Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First
    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents

    राजकारणांतील खळबळीविषयीं

    जे आमच्या ख्रिस्ती मडळीमधून व शाळांतून पवित्रशास्त्राचे शिक्षण देतात त्यांनी राजकारणांतील लोक व बाबी याविषयींची अनकूल प्रतिकूल मते उघडपणे व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य उपभोगू नये कारण तसे केल्याने दुसर्‍यांची मने प्रक्षुब्ध होऊन जो तो आपली आवडती तत्त्वे प्रतिपादू लागेल. ज्यांची सत्यावर निष्टा आहे अशातील ख्रिस्ती म्हणविणारे त्यांत असतील आणि तें जर अशा प्रकारे आपल्या मतांविषयी व राजकीय आवडीनिवडी विषयी खळबकारक बोलू लागले तर ख्रिस्ती मंडळीमध्ये मतभेदाचा शिरकाव होऊ लागेल.CChMara 343.2

    आपल्या लोकांनी राजकीय विषय पार पुरून टाकावेत अशी प्रभूची इच्छा आहे. अशा वाटाघाटीत मौन हेच खरे वक्तृत्व होय. देवाच्या शास्त्रामध्ये जी शुद्ध शुभवर्तमान प्रसारक तत्वे स्पष्ट प्रगट केलेली आहेत त्यात आपल्या अनुयायांनी एक व्हावे अशी ख्रिस्ताची मागणी आहे. राजकीय गटांकरिता आम्हांला सुरक्षित मतदान देता येत नाही, कारण आम्ही कोणाला मत देतो हें आम्हांला कळत नाही. कसल्याही राजकीय योजनेत आम्हांला निर्धास्तपणे भाग घेता येत नाही.CChMara 343.3

    जे ख्रिस्ती आहेत, ते खर्‍य द्राक्षवेलीचे फाटे असतील व त्या वेलीची फळें त्यावर येतील. तें सुसंगतीत व ख्रिस्ती सहवासात वागतील. त्यांच्यावर राजकीय नव्हें तर ख्रिस्ताची निशाणी राहील. मग आम्ही काय करावे ? राजकीय बाबतीत हातच घालू नये.CChMara 343.4

    मोठ्या द्राक्षमळ्याची लागवड करावयाची आहे; परंतु अविश्वासणाच्यामध्ये ख्रिस्ती लोक काम करीत असताना त्यांनी जगाचे होता काम नये. राजकीय वाटाघाटीत त्यांनी आपला वेळ खचू नये अगर राजकारणी बनू नये. कारण असें केल्याने तें शत्रूला जवळ करण्याची संधी व मतभेदांना व फुट पाडण्याला सवड देतात. CChMara 343.5

    राजकारणापासून देवाच्या लोकांनी स्वत:ला अलिप्त राखावें. राजकारणी कलहांत कांही भाग घेऊ नका. जगापासून दूर राहा आणि ख्रिस्तीमंडळीमध्ये अगर शाळेमध्ये वितुष्टाच्या व बेबदशाहीच्या कल्पना न आणण्याची खबरदारी घ्या. स्वार्थी मानवांच्या प्रकृतीघटनेत वितुष्ट वृत्ति हें एक नैतिक विष होय. CChMara 343.6

    Larger font
    Smaller font
    Copy
    Print
    Contents