Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    चुकीचे मत प्रकाशमार्ग वाटतो तेव्हा

    आम्ही महान् प्रकाशाच्या युगात जगत आहों परतु ज्याला प्रकाश म्हणून म्हणतात तोच सैतानाच्या हुशारीसाठी व करामतीसाठी मार्ग मोकळा करीत आहे. अशा पुष्कळ गोष्टी सादर करण्यांत येतील कीं त्या सत्य अशा दिसतील. तरी फार प्रार्थना करून त्याचा काळजीपूर्वक विचार करणे आवश्य आहे. कारण शत्रुच्या त्या करामती वरपगी अशा असतील. चुकीचा मार्ग सत्याच्या मार्गाला वारंवार जुळता असाच दिसतो. पवित्रतेकडे व स्वर्गाकडे नेणाच्या मार्गापासून तो क्वचितच ओळखता येण्यासारखा असतो. परंतु पवित्र आत्म्याने सज्ज असलेल्या मनाला तो योग्य मार्गापासून बहकविणारा आहे असें समजून येते थोडक्याच वेळात तें परस्परांपासून जमिनअस्माना इतके अलग दिसतात.CChMara 350.4

    सर्व निसर्ग वस्तुत देव भरला आहे हें तत्व ही सैतानाची एक अत्यंत कावेबाज युक्त आहे. तिच्यात देवाविषयीचा विपर्यास केलेला असून त्याच्या थोरवीचा व ऐश्वर्याचा तिच्यायोगे अपमान होतो. CChMara 350.5

    अद्वैतवादाला देवाच्या शास्त्रात आधार नाही. त्यानें प्रगट केलेल्या सत्यावरून हें तत्ववाद आत्म्याचा नाश करणारे युक्तिवाद आहेच. अध:कार हाच त्यांचा मुळपाया व विषय लोलुपता हेच त्यांचे कार्यक्षेत्र. दैहिक मनाला तें खूष करतात आणि मनोविकाराचे मार्ग मोकळे करतात. यांचा स्वीकार करणे म्हणजेच देवापासून दुरावणे होय. CChMara 351.1

    पापामुळे आमची परिस्थिति अनैसर्गिक झालेली आहे व आमचा उद्धार करणारी शक्ति अलौकिक असली पाहीजे, असें नसेल तर तिच्यात कांही महत्वच नाही. मानवांच्या अंत:करणाचा दुष्टाईने गेतलेला ताबा मोडून टाकायला एकच सामर्थ्य आहे व तें ख़िस्तामध्ये असलेले देवाचे सामर्थ्य होय. वधस्तभी दिलेल्या रक्ताने मात्र पापाचे क्षालन होतें. पतित स्वभावधर्माचे वळण थांबवायला व नाहीसे करायला त्याची कृपाच मात्र आम्हांला साहाय्य करूं शकेल. ह्या सामर्थ्यावर ईश्वरविषयक * सवादवादी तत्त्वे काहीच आघात करूं शकत नाहीत. जर देव सर्व निसर्गामध्ये संचारलेला आहे तर त्याची वस्ती सर्व मानवात आहे आणि पावित्र्य संपादन करण्यासाठी मानवाने आपल्या अंगची शक्ती केवळ विकसीत केली पाहीजे.CChMara 351.2

    तर्कशास्त्राच्या दृष्टीने ह्या वादांचा निर्णय म्हणजे अखंड ख्रिस्ती धर्म पुसून टाकणे होय. त्यामध्ये प्रायश्चित्ताची गरज राहत नाही व मानव स्वत:चाच तारणारा होतो. देवाविषयीच्या ह्या तत्त्ववादांनी त्यांचे शास्त्रवचन निरर्थक ठरते व जे कोणी हें वाद स्वीकारीतात त्यांचा असा समज होण्याचे मोठे भय असतें कीं संबंध पवित्रशास्त्र हें एक काल्पनिक वाङ्मय आहे. दुर्गुणापेक्षा सद्गुण बरा कसे तें मानीत असतील परंतु देवाला त्याच्या वैभवस्थानांतून दूर केल्यामुळे तें मानवी सत्तेवरच आधारलेले असतात व ती देवीविरहीत टाकाऊ अशी असतें. मदतहीन मानवी इच्छेला वाईटाचा प्रतिकार करण्याचे किंवा त्यावर विजय मिळविण्याचे खरेखुरे सामर्थ्य नसते. आत्म्याची संरक्षक साधने ढासळलेली असतात. पाप प्रतिवध साहित्ये मानवाजवळ नसतात. एकदा का देवाच्या शास्त्राचा व आत्म्याचा दाब काढून टाकीला तर एकदा मनुष्य किती रसातळाला जाईल हें आम्हांला कळावयाचे नाही. CChMara 351.3

    संचारवादाच्या तत्त्वात जे कोणी रमत राहतील तें आपला ख्रिस्ती अनुभव खराब करितील, देवाचा संबंध तोडून टाकतील व सार्वकालिक जीवनाला मुकून जातील.CChMara 351.4