Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    खर्‍या भविष्यवाद्याची व्यवहारिक कसोटी

    या पवित्रशास्त्राच्या चार मुख्य कसोट्याशिवाय प्रभूने हें कार्य ज्याच्या मार्गदर्शनाचे आहे हें स्पष्ट करण्यास पुरावे दिले आहेत. त्यापैकी पुढील आहेत.CChMara 29.6

    १. संदेशाचा वक्तशीरपणा - देवाचे लोक कांही विशेष गरजेमध्ये आहेत म्हणून मिसेस व्हाईट यांना पहिला दृष्टांत दिला जातो.CChMara 29.7

    २. संदेशाचे व्यवहारिक स्वभाव - मिसेस व्हाईट यांना दृष्टांतांत प्रगट झालेली माहिती व्यवहारिक स्वरूपाची आहे. तिच्याकडून व्यवहारिक गरजा भागल्या जातात. आमच्या प्रत्येक दिवसाच्या जीवितांत व्यावहारिकरित्या दिल्या जाणार्‍य साक्षीचा सल्ला याकडे लक्ष द्या. CChMara 29.8

    ३. संदेशांचा उच्च आत्मिक दर्जा - या संदेशाचा पोरकट व साधारण गोष्टींशी संबंध नसतो, पण श्रेष्ठ व उच्चतम अशा विषयांशी असतो त्यांतील भाषाच केवळ अति उत्कृष्ट असतें.CChMara 29.9

    ४. दृष्टांत देण्याची रीत - पुष्कळशा दृष्टांतांतील शारीरिक दृष्ये या प्रस्तावनेच्या कांही अध्यायांत दिल्याप्रमाणे आहेत. दृष्टांतातील मिसेस व्हाईट यांचा अनुभव पवितशास्त्रामधील भविष्यवाद्याप्रमाणे होता. ही कसोटी नसून इतर पुराव्यांपैकी एक पुरावा आहे. CChMara 30.1

    ५. हें दृष्टांत नक्की अनुभव आहेत - मनावर होणारे परिणाम नव्हते. दृष्टांतात मिसेस व्हाईट यांनी एकले, पाहिलें त्यांना भासलें व दूतापासून त्यांना माहिती मिळाली. दृष्टांत हें काल्पनिक किंवा भांबावून जाणारे नसून उत्तम प्रकारचे अनुभव होतें.CChMara 30.2

    ६. मिसेस व्हाईट या आपल्याभोवती असणार्‍य लोकांकडून बहकविल्या गेल्या नाहीत. एका मनुष्याला लिहिताना त्या म्हणतात, “तुला असें वाटते कीं काहींनी माझे मन कलुषित केले आहे. जर मी या स्थितीत असेन तर देवाने दिलेले काम करण्यास मी लायक नाही.”CChMara 30.3

    ७. त्यांचे काम त्यांच्या काळांतील लोकांना माहीत होतें. मंडळींतील ज्यांनी त्यांच्याबरोबर राहून काम केले व मंडळी बाहेर राहून मिसेस व्हाईट या खरोखर प्रभूच्या संद्रेष्ट्री आहेत असें कबूल केले. जे त्यांच्या जवळचे होतें त्याना त्याच्या पाचारणासंबधी व कार्यासंबंधी मोठा विश्वास होता.CChMara 30.4

    ह्या चार पवित्रशास्त्राच्या कसोट्या व स्पष्ट पुरावे प्रभूने आपल्या लोकांना सदेष्टा व संदेश यावर विश्वास बसून हें कार्य देवाचे आहे व विश्वसनीय आहे याची खात्री होण्यासाठी दिले आहेत. CChMara 30.5

    ई.जी. व्हाईट याची अनेक पुस्तके मडळीला मोलाचा सल्ला व शिक्षण यांनी भरलेली आहेत. हें सदेश सार्वजनिक किंवा वैयक्तिक स्वरुपाचे जरी असले तरी आज तें आपल्या सेवेसाठी आहेत. या संबंधाने मिसेस व्हाईट म्हणतात:CChMara 30.6

    “संदेशांतील इशारा व शिक्षण व्यक्तिवाचक बाबतीत लागू असून तें विशेष प्रकारे दर्शविले न जाणार्‍यांनाही तितकेच लागू आहेत. मला असें दिसते कीं मंडळींच्या फायद्यासाठी मी माझे वैयक्तिक संदेश छापून काढणे माझे आद्य कर्तव्य आहे... हें संदेश देण्यापेक्षा सार्वजनिक धोके व चुका याविषयीची माझी मते सांगण्यास व जे देवाच्या आज्ञा पाळतात व त्याजवर प्रेम करतात त्यांचे कर्तव्य काय आहे हें सांगण्याचा दुसरा कोणताही चांगला मार्ग आहे असें मला वाटत नाही.”CChMara 30.7

    एखाद्या सोबतीच्या भावाला दोष देण्याच्या बाबतीत कांही मुद्दे शोधण्यासाठी टेस्टिमोनीजचा उपयोग करणे चुकीचे आहे. हें संदेश एकाद्या भावाला किंवा बहिणीला कांही गोष्टी जशा आम्ही पाहाते तसे पहावयास लावण्यासाठी चाबूक या नात्याने उपयोगात कधीही आणू नयेत. कांही बाबी अशा आहेत कीं त्या व्यक्तिनेच देवाबरोबर नीट केल्या पाहिजेत. CChMara 30.8

    ह्या सल्लामसलतीचा अभ्यास आज आपल्या जीविताला मूळ तत्वे लागू करण्यासाठी करवा. कांही सदेश ठराविक वेळी वे स्थळी धमकावणी व इशारा या नात्याने देण्यांत आलें आहेत. तरी त्यामध्ये जी तत्त्वे मांडली आहेत, ती लागू करण्यासाठी व तत्कालीन उपयोगासाठी विश्वव्यापी आहेत. मानवी अंत:करण सर्व जगभर सारखेच आहे. एकाची अडचण ही दुसर्‍यचीही आहे. “एकाद्या चुकीबद्दल त्याला दोष देणे ही बाब देव अनेकांच्या दुरुस्तीसाठी वापरतो. काहींच्या चुका याप्रमाणे दुसर्‍याच्या इशाच्यासाठी आहेत हें तो स्पष्ट करतो.”CChMara 30.9

    आपल्या जीविताच्या शेवटी मिसेस व्हाईटनी पुढील सल्ला दिला आहे :CChMara 31.1

    “पवित्र आत्म्याद्वारे देवाची वाणी सतत इशारा देत व शिक्षण देत आम्हांकडे आली आहे. आम्हांला दिलेली माहिती काळ व छळ याद्वारें निरर्थक झालेली नाही. या संदेशाच्या आरंभीच्या काळांत दिलेली माहिती या शेवटल्या काळांत सुरक्षित माहिती या नात्याने धरुन चालण्यास दिलेली आहे.” CChMara 31.2

    जी माहिती आम्ही अमलांत आणतो ती ई. जी. व्हाईट यांच्या अनेक पुस्तकातून घेतली आहे. पण प्रामुख्याने त्यांच्या टेस्टीमोनीजच्या ग्रंथातून घेतली आहे. तो ग्रंथ मंडळीकरिता संदेश या ग्रंथाची जागतिक आवृत्ति आहे. जेथे एका ठराविक आकाराचाच ग्रंथ छापणे अशक्य आहे असें सभासदांना वाटते तेथील मंडळीला उपयोगी पडण्यासाठी यांचा उपयोग होतो. ही सल्लामसलत निवडण्याचे व जुळविण्याचे काम ई. जी. व्हाईट प्रकाशनच्या विश्वस्त मंडळाच्या अधिकाराखाली कार्य करीत असलेल्या मोठ्या मंडळातर्फ केले जाते. हें विश्वस्त मंडळ संदेशाच्या आत्म्याचा सल्ला उपयोगात आणण्याची व त्याची काळजी घेण्याची जबाबदारी पार पाडते. त्यांची निवड नेहमी संक्षिप्त असून व्यवहारिक मूळ तत्त्वाला धरुन असतें आणि याप्रकारे लांबलचक विषयांचा यांत समावेश केला आहे.CChMara 31.3

    “तुमचा देव परमेश्वर याच्यावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही खंबीर व्हाल; त्याच्या संदेष्ट्यावर विश्वास ठेवा म्हणजे तुम्ही यशस्वी व्हाल.”CChMara 31.4

    - एलन जी. व्हाईट
    प्रकाशनाचे विश्वस्त मंडळ

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents