Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    तंबाखूचा धूर स्त्रियांना व मुलांना अपायकारक

    चिलमीच्या व सिगारच्या धुरानें अगर ओढणाराच्या दुर्गंधयुक्त श्वासानें दूषित झालेली हवा स्त्रियांना व मुलांना गिळावी लागते. असल्या परिस्थितींत राहणार्‍यांची प्रकृति नेहमीच रोगीट राहील. 155T 440; CChMara 319.9

    फुफ्फुसांतून व त्वचाछिद्रांतून बाहेर पडणारी विषारी दुर्गंधीची लहान बाळ श्वासावाटें घेईल व त्यामुळे त्याची प्रकृति विषभरीत अशी होईल. जरी कांहीं अर्भकांवर हें विष मंदगतीने कार्य करील आणि त्याच्या मेंदूवर, हृदयावर, पित्ताशयावर व फुफ्फुसावर असा अधिक परिणाम करील कीं ती बालकें निस्तेज होतील, परंतु कांहीं अर्भकांवर असा मोठा आघात होईल कीं त्यांना झटके येऊ लागतील. अर्धांगवायु होईल व आकस्मिकपणे ती मरणाला बळी पडतील. तंबाखूचा दास बनलेल्या माणसाच्या प्रत्येक उच्छ्वासाने तो आपल्या सभोवारचे वातावरण दूषित करीत राहतो. 16Te. 58, 59; CChMara 320.1

    गतपिढ्यांच्या आरोग्यविघातक व्यवहारनीतीचा आजच्या मुलांवर व तरुणांवर आघात होत आहे. मानसिक दुबळेपणा, शारीरिक अशक्तता, मज्जातंतुंचा गोंधळ आणि अस्वाभाविक आवडीनिवडी ह्या गोष्टी आईबापांकडून मुलांना वारसा म्हणून प्राप्त होतात. तीच संवयी मुलेंहि चालूं ठेवितात व अशा प्रकारे ही एक दुर्गुणांची परंपराच वाढत राहते. 17MH 328;CChMara 320.2