तो त्याशी आज्ञांकितपणे व सहकाराने वागेल तर ती यत्ररचना सदृढ़ स्थितींत ठेवण्याचे देवाने अभिवचन दिलेले आहे. ज्याप्रमाणे पवित्रशास्त्र हें मुळांत गुणधर्मात आणि माहत्म्यांत खरोखरच दैवी आहे त्याचप्रमाणे ह्या मानवी यत्ररचनेला चालविणारा नियम खरोखरच दैवी गणला पाहिजे. प्रभूच्या ह्या अद्भुत यत्ररचनेचा कारभार त्याच्या विशिष्ट निर्बधनाने चालविलेला असतां, म्हणून मानवाच्या ताब्यात दिलेल्या या रचनांची निष्काळजीने, दुर्लक्षपणे व दुरुपयोगाने व्यवस्था केली तर तें ईश्वरी नियमांचे उल्लघनच होय. नैसर्गिक सष्टींतील ईश्वरी कार्य बघुन आम्ही मोठे कौतुक करूं परंतु मानवतेतील त्याचे वास्तव्य अत्यंत अद्भुतकारक असें आहे. 4CD 17;CChMara 290.1

    ज्याअर्थी निसर्गाचे कानूकायदे हें देवाचे कानूकायदे आहेत त्याअर्थी त्याचा अभ्यास करणे हें एक आपले स्पष्ट कर्तव्य आहे आमच्या शारीरिक प्रकृतीविषयी काय काय करणे अवश्य आहे त्याचे आम्हीं अध्ययन आणि अवलंबन केले पाहिजे. या प्रकरणाचे अज्ञान हें पाप होय. CChMara 290.2

    जेव्हां पुरुषांचा व स्त्रियांचा खरोखरच अंतर्पालट झालेला असतो. तेव्हां त्याच्या अस्तित्वासाठी देवाने घालून दिलेल्या नियमाचा तें बुद्धि पुर:सर विचार करतात व अशा रितीने शारीरिक, मानसिक व नैतिक दुबळेपणाची आपत्ति टाळण्याचा तें प्रयत्न करतात. ह्या नियमांचे आज्ञापालन ही एक वैयक्तिक कर्तव्याची बाब गणिली पाहिजे. कायदेभंगाचे दुष्परिणाम आम्हांलाच भोगावे लागतील. आमच्या तंत्रयाविषयी व व्यवहाराविषयी आम्ही परमेश्वरापुढे जबाबदार आहों म्हणून “जग काय म्हणेल?” हा प्रश्न आम्हांपुढे नसून ख्रिस्ती म्हणविणार्‍यला देवानें दिलेल्या स्वत:च्या अस्तित्वाचा कारभार कसा काय चालवावा व माझे शरीर पवित्र आत्म्याच्या वस्तीसाठीं मंदिर म्हणून थोर अशा ऐहिक व आध्यात्मिक गोष्टींच्या मागें लावू किंवा जगांतील विचार तरंगाशी व व्यवहाराशी समरस होऊ देऊ? हें प्रश्न आहेत. 56T 369, 370:CChMara 290.3