Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    रविवार विषयक कायदे

    धंदा म्हणून स्वर्गाशी संबंध असलेल्या आणि कोकर्‍यांची स्वाभावचिन्हे असलेल्या धार्मिक सत्ता आपल्या कृतीवरून असें दर्शवितात कीं त्याना चतुर अजगराचे अंत:करण आहे व सैतानाकडूनच त्या उत्तेचित व ताब्यात ठेविल्या जातात. सातवा दिवस पवित्र आहेत म्हणून देवाच्या लोकांना छळणूकीचा प्रसंग येईल, असें दिवस येत आहेत. सैतानाकडून शब्बाथांत फेरफार करण्यांत आला व तो अशा आशेने कीं त्याकडून देवाच्या योजना रद्द करण्यांत याव्या. जगांतील मानवी ज्ञानापेक्षा देवाच्या आज्ञा कमी महत्वाच्या हें दाखविण्याचे सैतानी प्रयत्न आहेत. ज्याने दिवस व आज्ञा बदलण्याचा विचार केला, देवाच्या लोकांवर नेहमीच जुलूम केला तोच पापपुरूष आठवड्याच्या पहिल्या दिवसाचे पालन करण्याविषयीचे कायदे अमलांत आणील. परंतु देवाच्या लोकांनी त्याची बाजू स्थिर धरून राहीले पाहीजे प्रभु तर त्याच्या तर्फेच काम करीत राहील व तोच देवांचा देव आहे असें स्पष्ट करून दाखवील.CChMara 344.6

    सप्तकाच्या प्रतम दिवसाच्या पालनाचा कायदा ही भ्रष्ट झालेल्या ख्रिस्ती जगाची योजना आहे. पोपमडळींचे बाळ रविवार आहे व देवाच्या विश्रांतीच्या पवित्र दिवसाहून तो दिवस जगांतील इतर ख्रिस्ती जनतेने थोर मानलेला आहे. देवाच्या लोकांनी कोणत्याही प्रकारे त्या दिवसाला मान देऊ नये. परंतु या बाबीत विरोध करणे देवाच्या इच्छेप्रमाणे नाही तर ती गोष्ट टाळण्यात यावी हें त्यांनी ओळखून घ्यावे अशी माझी इच्छा आहे. तसे करण्याने परिस्थिति इतकी कलुषित करतील कीं सत्याची घोषणा करणे बहुतेक अशक्यच होऊन जाईल. कायदाभग करून रविवारच्या दिवशी निदर्शने करूं नका. असें केल्यामुळे एके ठिकाणी जर तुमचा पाणउतारा झाला, तर तशीच गोष्ट दुसरीकडेही होईल. ख्रिस्ताची बाजू सबळ करिता येईल अशीच कार्ये रविवारच्या दिवशी आम्हांला चालूं ठेविता येतील. सर्व प्रकारच्या नम्र बुद्धिने व लीनतेने काम करून आम्ही आपली शिकस्त केली पाहिजे.CChMara 345.1

    जर आम्ही रविवारचा दिवस मिशनरी कार्यासाठी दिला तर जुलमी पक्षाध लोकांची हत्यारे बोथट होऊन जातील. (त्यांची दातखिळी बसेल. सेव्हथ-डे-अॅडव्हेंटिस्ट लोकांची जिरवली असें वाटून तें खूष होतील. लोकांच्या भेटीगाठीत व शास्त्र ज्ञान देण्यांत रविवारच्या दिवशी आम्ही गुंतलेले असतो, हें त्यांनी पाहिल्यावर रविवारविषयी कानूनिर्बध करूनआम्हाला अडखळण करणे निरर्थक आहे असें त्यास वाटू लागेल. रविवारच्या दिवशी प्रभूचे कार्य निरनिराळ्या प्रकारांनी आम्हांला चालविता येईल. या दिवशी उघड्या मैदानावर बैठका भरविता येतील व कौटुंबिक उपासना चालविता येतील. घरोघरी वैयक्तिक सेवा करिता येईल, जे लेखक आहेत त्यांना या दिवशी आपले लिखाण करिता येईल. शक्य आहे तेव्हां रविवारच्या दिवशी धार्मिक उपासना करण्यांत याव्या. असल्या बैठका अत्यंत चित्ताकर्षक करा. धर्मसंजीवनाची अव्वल गीत गाण्यात यावीत आणि तारकाच्या प्रीतीविषयी जोरदार व खात्रीलायक संदेश देण्यांत यावेत. नेमस्तपणा व निर्भेळ ख्रिस्ती अनुभव याविषयी बोला या प्रकारे सेवा कसकशी करावी याविषयी तुम्हांला पुष्कळ ज्ञान होईल. व पुष्कळ लोकांशी तुमचा संबंध येईल. CChMara 345.2

    आमच्या शाळांतील शिक्षक मंडळाने रविवारचा विनियोग मिशनरीकार्यात करावा. अशा रीतीने त्याना शत्रुचे उद्देश पायाखाली तुडविता येतील. ज्यांना सत्याची ओळख नाही अशासाठी शिक्षक लोकांनी विद्यार्थ्यांना घेऊन सभा भरवाव्यात या प्रकारे दुसर्‍य कोणत्याही मार्गाने करिता येणार नाही असें त्यांना पुष्कळ साध्य करता येईल. CChMara 345.3

    जे सत्य निष्कलक व निश्चित आहे तें लोकांस द्यावयास पाहिजे पण हें सत्य ख्रिस्ती वृत्तीनेच सादर केले पाहिजे. लांडग्यात मेंढरे असें आम्ही व्हावयास पाहिजे ख़िस्ताकरिता त्यानें दिलेल्या सावधगिरीच्या सूचनांचा जे अव्हेर करतील, शात वृत्तीचा व आत्मसयमनाचा जे उपयोग करणार नाहीत तें आपल्या गुरूच्या कार्यातील संधि दवडून बसतील. जे प्रभुचे विधिनिबंध अवमानितात त्यांवर शिव्यांची लाखोली वाहण्याचे काम त्यानें आपल्या लोकांस दिलेले नाही. कोणत्याही कारणांमुळे आम्ही ख्रिस्तीमंडळीवर हल्ले चढविता कामा नये. पुष्कळांच्या मनांत आमच्याविषयीचा कलषतपणा आणि पवित्रशास्थामध्ये प्रतिपादन केलेल्या शब्बाथाविषयीच्या विरोधी भावना आहेत त्या नष्ट करण्यासाठी सर्व कांही केले पाहिजे.CChMara 346.1

    * टिप : वरील टेस्टिमोनीमध्ये शब्बाथाच्या कायद्याविषयी जी तत्त्वे विवरण करण्यांत आलेली आहेत ती धार्मिक सणाच्या व सुट्यांच्या विश्राम दिवसांना लागू पडतात. CChMara 346.2