Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    जादूटोणा व धर्मभोळेपणा

    जादूटोणाची पुस्तके भस्मसात करून इफिस येथील ख्रिस्ती झालेल्या लोकांनी असें दर्शविले कीं एके काळी आम्हांला जे पसंत होतें त्याचा आम्ही आज तिरस्कार करीत आहों जादूला मानूनआणि तिच्याद्वारे व्यवहार करून त्यांनी विशेष प्रकारे परमेश्वराला दुखविले होतें व आपल्या आत्म्यांना नाशात ओढिले होतें परंतु आता जादूटोणाविषयी तें आपली तिरस्कार दाखवीत होतें व आपल्या खर्‍य अंतर्याम पालटाची अशा प्रकारे तें साक्ष देत होतें. विसाव्या शतकातील सुधारणेपूर्वीच धर्मभोळेपणा नष्ट होता अशी एक भोळी समजूत होती परंतु देवाच्या शास्त्रावरून व वस्तुस्थितिच्या उघड पुराव्यावरून असें स्पष्टच व्यक्त केले जाते कीं पुरातन काळाप्रमाणे आजही जादूगिरी खात्रीने चालूं आहे. ज्याला साप्रद ज्याला पिशाचवाद म्हणतात तोच वस्तुत: पुरातन काळचा जादूटोणा होय. मृताचे सोंग घेऊन सैतान हजारो लोकांची मन हाताळीत आहे. मृतांस तर काहीच कळत नाही.” (उपदेशक ९;५) असें शास्त्राचे स्पष्ट सागणे आहे. त्याचे विचार, त्यांचे प्रेम व हेवेदावे नष्ट होऊन गेलेले असतात. मृतांचा जिवंतांशी कांही व्यवहार नसतो. परंतु मनावर सत्ता गाजविण्यासाठी अशी युक्ति लढवून सैतान आपल्या मूळ फसवेगिरीशी निष्ठ असता. CChMara 359.1

    पुष्कळसे रोगग्रस्त, दुखित व चौकस बुद्धिचे लोक पिशाचवादाकडून दुष्ट आत्म्याशी संबंध करितात. हे सर्व करण्याचे जे कोणी धाडस करितात तें संकटाच्या मार्गी असतात, देवाला त्यांच्याविषयी काय वाटते हे सत्यवाणींतून स्पष्ट कळते. सल्लामसलतीसाठी एका राजाने मूर्तिपूजकाकडे धावा केला असतां परमेश्वराने आपला कठोर न्याय प्रगट करून म्हटले, “तुम्ही एक्रोन वेथील बालजबूब दैवतास प्रश्न करावयास चालला आहा, तें इस्राएलात कोणी देव नाही म्हणून कीं काय ? यास्तव परमेश्वर म्हणतो ज्या पलंगावर तू पडलेला आहेस त्यावरून तू ऊठावयाचा नाहीस तू आवश्य मरशील २ राजे १:३,४.CChMara 359.2

    पुरातन रानटी काळचे जादूगार जे करीत होतें तेच आज पिशाचवादी, अंतर्ज्ञानी व ज्यातिषी करीत आहेत. एनदोर व इफिस येथील गुढवादी जे बोलत होतें तसेच बोलणारे आजही आपल्या फसवेगिरीने मानवांची दिशाभूल करीत आहेत. आमच्या नजरेवरची झापड काढून टाकली तर आम्हालाही दिसून येईल कीं दुष्ट दृतगण आपल्या सर्व कौशल्यांनी फसवीत आहेत व नाश करीत आहेत. देवाला विसरून जाण्याची जेथे कोठे खटपट चाललेली असतें तेथें सैतान आपली फसवेगिरी शक्ति खर्चीत असतो मानव त्याच्या कह्यात जातात तेव्हां त्यांना कळण्यापूर्वी मन गोंधळलेले व आत्मा भ्रष्ट झालेला असतो. प्रेषिताने इफिस येथील ख्रिस्ती मंडळीला जो बाधि दिला होता तो देवाच्या लोकांनी आजदेखील लक्षात घ्यावयास पाहिजे “अंधाराच्या निष्फळ कर्माचे भागीदार होऊन नका, इतकेच नव्हें तर त्यांचा प्रतिकार करा.” इफिस ५:११.CChMara 359.3