Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    अंतर्यामात देवाची जीवनकला हीच मानवाची एक आशा

    शारीरिक अगर मानसिक आरोग्याला पवित्रशास्त्रामधील धर्म वितरक नाहीं. देवाच्या आत्म्याचा पगडा हा आजारावर अत्यंत प्रभावी उपचार होय. स्वर्गीय ध्यान यांतच सर्व आरोग्यसंपन्नता असतें आणि ह्या स्वर्गीय पगड्याचा जोर जितका अधिक मनावर बसेल, तितकी अधिक बरे होण्याची खात्री विश्वासू आजार्‍यची होईल. ख्रिस्ती धर्माचीं अस्सल तत्त्वे अमोल सुत्रसंपन्नतेचा झरा सर्वांना खुला करून दाखवितात. धर्म हा निरंतरचा उपळता झरा होय त्यातून ख्रिस्ती मनुष्याला आली तृष्णा वाटेल तेव्हां भागविता येते व तो झरा कदापि कोरडा पडत नाही.CChMara 290.4

    मानसिक अवस्थेचा शारीरिक प्रकृतीवर परिणाम घडतो. योग्य प्रकारच्या वागणुकीमुळे व इतरांना सुखसमाधान दिल्याच्या समाधानामुळे जर मन सरळ व सुखी असेल तर संबंध प्रकृतीमध्ये तें अशी कांहीं उत्सुकता निर्माण करील कीं रक्ताभिसरण अधिक मोकळे होऊन संबंध प्रकृतीला तें नवीन जोम देईल. ईश्वरी आशीर्वादांत निकोपतेचें सामर्थ्य असतें आणि परहित चिंतनाची ज्याच वृत्ति विपुल असतें त्यांना आपल्या अंत:करणांत व जीवनांत त्या अद्भुत आशीर्वादाची संपन्नता दिसून येईल.CChMara 290.5

    दुर्व्यसनात व पापमय व्यवहारात गुंतलेली माणसें जेव्हां दैवी सत्याच्या सामथ्र्थाला शरण येतात तेव्हां एकदा दुर्बल झालेले त्याचे अंत:करण सत्याच्या प्राप्तीमुळे नवीन नैतिक बळ धारण करितं. असले नवीन जीवन धारण करणान्याची नैतिक शक्ति अविनाशी खडकाला शरण जाण्यापूर्वी अधिक बळकट आणि सरळ होऊन जाते. ख्रिस्तामध्ये त्याला लाभलेल्या निर्भयतेमुळे त्याची शरीर प्रकृतीसुद्धा सुधारत राहाते. 6CH 28;CChMara 291.1

    ख्रिस्ताची कृपा प्राप्त झालो तरच आज्ञांकितपणाचे संपूर्ण आशीर्वाद त्याचेच होऊ शकतात हें शिकून घेण्याची मानवाना गरज आहे. देवाचे विधिनिर्बध मानण्याची शक्ति ख्रिस्ताची कृपाच पुरवू शकते. वाईट संवयाचे दास्यत्व झुगारून देण्यास ती कृपाच त्याला सबळ करिते. सन्मार्गाने चालण्यास हीच शक्ति मात्र त्याला स्थिर करूं शकते.CChMara 291.2

    शुद्ध व शक्ति-संपन्न शुभवंतमनाचा स्वीकार हा पापनिर्मित आजारावरचा रामबाण उपाय होय. न्यायत्वाचा सूर्य आपल्या “रोगनिवारक पखासह उदय पावतो. जगांतील सर्व साधनांनी भग्न हृदयाची दुरुस्ती होईल असें नाहीं अगर मानसिक शांति अगर निर्धास्ती अगर आजाराचे निर्मूलन करील असें नाहीं. नावलौकिक, बुद्धिमता बुद्धिकौशल्य ह्याच्या दु:खात मनाला सुखी अगर निरर्थक जीवनाचा उद्धार करवत नाहीं. अंत:करणात वसलेली देवाची जीवनकली हीच काय ती मानवाची आशा आहे.CChMara 291.3

    आमच्या सर्वस्वांत प्रसरण पावणारी ख्रिस्ताची प्रीति ही नवजीवन देणारी शक्ति होय. मज्जा, अंत:करण, स्नायू यांच्या प्रत्येक शक्तीवर्धक विभागाला त्या प्रीतीचा संपर्क आरोग्यदायक असा होतो. त्यामुळे आम्हातील थोर थोर जोम कार्यदक्षतेसाठी जागृत होतात. दोष आणि दु:खापासून ती मनाला मुक्त करिते. ज्या चिंता आमच्या कार्यसामर्थ्याला दबावतात त्या चिता काळजीची ती प्रीति हकालपट्टी करिते. त्या प्रीतिसह गांभीर्य व शात स्वभाव हीं येतात. जगांतील कोणत्याही साधनांनी नष्ट होऊ शकणार नाही अशा आनंदप्राप्तीची त्या प्रीतीकडून लागवड केली जाते. तो आनंद म्हणजे पवित्र आत्म्याचा, आरोग्यदायी व जीवनदायी असा तो होय.CChMara 291.4

    “अहो..... मजकडे या म्हणजे मी तुम्हांला विश्रांति देईन.” ह्या आमच्या तारकाच्या शब्दांत शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक विकारांवर आरोग्यदायी उपचार आहे. जरी मानवांनी आपल्याच दुष्क्रुतीमुळे दु:खे आणिलेली आहेत तरी देव त्याच्याकडे मोठ्या कळवळ्यानेच पाहतो. त्यामध्येच त्यांना साहाय्य मिळेल. जे त्याजवर आपली निष्ठा ठेवितात, त्यांच्यासाठी तो महान् कृत्ये करील. 7MH 115;CChMara 291.5