Loading...
Larger font
Smaller font
Copy
Print
Contents

कलीसिया के लिए परामर्श

 - Contents
  • Results
  • Related
  • Featured
No results found for: "".
  • Weighted Relevancy
  • Content Sequence
  • Relevancy
  • Earliest First
  • Latest First

    विश्वासयुक्त प्रार्थना

    आरामांत असून जे स्वत:स सुरक्षित असल्याचे समजतात अशांसह भ्रष्ट दूतगण काम करीत असतो, हें आम्ही डोळे उघडून पाहिल्यावर आपण निर्धास्त आहों असें आपणास वाटणार नाही. प्रत्येक क्षणाला दुष्ट दृत आमच्या शोधातच असतात. सैतान सागेल त्याप्रमाणे वागण्याची वाईट लोकांची सिद्धता असावी अशीच आमची अपेक्षा असतें; तरी आम्ही बेसावध असताना सैतानाची अदृश्य सेना नवीन नवीन मार्ग शोधून आम्हांपुढे कौतुकास्पद व चमत्कारीक कार्ये करिते. परमेश्वराच्या वचन सामर्थ्याने प्रतिकार करण्यास आम्ही सिद्ध असतो का ? तेच एक हत्यार आम्हांला यशस्वी करूं शकते.CChMara 360.1

    ही आश्चर्ये देवाच्याच हातची आहेत असें समजण्याचा कित्येकांना मोह होईल. आम्हांसमोर आजारी बरे होतील. आम्हांपुढे चमत्कार घडतील. सैतानाच्या लुच्चेगिरीची आश्चर्ये जेव्हां संपूर्णत: उघडकीस येतील तेव्हां होणार्‍य कसोटीसाठी आमची तयारी आहे काय ? पुष्कळसे आत्मे मोहपाशात पडून हातचे जातील का ? देवाच्या सरळ नियमापासून व आज्ञांपासून दुरावून आणि काल्पनिक कथांकडे लक्ष देऊन पुष्कळ जण ही लुच्चेगिरीची आश्चर्ये पत्करायाची तयारी करीत आहेत. आम्हांला लवकरच ह्या लढ्याला तोंड द्यावे लागेल यासाठी सुसज्ज होण्याचा प्रयत्न आम्ही केला पाहीजे. देवाच्या शास्त्रावर विश्वास ठेवणे, प्रार्थनापूर्वक अभ्यास करणे आणि विश्वास क्रियेत उतरविणे हीच सैतानाच्या सामर्थ्यापुढे आमची ढाल राहील व ख्रिस्ताच्या द्वारे आम्हांला विजयशाली करील.CChMara 360.2