Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    नैतिक भ्रष्टतेचा परिणाम

    ज्यांना स्वत:विषयी मोठी घमेंड असतें त्यापैकी कित्येकांना स्वत:चा दुररुपयोग करण्यांत काय पाप आहे व त्या पापाची निश्चित प्रतिक्रिया काय होणार हें त्यास कळत नसते. दीर्घ काळापासून जडलेल्या संवयामुळे त्यांची समजशक्ति पार बोथट झालेली असतें. ह्या हलकट पापाचा अत्यंत पापीष्टपणा त्यांना समजून येत नाहीं. तें त्यांची संबंध प्रकृति घटना नि:सत्य करून टाकिते व मज्जातंतूच्या शक्तीचा नाश करीत असतें. अगवळणी पडलेल्या संवयाशी झगडताना नैतिक तत्त्व उणे पडते ह्या नीचतम दुर्गुणाच्या फदाविरद्ध अंत:करणाची भक्कम तरतूद केली नसेल तर त्यावर ईश्वराच गभीरयुक्त सस्कार आळबळे कांहीं परिणाम करूं शकत नाहीं. अस्वाभाविक विषयवासनेच्या तृप्तीसाठी जेव्हां मनांत खळबळ झालेली असतें. तेव्हां मज्जातंतूचे चलाख व हितकर सामर्थ्य नष्ट झालेले असतें. 132T 347; CChMara 326.2

    मानवजातीला रसातळास नेण्यासाठी अवातर प्रत्येक दुगुणापेक्षा नैतिक भ्रष्टतेचे पाऊल अधिक पुढे पडलेले असतात. त्याचा व्यवहार इतका भयंकर फैलावलेला आहे कीं, हरएक प्रकारच्या आजाराला तो कारणीभूत असतो.CChMara 326.3

    आपल्या मुलांना ह्या दुर्गुणाविषयीं कांहीं कल्पना असेल असा बहुत करून आईबापांना संशयहि येत नसेल. पुष्कळ प्रकरणात वास्तविक पाहता आईबापच दोषपात्र असतात. विवाहसंबंधीच्या आपल्या विशेष हक्कांची त्यानीं पायमल्ली केलेली असतें व फाजील लडिवाळपणाच्या नादांत त्यांच्याकडून त्यांच्या वैषविक भावना भरभक्कम केल्या जातात. ह्या भक्कमतेमुहें नैतिक व बौद्धिक शक्तींचा व्हास झालेला असतो. आत्मिकतेवर पशुभावना जोर करिते. मुलें जन्माला येतात तीं पुष्कळ अशीं पाशवी हृदयाप्रमाणे वाढत असतात कारण मातापितराच्या शिलाचा ठसा त्यावर उमठलेला असतो. असल्या आईबापांच्या पोटी जन्मलेली मुलें बहुतेक सर्वदा स्वभावत: त्याज्य व गुप्त दुर्गुणाकडे ओढिली जातात. आईबापांच्या वैयक्तिक प्रवृत्ति मुलांवर उमठल्यामुळे आईबापाची पापे मुलांच्या पदरात पडतात.CChMara 326.4

    आत्म्याचा व शरीराचा नाश करणार्‍य या दुर्गुणाशी जे संपूर्णत: एकजीव झालेले आहेत त्यांना आपल्या गुप्त पापांशी आपल्या सहवासात येणार्‍य इतरास सहभागी केल्याशिवाय चैनच पडत नाहीं. जिज्ञासा त्वरित जागृत होतें व ह्या दुर्गुणाचे ज्ञान तरुणांपासून तरुणांना आणि मुलांपासून मुलांना असें देण्यांत येते कीं या हलकट पापांत जगत नाहीं असा क्वचित् एकादा आढळून येतो. 1427 391, 392;CChMara 326.5

    गुप्त संवयाच्या व्यवहाराने प्रकृति-घटनेतील जिव्हाळ्याच्या शक्ति नि:संशय नष्ट होतात. याद्वारें आलेल्या शिथिलतेमुळे अनावश्यक अशा सर्व गोष्टींचा व्यवहार चालूं राहील. बुद्धिमता हें तरुणांचे एक प्रबळ कार्य साधन असतें. अल्पवयांतच त्यावर असा ताण पडला जातो कीं ती बुद्धिमता उणी पडून फार थकून जाते व प्रकृतिघटनेला निरनिराह्या आजारांना तोंड द्यावे लागतें.CChMara 327.1

    वयाच्या पंधरा वर्षांपासून पुढे जर हा प्रघात चालूं ठेविला तर निसर्गधर्माला हा दुरुपयोग खपणार नाहीं. तथापि तो तसाच चालूं ठेविला तर नैसर्गिक बंधनांच्या उल्लंघनाबद्दल शासन भोगावे लागेल व त्याची विशेषत: वयाच्या तीस तें पंचेचाळीस वर्षांत जाणीव घडून येईल. पित्ताशय, फुफ्फुसे, मज्जातंतूव्यथा, संधिवात, पाठीच्या कण्याला धोका, रोगट मूत्रपिंड आणि काळपुळीसारखे निरनिराळे आजार प्रकृतीवर आघात करतील. स्वभाव धर्मातील कांहीं नाजूक यंत्ररचना बिघड्न जाते व तें कार्य करण्याचा भार इतर शक्तींवर येऊन पडतो. यामुळे प्रकृतीमध्ये एकदम बिघाड होण्याचा संभव असतो व परिणामी मरणसुद्धां येतें.CChMara 327.2

    हळूहळू परंतु खात्रीने प्राणघात करणे हें एकदम प्राणान्त करण्यापेक्षा देवाच्या दृष्टीने कांहीं कमी मोठे पाप नाहीं. अन्यायाने जगून आपण होऊन जे खात्रीने आपला प्राणान्त करितात, त्यांना त्याचे प्रायश्चित येथे भोगावे तर लागलेच परंतु संपूर्णपणे पश्चात्ताप केला नाहीं तर जे एकदम प्राणान्त करतात त्यापेक्षा अधिक लवकर स्वर्गात प्रवेश करितील असें नाहीं. कार्य आणि कारणभाव यांच्यात काय संबंध आहे हें परमेश्वरच आपल्या इच्छेनुरुप ठरवील.CChMara 327.3

    अयोग्य संवयांमुळे जे दोषपात्र आहेत त्यांत सर्वच शक्तिहीन तरुणांना आम्ही सामील करित नाहीं. त्यांमध्ये कांहीं शुद्ध मनाचे व विवेकबुद्धीचे असतात परंतु वेगवेगळ्या कारणांमुळे परिस्थितीवर ताबा नसल्यामुळे तें बळी पडलेले असतात. CChMara 327.4

    दृढनिश्चयकाराचा, आस्थने प्रयत्न करणार्‍यचा आणि धार्मिक सत्वशील बनविण्याची इच्छाशक्ति असणार्‍यचा नाश गुप्त दुर्गुणाने होतो. ख्रिस्ती झाल्याकडून आपण काय काय पत्करीलें आहे याचे ज्यांना खरे ज्ञान असतें, तें असें समजतात कीं शिष्य म्हणून ख्रिस्ताच्या अनुयायांना आपले सर्व मनोविकार आपल्या शारीरिक व मानसिक शक्ति ह्या त्याच्या हवालीं करावयाच्या असतात. आपल्या मनोविकारांवर ज्यांचा ताबा नसतो तें ख्रिस्ताचे अनुयायी होऊ शकत नाहींत. प्रत्येक प्रकारच्या दृष्टतेचा उत्पादक जो त्यांचा स्वामी होय त्याच्या तैनातीला अति निष्ठ असतात, म्हणून त्यांच्या भ्रष्टकारक संवया सोडून ख्रिस्ताची सेवा तें पत्करू शकत नाहींत. 15CG 444-446;CChMara 327.5

    जेव्हां तरुणांची मानसिक अवस्था कोमल असतें. तेव्हांच जर तें नीश्चतेच्या वर्तनक्रमाला नादावले तर त्यांना आपले नैतिक व बौद्धिक शील पूर्णत: व अचूकपणे बनविण्यास कदापि ताकद येणार नाहीं. 1621 351;CChMara 327.6

    या जगीं आरोग्यप्राप्ति व पुढे तारणप्राप्ति यांचे जर त्यांना कांहीं महत्व वाटत असेल तर त्यांनी नीचपणाच्या वर्तनक्रमाला कायमची रजा द्यावी येवढीच मात्र त्यांना आशा धरिता येईल. असल्या व्यवहारांत पुष्कळ दिवस मन रमलेले असेल तर त्याचा मोह धिक्कारण्यास व तो भ्रष्ट नाद सोडून देण्यास भरभक्कम निर्धारयुक्त प्रयत्न करावे लागतील. 17CG 464;CChMara 327.7

    आमच्या मुलांनीं भ्रष्टतेच्या प्रत्येक मार्गापासून अलिप्त राहण्यासाठी एकच खात्रीलायक मार्ग आहे तो असा कीं त्यांना ख्रिस्ताच्या कळपात सामील करण्यांत यावे व त्या काळजीवंत व सत्य मेषपालाच्या संरक्षणाखाली राहूं द्यावे. जर ती मुलें त्याची वाणी ऐकतील तर हरएक दृष्ट मार्गापासून तो, त्यांचा बचाव करील व सर्व संकटात तो त्यांची ढाल होईल. तो म्हणतो “माझीं मेंढरं माझी वाणी ऐकतात... व ती माझ्या मागें येतात.” ख्रिस्तामध्ये त्यांना चारा मिळेल, शक्ति व आशा लाभेल, अंत:करणाची तृप्ति करण्यासाठीं मनाची चलबिचल होणार नाहीं त्यांना अति मौल्यवान् मोती मिळालेला आहे आणि मन शांतिमय आरामात आहे. त्यांचं सुखसौख्य तर शुद्ध, शांतिकारक, श्रेष्ठ दर्जाची आणि स्वर्गीय अशी आहेत तीं दुख:दायक ठपक्याविरहित व खेदविरहित आहेत. असल्या सौख्यांनी प्रकृति नादुररुस्त होत नाही अगर मन निराश होत नाहीं. 18 CG 467, (1) MH 225-233.CChMara 328.1

    *****