Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    संपूर्ण समपणाची आवश्यकता

    बंधूजनहो, प्रभुच्या नामांत मी तुम्हांला सांगत आहे कीं आपल्या कर्तव्यासाठी जागृत व्हा. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याला तुमची अंत:करणे शरणागत होऊ द्या म्हणजे ती शास्त्रवचन शिकविण्यास पात्र होतील. नंतरच देवाच्या गहन गोष्टी त्यांना समजून येतील.CChMara 356.3

    जी अत्यत गांभीर्यपूर्ण अशी ख्रिस्तांसबधींची साक्ष आहे ती जगापुढे मांडावयाची आहे. प्रकटीकरणाच्या सबध ग्रंथांत अत्यंत मौल्यवान व भारदस्त अभिवचने दिलेली आहेत. त्याचप्रमाणे त्यात अत्यंत भयप्रद व गर्भितार्थाच्या धोके-सुचनाही दिलेल्या आहेत. आपल्याला सत्याचे ज्ञान आहे असें म्हणविणारे ख्रिस्ताने योहानाला दिलेला साक्षीवाद वाचणार नाहीत का ? यांत काल्पनिक व खोट्या शास्त्रातील फसवणूक नाही. उलट यांत साप्रतच्या व भावी सुस्थितीविषयीची सत्ये आहेत गव्हापुढे भुशाची काय योग्यता ?CChMara 356.4

    प्रभु लवकर येत आहे सियोनांतील गावकुसावरील पहारेकर्‍यांस सांगण्यांत येत आहे कीं तुम्ही देवाने दिलेल्या आपापल्या जबाबदारीसाठी जागृत देव पहारेकर्‍यांना बोलावून सांगत आहे, आत्म्याच्या सामर्थ्याने त्यांनी जगाला अखेरचा इषारात्मक सदेश द्यावा कीं रात्र येत आहे. पहारेकर्‍यांना बोलावून तो सांगत आहे कीं पुरूषांनी व स्त्रीयांनी आपापल्या गुंगीतून जागृत व्हावे नाही तर तें ह्या निद्रेतून मरण-निद्रेत पडतील.CChMara 356.5