Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    प्रकरण ५८ वें - सैतानाची फसवेगिरी

    भ्रष्ट दूतांचा आत्म्याविषयी कलह चाललेला होता व देवाचे दूत प्रतिकार करीत होतें. भांडण जोरात होतें. भ्रष्ट दृत आपल्या विषारी सामर्थ्याने परिस्थिति अमगळ करीत होतें व आत्म्यांच्याभोवती गराडा घालून त्यांची ज्ञानेंद्रिये निर्बुध्द करीत होतें. त्या सैतानी समूहाला घालवून देण्यासाठी पवित्र दृतगण मोठ्या आस्थेने नजर ठेवून पाहात होतें. परंतु मानवांच्या इच्छेविरूद्ध मनावर ताबा ठेवण्याचे कार्य त्या सजन दूताचे नव्हते. जर तें शत्रुला शरण जातात व त्याचा प्रतिकार करण्याचा काहीच प्रयत्न करीत नाहीत, तर देवदूतांनी तरी काय करावे? तरी जे संकटात सापडलेले आहेत त्यांना अधिक प्रकाश मिळेपर्यंत आणि जागृत होऊन स्वर्गीय साहाय्याची याचना करीपर्यंत सैतानाच्या हल्लयाला थोपवून धरावे एवढेच मात्र तें करूं शकतील. जे स्वत:लाच साहाय्य करण्याची कांही एक धडपड नाहीत अशांची सुटका करण्यासाठी येशू पवित्र दूतांना सांगणार नाही. CChMara 347.1

    आपल्या हातातून एक आत्मा निसटून जात आहे हें पाहाताच त्याला राखून ठेवण्याची सैताने आपली शिस्त करील. जेव्हां एखाद्या व्यक्तिला आपला धोका आढळून येतो व तो नेटाने व आस्थेने साहाय्यासाठी येशूकडे धाव घेताना दिसते तेव्हां सैतानाला आपल्या हातचे एक सावज जात आहे असें पाहून त्याला धास्ती वाटते व त्याला स्वर्गीय प्रकाशाचे मार्गदर्शन दिसूं नये म्हणून तो आपल्या सैनिकाना त्या लाचार आत्म्याभोवती उंच अशी भिंत उभारण्यास सांगेल आणि त्यामुळे अंधारच अधार राहील. परंतु संकटात गाठलेला जर धीर धरून आपल्या लाचार अवस्थेसह ख्रिस्ताच्या रक्ताच्या पुण्याईवर टेकून राहील तर आमचा उध्दारक त्याच्या निष्ठची आस्थेवाईक प्रार्थना ऐकून सैतानापेक्षा जबरदस्त असलेले आपले दृतगण पाठवून त्याची मुक्तता करील. CChMara 347.2

    आपल्या सामर्थ्यवान् प्रतिस्पर्ध्याकडे कोणी शरणागतीने जावे हें सैतान सहन करूं शकत नाही कारण तो त्याच्या सामर्थ्यापुढे व वैभवापुढे भयाने थरथर कापतो.आस्थेवाईक प्रार्थनेची वाणी कानी पडताच सैतानाचे सैन्य थरारून जाते आपला हेतु साध्य करण्यासाठी भ्रष्ट दताच्या फौजेला तो पाचारीत राहतो. छळाने मुर्छित झालेल्या आत्म्याच्या साहाय्याने जेव्हां सर्वसमर्थ दूतगण स्वर्गीय शस्त्रसामुग्रीसह सिद्ध होतो तेव्हां सैतानाची व त्याच्या सैनिकाची पिछेहाट होतें व आपण आपल्या लढ्यात गमावली असें त्यांना चांगले समजून येते. सैतानाच्या इच्छेनुरूप रहणारी प्रजा त्याच्याशी निष्ठ, कर्तव्यतत्पर आणि त्याच्या उद्देशाशी सुसंगत असते. जरी ते परस्परांना द्वेष करून लढत राहतात, तरी त्याचा सर्वसामान्य उद्देश प्रगत करण्यासाठी प्रत्येक सधीत तें सरसावत जातात. परंतु स्वर्गातील व पृथ्वीवरील महान् सेनाधिपतीने सैतानाचे सामर्थ्य मर्यादित ठेविलेले आहे.CChMara 347.3