Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    मनावर व अंतर्यामावर त्याचा परिणाम

    मांसाहाराने शरीरावर जे आघात घडतात तें मानसिक स्थितीवर कमी असतात असें नाहीं. मासान्न शरीर प्रकृतीला घातक असतें व ज्याचा शरीरावर परिणाम घडतो त्याचा तसलीच परिणाम मनावर व अंत:करणावर घडत असतो. 11MH 315;CChMara 305.5

    मांसाच्या अशानें स्वभावधर्मात फेरफार होतात व पशुवृत्तीला बळकटी येते. जें कांहीं आम्ही खातो त्याकडूनच आमची बनावट होतें आणि पुष्कळ मास खाल्याने बौद्धिक कार्यप्रवाह कमी पडतो जर विद्यार्थी मंडळी मांसाची कधीच चव घेणार नाहीत तर त्यांची अभ्यासामध्ये भलतीच प्रगति होऊन जाईल. मानवांत असलेला पशुवत विभाग जेव्हां मांसाहाराने बळकट होतो, तेव्हां त्याच प्रमाणात बौद्धीक शक्तींचा हास होऊन जातो. 12CD 389; CChMara 305.6

    अन्नाच्या अत्यंत साधेपणाची जर कधीं गरज असेल तर ती आताच आहे. मुलापुढे मासाचे अन्न वाढण्यात येऊ नये. हलकट मनोविकारात जागृति आणून त्यांना सबळ करावें आणि मानसिक सामर्थ्याचा -हास करावा हाच त्याचा परिणाम होईल. 132T 352;CChMara 305.7

    ख्रिस्ताचें आगमन लवकरच होणार अशी ज्या लोकांची निष्ठा आहे त्यांच्यामध्ये अधिक सुधारणा दिसून यावी. आरोग्य सुधारणेचे जे कार्य अद्याप आमच्या मंडळींत झालेले नाहीं तें त्यांच्यामध्ये करण्यांत यावे जे अद्यापहि मांसाहार घेतात, त्यांना त्यांत काय धोका आहे व त्यामुळे त्यांची शारीरिक मानसिक व आत्मिक प्रकृति कशी ढासळणार आहे. यासंबंधी आणि जागृति निर्माण केली पाहिजे. मांसाहारविषयीं ज्यांची अर्धीच समजूत झालेली आहे असें पुष्कळजण देवाच्या लोकांना सोडून जातील व त्याच्यात तें पुन: सामील होणार नाहींत. 14CH 575;CChMara 306.1

    सत्यावर आमची निष्ठा आहे असा वाणा करणार्‍य मंडळीने आपण आपल्या उक्तींच्या अगर कृतींच्याद्वारे देवाचा व त्याच्या कार्याचा उपमर्द करणार नाही अशा रीतीने त्यांनी आपल्या शारीरिक व मानसिक शक्तींचा काळजीपूर्व साभाळ केला पाहिजे. संवया व व्यवहार ह्यांना देवाच्या सूत्राप्रमाणे चालवायचे असतें. आमच्या खाण्यापिण्याकडे काळजीपूर्वक लक्ष पुरवायाचे असतें. मांसाहाराला स्पर्शच करावयाचा नाहीं असें धोरण ईश्वराच्या लोकांनी लावयाचे आहे असें मला स्पष्टपणे सांगण्यांत आलेले आहे. जर देवाच्या लोकांच्या अंगीं शुद्ध रक्त व स्वच्छ मने हवी असतील तर मासाहाराला त्यांनी अजिबात फाटा दिला पाहिजे हा संदेश देवाचे लोक तीस वर्षे ऐकून मान्यच करणार नाहीत का? मांस-भक्षणानें पशुवृत्ति सबळ होतें व आत्मिकवृत्ति दुबळी होते. 15CD 383; CChMara 306.2