Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    जनतेला सुशिक्षित करणें

    आरोग्य-सुधारणेच्या मूलभूत तत्त्वाविषयी जनतेला सुशिक्षित करण्यासाठी अधिक परिश्रम केले पाहिजेत. पाकशाळांची संस्थापना करण्यांत यावी आणि पथ्यकर अन्न तयार करण्याविषयी घरोघर जाऊन शिक्षण देण्यांत यावे. स्वयंपाक अधिक सुलभ कसा करावा हें लहानथोरांस शिकविण्यात यावे. जेथे जेथे सत्याची घोषणा करावयाची तेथें तेथें साधे तरी चवदार अन्न बनविण्याचे लोकांस शिक्षण द्यावें. मांसान्नाशिवाय शक्तिवर्धक अन्न तयार करता येते, हें त्यास दाखवून द्यावें. CChMara 312.2

    आजार निवारण करण्याच्या ज्ञानापेक्षा आरोग्य कसे राखावे याचे ज्ञान अधिक उपयुक्त, हें लोकांस शिकवावे. आमचे वैद्य लोक सुज्ञ शिक्षक असावेत. सर्व प्रकारच्या चैनबाजीविरुद्ध सावधगिरीच्या सूचना द्याव्यात आणि शरीराचा व मनाचा घात टाळण्याचा एकच उपाय म्हणजे देवाने मना केलेल्या गोष्टी वर्क्स करणे हा होय हें त्यास दाखविण्यांत यावें.CChMara 312.3

    जे आरोग्य-सुधारक होऊ पाहात आहेत त्याच्या पूर्वीच्या परिचित अन्नाऐवजी जें शक्तिवर्धक अन्न बनवावे लागेल त्यासाठी बरीचशी चतुराई व अक्कल लागणार आहे. ईश्वरावरची निष्ठा, उद्देशाविषयींचीं आस्था आणि परस्परांना साह्य करण्याची इच्छा यांची या कामीं गरज पडेल. शक्तिसंवर्धनाचा मालमसाला अन्नांत नसेल तर त्याचा ठपका आरोग्य सुधारणेवर येतो. आम्ही मरणाधीन प्राणी आहों म्हणून शरीर सुदृढ ठेवण्यासाठीं शक्तिवर्धक अन्न आम्हीं घेतले पाहिजे.CChMara 312.4