Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    प्रकरण ५९ वें - खोटे विज्ञानशास्त्र-सैतानाचा आधुनिक प्रकाशाचा झगा

    स्वर्गीय दरबारामध्ये सैतानाने ज्या कार्यसाधनांचा उपयोग केला त्यात विज्ञानशास्त्र हें एक होतें. व तें तो आजवर वापरीत आहे. दूतगणापूढे त्यानें जी खोटी विधाने व शास्त्रीय तत्त्वे प्रगट केली, त्यामुळे त्यानें पुष्कळांचा निष्ठाभंग करून त्यास भ्रष्ट केले. स्वर्गात स्थानभ्रष्ट झाल्यावर त्यानें आमच्या आद्य मातापितरांपुढे आपले मोहपाश टाकीले. आदाम व हवा शत्रूला वश झाली आणि त्यांच्या आज्ञा भंगामुळे मानवजात देवापासून अलग झाली व पृथ्वी स्वर्गातून वेगळी करण्यांत आली. CChMara 350.1

    मना केलेल्या वृक्षाला आदाम-हवेने कधीच स्पर्श केला नसता तर प्रभुने त्यांस ज्ञान दिले असतें व त्या ज्ञानावर पापाचा शाप आला नसता त्या ज्ञानाकडून त्यांना अविनाशी उल्हासवृत्ति लाभली असती. आज्ञाभंगाने जे अवघे त्यांच्या पदरात पडले तें पापची ओळख व त्याचे परिणाम एवढेच. CChMara 350.2

    ज्या क्षेत्रात सैतानाने आमच्या प्रथम आईबापास नेले त्याच क्षेत्रांत तो आजही मानवाना घेऊन जात आहे. गोड वाटणाच्या खोट्या कथांची तो जगांत रेलचेल करीत आहे. देवाविषयीचे ज्ञान म्हणजे तोरणांचे ज्ञान मानवाच्या पदरात पडू नये म्हणून त्याच्या आटोक्यात हरएक युक्ति प्रयुक्तीने तो अडखळण करण्याचा प्रयत्न करतो.CChMara 350.3